तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 3)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
नंदूरबारच्या मिटींगमध्ये महाराष्ट्र तैलिक महासभा काँग्रेसच्या दावणीतुन भाजपाच्या पायावर ठेवली हे मी स्पष्ट मांडले आहे. महाराष्ट्रात तेली समाजाची 10 ते 12 टक्के मते आहेत. त्यात विदर्भात हे मतदान 25 ते 40 टक्के मतदार संघातुन आहे. भाजपाने विदर्भात जी आघाडी घेतली त्याला. तेली मतदार महत्वाचा आहे. एक खासदार व 4 आमदार त्या परिसरातुन निवडले गेले. भाजापाच्या पायावर समाज ठेवण्यापुर्वी दबाव गट ठेवला आसता तर संख्या बळ वाढले आसते. लोकसंख्येने अल्प असलेल्या ब्राह्मण समाजाची लोकसंख्या साडेतीन टक्के आहे. त्यांचे 13 आमदार व आज 10 मंत्री आहेत. मा. देवेंद्र फडणवीस ज्या मतदार संघात आहेत तेथे तेली मतदान 25 ते 30 टक्के आहे. म्हणजे तेली मतावर ते निवडले गेलेत. तेली मतावर मुख्यमंत्री झालेत. ना. बाव्वनकुळे ेह त्यांच्या जवळचे म्हणुन फक्त त्यांनी त्यांना मंत्री पद दिले आहे. या पेक्षा समाजासाठी काय केले ? काही पुढारी काही उद्योजक काही संघटनेतील मंडळींनी आपली वैयक्तीक कामे करून घेतली असतील हे ही मान्य करू परंतु मुळ प्रश्न असा मा. फडणवीस यांनी समाजासाठी काय केले ? साधा समाजाचा एक तरी प्रश्न समजावुन घेतला का ? सोडवणे दुरच विदर्भात कुणबी समाजाच्या वेग वेगळ्या पोटशाखा आहेत. त्या खर्या ओबीसी विषयी दुमत नाही. परंतु काँग्रेसच्या राजवटीत मराठा - कुणबी विशेषता विदर्भ सोडुन झालेत. ती मंडळी गावची पाटील व देशमुख मंडळी आहेत यांच्या टाचे खाली समाज भरडतोय राजकीय जागा बळकावल्या आहेत. शैक्षणिक जागा पकडल्या आहेत. शासकीय नोकर्या मिळवल्यात, ओबीसी सवलती पळवल्या या बाबत संघटना बोलतच नाही. मुख्यमंत्री फक्त तेली आपला म्हणत असतील तर समाजाचा सामान्य हा ब्राह्मण व मराठा समाजाकडुन भरडला जात असेल तर ही चुक तैलिक महासभेचीच आहे. कारण नंदुरबार येथे समाज भाजपाच्या पायावर ठेवला याला जबाबदार कोण हे विचारने कदाचित मी गुन्हा करीत ही आहे. परंतु समाजाच्या पोटातले दु:ख मांडले यांचा आनंद व्यक्त करणारे लाखो बांधव आहेत.