तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 6)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
घरच्या कर्त्या बांधवाला घर चालवायचे आसते. त्याला सर्वांच्या मतांचा विचार करून निर्णयक्षम व्हावे लागत. सगळेच विकृत किंवा संस्कारी नसतात सगळेच कमवतेनसतात. परंतु त्यातुन मार्ग काढावा लागतो हीच बाब समाज संघटनेत लागु आहे. जेंव्हा व्यक्ती निष्ठ संघटना बनते. जेंव्हा ती दरबारी रूबाबत वावरते तेंव्हा तिला समान्यांचे प्रश्न समजतील का हे नक्की नसते. कै. गोपीनाथ मुंडेच्या समाजाचे प्रश्न आ. महादेव जानकर यांचे समाजाचे प्रश्न, आ. विनायक मेटे यांचे समाजाचे प्रश्न त्यांनी सोडविताना सामाजीक प्रश्नांना जवळ केले ? यातुन समाज जोडला दरबारा सारखी पदाधीकारी न बाळगता समाजीक प्रश्नाला जावुन भीडणारे तयार केले. व्यक्तीचे पदाधीकारी न बनता ते समाजीक प्रश्नांचे बनले. खिशात पैसा आहे. चार चाकी गाडी आहे. म्हणुन पदाधीकारी नव्हे तर डोक्यात सामाजीक प्रश्न किती आहेत. हे ओळखुन त्यांनी समाजाचे विघटन न करता संघटन केले ? महाराष्ट्र तैलीक महासभेने आशी सामाजीक प्रश्नाला भीडणारी मंडळी चिंतन शिबीरात घडवीले का ? ते न होता पदा साठी धडपड मग फक्त संताजी उत्सव नुसती खाने सुमारी, वधुवर मेळावे, विद्यार्थी गुण गौरव या मर्यादीत कार्या साठीही संघटन असेल तर अशीच कामे गावो गावी जुन्या संस्था कासवाच्या चालीने, भांडत, तंडत, कोर्टाच्या फेर्या मारत पुन्हा एकोपा करून करीत होत्या ना. तैलिकचे वेगळे पण समोर नसल्याने राज्य पातळीवरचे प्रश्न सोडवायचे सोडून गावोगावच्या मतात ती रूतत असेल तर समाजाचे सामुदायीक प्रश्न तसेच रहातील मग संघटन बाजुला गेले विघटनाचा मार्ग बनु शकतो.
- जय संताजी