गुजरात मधील वडनगर हे छोटेसे शहर या शहरावर सयाजीराव गायकवाडांची सत्ता होती. ती सत्ता होती म्हणुन शाळा व इतर सोय उपलब्ध होत्या. त्यांच्याच मुळे त्या काळी रेल्वे गाडी ही अस्तीत्वात होती. रेल्वे स्टेशन परिसरात दामोदर मोदी हे चहा विक्र्री करीत. त्यांचे मोदी हे चिरंजीव. लहानपणा पासुन कष्टकरी घर. या व्यवस्थेने दिलेले. नरेंद्र मोठे होत असताना वयाच्या सतराव्या वर्षी लग्न लावले गेले. परंतु सन्यास घेण्याचा विचार करून ते हिमालयात ही गेले. हा मार्ग फक्त दोन वर्षच पसंत पडला. हिमालयापासून गुजरात मध्ये आल्यावर वडिला बरोबर ते चहा विक्री करू लागले. या वेळी लक्ष्मणराव इनामदार (दामले) हे बडोदा संस्थानात महाराष्ट्रातील जी मंडळी गेली होती त्यातील एक . वडनगर या शहरात तसे हे सातारचे मराठी कुटूंब एकटेच होते. जन्माने ब्राह्मणा व वृत्तीने ब्राह्मण असल्या मुळे त्यांची नागपूर येथिल आर.एस.एसचे प्रचारक हे काम स्विकारले. स्वत:ची घडण हिंदू निष्ठ बनवून त्या पद्धतीने ते प्रचारक बनले. यावेळी केशाभाऊ पटेल शंकरसिंग वाघेला ही मंडळी आर. एस.एसची पाहे मुळे खोलवर रूजवत होते त्या साठी सायकलीवर फिरत होते. शंकरसिंग वाघेला हे इतर मागास जातीत जन्मलेले. पण ध्येयाने प्रेरित झालेले होते. लक्षमणाराव दामले हे मुख्य प्रचारक म्हणुन काम करताना त्यंाना चहा विकणारा चुणचुणीत मुलगा सापडला. दामले या हुशार मुलाकडे शिाक्षण अपुरे पण विचार शक्ती आकलन शक्ती पाहुन सरसावले. हिंदुत्व व राष्ट्रीय स्वयं सेवक संघ या विषयी नरेंद्रना सांगू लागले. आपले विचार पटवून देऊ लागले. नरेंद्र मोदिंना काही केल्या हा विचार पटेना मी घाची. माझी जात या व्यवस्थेने कमी लेखलेली जातीलाा कमी लेखलो म्हणुन आर्थिक उत्पन्न कमी. त्या मुळे सामाजीक प्रतिष्ठा कमी. असे असताना प्रतिष्ठीत जाती असलेल्या समाजाच्या नेतृत्वा खाली. आपला टिकाव लागेल हा ही विचार ते करित होते. परंतु सरते शेवटी दामले यशस्वी झाले. नरेंद्र मोदी यांना आर.एस.एस. या संघटनेचे विचार आपले वाटू लागले व ते दामले यांच्या संपर्कात सामील झाले.
दामले (इनामदार) हे सातारचे होते. व्यवसाया मुळे ते व त्यांचे बंधु गुजराथ मध्ये गेले होते. भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर लगेच महात्मा गांधींना गोळ्या मारून मारणारा महाराष्ट्रातील होता. हे जेवढे सत्य आहे. तेवढेच तो एक ब्राह्मण होता हे ही सत्य आहे. दक्षिण महाराष्ट्रात पिड्यान पिड्या कसणारा वेगळा व निवांत जगणारा वेगळा वर्ग होता. या सुशिक्षीत वर्गाने गाव गाड्यात प्रमुख नात्याने सर्व मालमत्ता मुठीत ठेवली होती. ति सुद्धा कायदेशीर लिखीत या धुमसत्या आगीला गांधी वरील हल्याचे निमित्त मिळाले आणि सातारा, सांगली, कोल्हापूर भागात गावो गावच्या ब्राह्मण वाड्यांना लक्ष्य केले गेले. या वाड्यातील बायका पोर व माणसांना घरा बाहेर काढून. लिखीत दप्तरा सहीत दिवसा ढवळ्या पेटवण्यात आली. यातील बरिच मंडळी गाव सोडून पुणे, मुंबई व इतर गेली. सातारची होरपळ घेऊन दामले जरी गुजरात मध्ये होते तरी अतिशय शांत होते या राखेतून नवी घडण करणारे होते. त्यांनी मोंदी यांना घडविले जिद्द, धोरण, अभ्यासुपणा, आपल्या कामावरील निष्ठा, प्रमाणीक पणा व काम हालके का मोठे या पेक्षा हे काम समाजाला उपयोगी आहे हे महत्वाचे ही पेरणी केले. नरेंद्र हे संघाच्या प्रणालीत तयार झाले. आणि आर. एस.