तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 5)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
चिंतन शिबीराचे फड अनेक ठिकाणी झाले. मिटींगां नेहमीच होतात. त्यात आढावा बैठकांची रेलचेल ही होत आहे. तेंव्हा वीस वर्षींचा एक प्रसंग सांगतो. राजुर, ता. अकोले येथील स्टँडवर मे महिण्यात उतरलो. स्टँडच्या आवारात तेली समाजातील एका स्वातंत्र्य सैनिकाच्या दुकानात गेलो. त्यांनी जवळच असलेल्या ह.भ.प. कवाडे कडे पाठविले. ते वयोवृद्ध बांधव एकच वाक्य बोलले. अरे हा समाज लग्न व लाडू यातुन बाहेर पडु शकणार नाही. हे त्यांचे शब्द 20 वर्षांनंतर ही बाजुला जात नाहीत. तैलीक महासभा समाजाची रक्त वाहीनी का होऊ शकत नाही तर 2003 च्या महामेळाव्या नंतर जागा झालेला समाज संघटीत होत असताना गत 5/6 वर्षात तैलिक महासभेच्या बर्याच पदधीकारी मंडळींनी भव्य दिव्य वधु-वर मेळावे अयोजन सुरू केले. त्या ठिकाणी कोण आले काय बोलले हे ही बाजुला ठेवु. या मेळाव्याला लाखो रूपये. ते ही ठिक समजु. परंतु विद्यार्थीं गुणगैरव संताजी पुण्यतिथी एवढ्य पुरते कार्य ? यापूर्वी ही कामे गावो गावच्या संस्था आपल्या साच्यातुन करितच आहेत. उलट ही संघटना वादळात येण्यास हे एक कारण आहे. सर्व समाजाचे संघटन करता करता वादळ निर्माण होतात. वरिल कामे स्थानीक संस्था करतात. त्यांच्या समोर संघटीत पर्याय निर्माण झाल्या कारणाने समाज संघटन बाजुला जाऊन विघटनेची वाटचाल सुरू झाली. समाजाच्या विकासाचे महाद्वार फक्त हे नव्हे. राजकीय उद्योजक, श्रीमंत मंडळींचा वावर या संघटनेत असताना या तैलिकने 10 टक्के समाजाला दहा टक्के वाटा या साठी समाज मन घडविले का ? या साठी काहीच न केल्याने संघटन बाजुला जावुन विघटन होत असेल तर याचा दोष कोणाचा ?