युवकांच्या हाती सत्ता दिली तर ते देशाचा फार मोठा विकास करतील, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. युवक म्हणजे उत्साहाचा झरा मुर्तिमंत झळाळते चैतन्य युवकांमध्ये फार मोठी शक्ती आहे. मी तुम्हांला आशाच युवकाची आज ओळख करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री. प्रशांत चंद्रकांत भागवत.
पण त्यांनी दिवसभर राब राब राबायचे 24 तास काम करायचे आणि नोकरीत पर्मनंट नाही. हा अन्याय कशासाठी ? त्यांनाही मुले - बाळे आहेत, संसार आहे. नोकरीवरून काढले तर खायचे काय ? त्यांना नोकरीत पर्मनंट केलेच पाहिजे
बंधुभगिनींनो अशा प्रकारे दुसर्यांसाठी भांडणारा झगडणारा हा तरूण. त्यावेळी ते होते 26 वर्षांचे वडिलाच्या शब्दाचा मान राखण्यासाठी कॅडबरी कंपनीत नोकरी केली. युनियन निवडणुकीत उभे राहिले, भरघोस मतांनी निवडुन आले. यावरून त्यांच्याबद्दल कामगारांना केवढा विश्वास होता हे दिसते निवडुन आल्याबरोबर त्यांनी 250 लोकांना पर्मनंट करण्यात सिंहाचा वाटा घेतला. आज त्या लोकांचे संसार सुखात आहेत.
तसे पाहिले तर भागवत कुटुंब हे शेतकरी कुटुंब फक्त शेती न करता काहीतरी नवनवीन कल्पना वापरणे, हा प्रशांत यांचा स्वभाव. जुने आणि नवे यातील चांगल्या गोष्टी त्यांनी अचुक घेतल्या. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरले आणि त्याला पशुपालनाची जोड दिली. जुन्या नव्याचा मेळ साधुन शेतीतुन भरघोस उत्पन्न सुरू झाले.
आपले दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या सुदुंबरे येथील सभामंडप बांधण्याच्या कामी त्यांनी आर्थिक साहाय्य केले. तेथील जमिनीच्या मोजणीच्या कामी मदत केली. आशाप्रमारे समाजासाठी झटणारा हा तरूण गावातील विकासकामांसाठीही सतत प्रयत्नशील आहे.
गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी नदीपात्रावर किती कचरा होतो. हे सर्वांना ठाऊकच आहे. यासाठी त्यांनी निर्माल्य कुंडाची व्यवस्था केली. निर्माल्यमुक्त गणेश विसर्जन मोहिम आज गेली कित्येक वर्षे ते यशस्वीपणे राबवत आहेत.
सार्वजनिक क्षेत्रात सर्वांत जोखमीचे समजले जाणारे पैशांचे काम म्हणजे खजिनदारपद कडजाई माता उत्सव धर्माथ महाराज उत्सव यामध्ये त्यांनी खजिनदार म्हणुन काम पाहिले. मुक्ताई माता मंदिराचा जिर्णीद्धार केला आणि येथुनच त्यांच्या सामाजिक कार्याची सुरूवात झाली.
बैलगाडा उत्सवाच्या वेळी मावळातील नामांकित राजकीय लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
ग्रामपंचायत निवडणुकीत निवडुन आल्यानंतर त्यांनी उपसरपंचपद भुषवले अनेक विकासकामे केली.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्यदेखील वाखाणण्यासारखे आहे. गावातील जि.प. शाळेत कॅडबरीच्या साहाय्याने कॉम्प्युटर लॅब, 10 कॉम्प्युटर, 1 कॉम्प्युटर शिक्षक उपलब्ध करून दिले. त्याचा फायदा म्हणजे गरिबांच्या मुलांनादेखील कॉम्प्युटर चालवता येऊ लागला.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष 250 कामगारांची कायम नोकरी, विविध उत्सवांतील खजिनदारपद, गावातील रस्ते डांबरीकरण, गटरांचे काम, आय. एस.ओ. ग्रामपंचायत व अंगणवाड्या इ. अनेक कामाबरोबरच त्यांचा दुग्धपालनाचा व्यवसायदेखील जोरात सुरू आहे.
या सर्व कामांमध्ये त्यांना मोलाची साथ दिली ती म्हणुजे त्यांचे वडील आई, त्यांची पत्नी त्यांचे दोन भाऊ आणि भावजय यांनी. यांच्या पाठिंब्यामुळे अनेक विकास कामांच्या योजना प्रशांत यांच्या मनात आहेत. त्या सर्व विधायक योजना साकार व्हाव्यात, त्यांच्या हातुन समाजाची सेवा घडावी हीच सदिच्छा.
सौ. वैशाली राजेश राऊत, इंदोरी