डोंगर दर्यातील गावातून एक दोन समाजाची घरे. या घरात वावरता वावरता गाव गाड्यातील खाचखळग्यात रूतलेली मंडळी शहरी समाजाकडे आशेने पहतात. इथे ही त्यांच्याकडे आशेचा किरण मिळतोच असे ही नाही. ही माणसे मनात म्हणतात.
डोंगरा आडच्या वस्त्या
आण वसलेले तेली
डोंगर तर कसे ओकेबोके
तेली तर कसे पेंगाळलेले
मटकुन बसलेल्या या तेल्यांच्या वाट्यास येते
डोळ्यातील गच्च गच्च आभाळं
निसर्गाने झीडकारलेली
सरकारने तडीपार केलेला हा तेली
जेंव्हा जेंव्हा जागा होतो
तेंव्हा तेंव्हा माणुस
म्हणुन जगु लागतो.
खेड तालुक्यातील चांदूस हे गांव, भाम नदी ओलंडताच ठाकुर पिंपरीचा फाटा, या फाट्या पासूनच डोंगराची सोबत लागते. 4/5 कि.मी. जाताच डोंगर दर्यातला खाच खळग्यांच्या रस्ता. बरेच अंतर चालुन गेल्यावर आड रानात विक्रांत ढाबा व फॅमीली गार्डन रेस्टॉरंट या आडबाजूच्या रस्त्यावर मला श्री. विजय शंकर व्यवहारे भेटले. त्यांच्या सोबत घरी गेलो तेंव्हा एक धक्का बसला. सौ. दगडाबाई शंकर व्यवहारे वय वर्षे 73 होत्या. ओळख होताच सांगीतले मी तळेगावच्या श्री. सहदेव मारूती मखामले यांची मोठी बहिण. मला प्रसंग आठवला सन 1977-78 मध्ये एका साहित्य संम्मेलनाला कविता पाठवली तर सयोजकांनी जिव्हाळ्याचे पत्र पाठवुन निंमत्रण दिले. आणी सहदेव मखामले यांनी प्रथम मला रंगमंचावर उभे केले. माझ्या पुस्तकाला ही प्रस्तावना दिली. तर एका जेष्ठ कवींची या भगीनी त्या जेंव्हा सौ. व्यवहारे म्हणुन चांदूस येथे आल्या तेंव्हा नुसतीच डोंगरे, नुसताच उभा पाऊस. त्या पावसात कशी ही वाढलेली झाडे. व झुडपे श्री. शंकरराव बाळकृष्ण व्यवहारे हे घरचा तेल घाना घेत. तेल पेंड निर्माण करून त्यांची विक्री करी. उशाला बखळ शेतीजमीन तेवढी शेती करित होते. त्यांना 2 मुले व 4 मुली यांचे हे सुखी कुटूंब डोंगर दर्यात वावरत होते.
त्यांना श्री. मारूती व श्री. विजय ही दोनमुले पैकी श्री. विजय यांनी गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षणाची सुरूवात केली. ही शळा संपताच ओढे, नाले ओलंडत चांदूस फाट्या पर्यंत पायी जात खेड (राजगुरूनगर) येथे माध्यमिक शाळेत परिक्षेचे प्रमाणपत्र मिळाले. शिक्षण हे माणुस घडवीतो हे आईचे मत तळेगाव दाभाडे येथ शिक्षीत काय करू शकतात हे अनुभवलेले विजयने या डोंगर दर्यातुन बाहेर पडुन खुप शिकावे म्हणुन त्याला चिंचवड येथील संघवी शाळेत पाठविले. या ठिकाणी बारावी नंतर ते उच्च शिक्षण घेऊ लागले. शिक्षणाचा काही काळ पुणे येथिल वाडीया कॉलेज मध्ये गेला. पदवी मिळाली पुढे काय ? या उद्योग नगरीत ओळखी होत्याच त्याच ओळखीतुन एका लेबर ठेकेदराकडे नोकरी मिळाली. सिक्युरीटी डिपार्टमेंट फिल्ड ऑफसिर म्हणुन मार्च 1982 ते जुलै 1991 पर्यंत काम केले. कामाचा अनुभव व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. यातुनच या क्षेत्रातील बारकावे टिपल्या मुळे स्वत:चा आत्मविश्वास बळावला या ताकदीवर आपले. स्वत:चे क्षेत्र निर्माण करावयाचे ठरविले जवळ प्रमाणीक पणा जिद्द व विश्वास होता. तो जवळ ठेऊन चिंचवडच्या उद्योग नगरीत विक्रांत सिक्युरटी सर्व्हीसेंस (ऑल टाईप ऑफ लेबर मॅन सिक्युरटर्स ) हा व्यवसाय उभा केला. उद्योग व्यवसाय साठी सक्षम मॅन पावर ते पुरवू लागले. देशभरातील किमान 1500 लेबर त्यांच्याकडे होते. त्यांना त्यांनी फक्त पिंपरी चिंचवड उद्येग वसाहतीतच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा, गुजराथ येथे कामगार पुरविले. या 1500 मध्ये किमान 1200 तरी संसारीक होते. या बेकार मंडळीना जो भाकरीचा प्रश्न होता तो त्यांनी मिटवीला. या मुळे ही सुखी कुटुंबे आज आठवण काढतात. आज या व्यवसायात मोठी स्पर्धी. या स्पर्धेत कामगरांची फसवणुक ही जोम धरून आहे परंतू व्यवहारे यांना हे पसंत नाही म्हणुन आज फक्त 500 कामगारांना ते काम मिळवुन देतात. त्या सुखी कुटूंबांना हातभार लावतात.
