वधु-वर मेळावे काळाची गरज म्हणुन मेळावे सुरू नव्हते. किंवा आजच्या सारखी वधु-वर मेळाव्या ही गोरख समाज सेवा अस्तीत्वात नव्हती. तेव्हां विस्कळीत समाजात कै. शंकरराव कर्डीले उभे होते. गणेश पेठेत ते घर चालविण्यासाठी धडपडत. बाकीचा सर्व वेळ समाज कार्यालयात जात असत. खुर्चीच्या मागे न लागता तेथे येणार्या वधु-वर पालकांच्या संपर्कात रहात. शहरातील व आजुबाजुच्या समाजाच्या लग्न समारंभात हाजर आसत. त्या ठिकाणी येणार्या बांधवांना ते जवळ करीत आणी वधुवरांची लग्न जमवुन देत. या साठी पदर मोड ही त्यांनी केली. आशी शेकडो सुखी संसार त्यांनी उभे केले. आशा हजारो कुटूंबाचे ते मामा झाले. समाज मनाने त्यांना अभिमानाने मामा ही पदवी बहाल केली. होती व आहे सुद्धा तर कर्डीले मामांचे चिंरजीव श्री सुभाष शंकरराव कर्डीले हे सेवानिवृत्त असुन जेष्ठ नागरीक आहेत. श्री. संत संताजी महाराज समाधी विकासामध्ये पालखी रथाला जे शेड होते ते त्याच परिसरात पण अन्यत्र हालवायचे होते. या साठी श्री. सुभाष कर्डीले यांना विचारना केली किमान 15 फुट रूंदीचे व तेवढेच उंचीचे आर. सी.सी. बांधकाम त्यांनी करून दिले. हे बांधकाम समाजाचे मामा कै. शंकरराव (मामा) कर्डींले यांच्या स्मरणार्थ केले.