तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 4)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
सामाजीक बैठक सोडुन ही संघटना राजकारणाकडे वळली. काळानुरूप बदल झाला ती सुद्धा गरज समजु. काही वर्ष सर्व राजकीय पक्षाचे सर्व विचारंची मंडळी यात हेती. पक्षीय विचारा पेक्षा समाज विचार मोठा होता. पण आज काय झाले आहे. जो पक्ष सत्तेवर आहे त्यांच्याकडे आपले तोंड आहे. ते ही असावे परंतु आपण समाजसाठी काही मागीतले नुसत्या मागण्या करून देण्यासाठी ते खुर्चीत बसले नाहीत या साठी सत्तेतील व विरोधातील मंडळींचा एक दबाव गट करून पदरात काही मिळवले पाहिजे. ही वाटचाल संघटने द्वारे केली का ? यावर चिंतन झाले का ? सामाजीक प्रश्नाकडे वळण्यापुर्वी एक बाब मांडतो. महात्मा फुले नेहमी म्हणत आपण बहुसंख्य आहोत. नसुती आपली संख्या उपयोगी नाही तर आपण हेड मास्तर झाले पाहिजे. विकासाच्या मुख्य चाव्या आपल्या हाती पाहिजेत. त्या मिळविण्या साठी आपण आपले राजकीय कृती स्वतंत्र उभी केली का ? त्याचा साध विचार तरी केला ? साडेतीन टक्कें ब्राह्मण समाजाचे तेरा आमदार दहा मंत्री आहेत. सोळा टक्के मराठा समाजाचे आज सुद्धा पन्नास टक्यापेक्षा जास्त आमदार व मंत्री आहेत. मला अजुन एक बाब नमुद करावयाची आहे. लोक मान्य टिळकांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी मानतात. एक वेळ वादासाठी हे मान्य करू पण प्रश्न उरतो या टिळकांनी तेली सोडाच तेली समाजा सारख्या इतर जाती साठी एक तरी बाब केली आहे ? मग ती राजकीय असो अगर सामाजीक, त्यांनी त्यांच्या जातीला प्रभावी कसे करता येईल हे पाहिले. त्यांच्या जातीसाठी त्यांनी केले या बाबत काही ही मत नाही मत आहे ते आसे की ते म्हणाले महाराष्ट्रात ब्राह्मणाचे डोके व मराठ्यांचे मनगट एक झाले तर कायापालट लवकर होई. याचा अर्थ एकच या वीस टक्के समाजाचे एैंशी टक्के समाजावर राज्य करावे. काँग्रेस व भाजपाचा काळात हेच चालले आहे. आणी आम्ही फक्त दावण बदलतो किंवा वळचन बलतो. शोषीक जमात हा शिक्का पुसुन राज्यकर्ते बनणारे हेड मास्तर बनत नाही.ंं