एस. या हिंदुत्ववादी संधटनेचे प्रचारक बनले दामले व ते एकत्र प्रचार करू लागले. दामले यांच्या लक्षात आले. हा चुणचुणीत मुलगा प्रचारक होण्यापेक्षा याच्यात राजकारणाचे अंग आहे. आणि मग नरेंद्र वर त्या पद्धतीने संस्कार सुरू झाले. आणिबाणीच्या काळात ते भुमीगत होते. नरेंद यांची दाढी ही सवय आजची नसुन ती पहिल्या पासुनची आहे. ही दाढी त्यांना आणिबाणीत उपयोगी आली. ते शिख पोशाख वापरून भुमीगत झाले. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वा खाली लढणार्या सर्व विविध पक्षांच्या संपर्कात आले. दामले यांच्याकडे सातारचे मधु लिमये समाजवादी येत. त्यांच्याबरोबर मोदी एक सेवक म्हणुन वावरत आगदी चहा बनविणे चहाच्या कपबश्या धुणे ही सुद्धा कामे करण्यास त्यांना कमी पणा वाटला नाही.
राजकारण हा त्यांचा पिंड होता. तो त्यांचा जन्मजात गुण होता. पटेल नेहरू, गांधी घराण्यात जन्म झाला आसता तर कही कष्टाविनाच त्यंाना सत्ता मिळाली आसती. ते जन्माने घाची (तेली) होते. त्यामुळे त्यांना सुरवात शुन्यातुन करावी लागली. आर. एस.एस. ही संघटना विचार परिपक्व करून देते. एव वेळ विचार परिपक्व झाले की ती व्यक्ती कुठे ही गेली तरी मुळ विचाराची फारकत घेत नाही. मोदी यांच्या बाबत तेच घडले. ते दामले यांच्या मुळे आर. एस.एस. मध्ये गेले. प्रचारक झाले पण राजकारणात गेलेते भारतीय जनता पार्टीत कारण या पक्षाची पुर्ण बांधणी ही आर.एस.एस. मधुन झाल्या कारणाने मोदी प्रथम अहमदाबाद महानगर पालीकेते एक सदस्य म्हणुन निवडून आले. आणि जन्माने तेली (घाची) असुनही ते राजकारण करू लागले जनतेचे प्रश्न प्रभावी पणे मांडून प्रत्यक्ष तयावर उपाय योजना करू लागले. हीच त्यांची खरी जमेची बाजु मान्य करावी लागेल. जय प्रकाशजींच्या प्रभावाने बिहार व गुजराथ ही राज्य अनिबाणी पुर्वीच रस्त्यावर उतरली होती. नरेंद्र मोदी उमेदीच्या काळात त्याच विचाराणे रस्त्यावर होते. तेथून आणिबाणीत भुमीगत राहुन कार्यरथ राहिले याच दरम्यान आपले अपुर्ण रहिलेले शिक्षणा ही पुर्ण करू लागले. अहमदाबाद महानगर पालिके नंतर ते स्वत:च्या कष्टाने भाजपाच्या साथीने विधानसभेत गेले. काम निष्टा व त्याग या बळावर ते सर्वा समोर आले. मुख्यमंत्री पद स्विकारले पहिला त्रास स्वकीयांनी दिला. केशुभाई पटेल सारखे पटेल हे विरोधात होते. ज्यांच खांद्याला खांदा लावुन लढाई खेळली ते सुद्धा सत्ता स्पर्धेत विरोधात उभे होते. आशा अनेक जातींचे मी मी म्हणनारे विरोधात असताना एक घाची (तेली) समाजातील व्यक्ती म्हणून त्यांचे कौतूक केले पाहिजे यातुनच त्यांचा मार्ग हा पंतप्रधानकीच्या रस्त्यावर आला.
आज अनेक जन निवडणुकीचे विशेलषन करतना नमुद करता हे यश भाजपाचे आहे. हे यश आर. एस.एस. या संघटनेचे आहे. पणा माझे मत हे यश जर जास्त कुणाचे असेल तर नरेंद्र मोदी या एका व्यक्तीचे आहे. एक तेली म्हणुन त्यांना हार्दिक शुभेच्छा.