प्रचंड आशा स्पर्धेतुन वाटचाल चालली आहे ती वाटचाल श्री व्यवहारे यांना पटत नसे चांदूस ता. खेड येथील अडगळीतले गाव. पाऊले त्यांची चांदूसच्या घराकडे आली डोंगराच्या उतारावर व भामानदीच्या काठी असलेल्या आपल्या शेतात लक्ष देऊ लागले. पारंपारीक शेती करण्याच्या पद्धतीला फाटा देऊन त्यांनी अधुनिक यंत्र सामुग्रीला शेतात आनुन भाम नदीला लागून आसलेले पंचवीस एकरचे क्षेत्र आज फुलवले आहे. पाचशे कामगारांच आपले चिचवड येथिल युनिट तसेच ठेऊन चंदूसच्या आडबाजुच्या आपल्या शेताजवळ विक्रांत ढाबा व फॅमीली गार्डन रेस्टॉरंट सुरू केले. एका टुमदार इमारतीत आज या ही व्यवसायाला बाळसे आले आहे. एका जिद्दीने श्री. विजय शेठ व्यवहारे यांनी गती दिली आहे.
राजकारण हा तसा पींड नाहीं परंतु जेथे ओबीसी म्हणुन मीं आहे. जेथे तेली म्हणुन जेथे ओबीसी म्हणुन अन्याय होईल तेथे ते न्याय घेतात. त्यांचे मोठे बधुं श्री. मारूती शंकर व्यवहारे हे चांदूस गावचे सरपंच होते. गावात तेल्यांची एक दोनच घरे परंतू ओबीसींचे संघटन करून पद मिळवले. आज ही त्यांनाच सरपंच म्हणुन लोक ओळखतात. लेबर ठेकेदार करीतकरीत आज चांदूस येथे त्यांनी आपली नवी ओळख निर्माण केली. या परिसराचे राखण करणरा म्हसोबा. या म्हसोबाचे चांगले मंदिर उभे केले. गावातील मंदिराला मदत ही केली. गावच्या स्मशान भुमीत बाग बगीचा व इतर गारजेच्या सुधारणा केल्या. मी अडबाजुला आहे. वाडवडलांच्या शेतात राबताराबता सुस्थीतीत आहे. पण पहिला तेली आहे. मी किती मोठा झालो तरी माझ्या पेक्षा समाज शेकडो पट मोठा आहे. या मोठ्या समाजासाठी अनेक अडचनी आहेत. श्री. संत संताजी महाराज ही आपल्या सर्वांची रक्त वाहीनीं आहे. या साठी मला माझ्या शक्ती प्रमाणे सहकार्य करावयचे आहे. समाजातील अडचनीला सामोर जाण्यासाठी प्रयत्न धडपड आहे. आता त्यांच्या या इच्छेला तेली गल्ली मासीकांने रस्ता करून दिला आहे.
भारताची युद्ध नौका विक्रांत ही सेवा निवृत्त झाली. या नौकेची एक स्मृती आपल्या परिने जतन करावे या भुमीकेतुन त्यांनी आपल्या उद्योग समुहाला विक्रांत हे नाव दिले. श्री. सहदेव मखामले श्री. विजयराव यांचे मामा. त्यामुळे वकीलव कवी असलेले सहदेव मामा यांचे जे संस्कार झाले ते अभिमानाने सांगतात मखामले यांनी स्वत: पुरते न पहाता इतरासाठी झगडणे पाहिले. साहित्यीक गो.नी. दांडेकर यांच्या मार्गदर्शना द्वारे साहित्य, कला, संस्कृती संस्था सुरू केली. साहित्यातील वेगवेगळे उपक्रम राबवीत असतानाच त्यांनी नवोदितासाठी साहित्य संम्मेलनही भरवले. या संस्थेच्या उभारणीत श्री. विजय यांच्या सहभागते संस्थेचे पहिले ट्रस्टी आहेत ते आज पर्यंत. या संस्थेचे ते आज खजीनदार आहेत. मांमाच्या योगदानाला ते खंबीर सोबत देत असतात. विविध व्याख्याने पुस्तक प्रकाशन समारंभ साहित्या वरील चर्चा सत्रांचे अयोजन करतात.
या धडपडीत ते एक श्रद्धा बाळगून आहेत. या श्रद्धेवर ते वाटचाल करीत आहेत. राजस्थान येथील मा. दाती महाराज यांचा परिचय झाला. त्यांचे शिष्यत्व स्विकारले ओम नमो नारायण हे ब्रिद जीवन प्रणाली मानतात. श्री. विजय व्यवहारे यांचा मोठा मुलगा श्री. दिनेश वय 33 केमीकल इंजीनीयर असुन थरम्याक कंपनीत इंजीनीयर आहेत. विक्रांत हा संगणक इंजीनीयर म्हणुन उच्चशिक्षित होत आहे. मुलगी सौ. मृणाल ही साखरे यांच्याशी विवाह झालेला असुन ती पुणे येथे वकील व्यवसाय पहाते सौ. उमा ह्या पत्नी असुन एक लहान गोंडस मुलगी कु. रागिणी घरातकिलबिल करीत आहे. श्री. विजय शंकर व्यवहारे यांना समाजाचे आपण देणे लागतो हे पुर्ण करावयाचे आहे.