दि. 8 डिसेंबर 2016 रोजी संत जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनी त्यांच्या समाधीस्थळी मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तर्फे महाराष्ट्रातील पहिल्या राज्यस्तरीय संताजी साहित्य संमेलनाचे आयोजन संताजी जगनाडे संस्था, चिंचवड आणि तेली समाज सेवक नाशिक यांच्या संयुक्त विद्यामने पहिल्या संताजी साहित्य संंमेलनाचे आयोजन अतिशय उत्साहात संपन्न झाले. पहिले संताजी साहित्य संमेलन सकाळी 10 ते दु. 4 वा. दरम्यान यशस्वी रित्या पार पडले. सकाळी 10 वा. श्री. संताजी महाराजांची मुर्ती, हस्तलिखिचत गाथा व पादुकांची पालखी - दिंडी काढण्यात आली. जेष्ठ समाज बांधव श्री. मारुती फल्ले यांनी सपत्नीक महाराजांच्या समाधीस विधीवत अभिषेक केला. मंत्रघोषात पुषपांजलीसह आरती करून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. संमेलन यशस्वी करण्यसाठी श्री. डॉ. भुषण कर्डिले, गजानन शेलार, सुभाष पन्हाळे, फुला बागुल , श्री. दिलीप चौधरी, श्री. शेखर लगड, श्री. पांडुरंग चव्हाण, श्री. शैलेश ढगे, श्री. मारूती फल्ले सर, श्री. पांडूरंग शिंदे, संतोष करपे, सौ. विद्याताई कर्पे, श्रीमती नागलेताई, सौ. पुषपाताई बोरसे, सौ. मोनाताई किम्मतकर (वर्धा) छगनराव मुळे, तेली समाजसेवक डॉ. शरदराव महाले, साहित्यक श्री. शशांक वाढ, श्री. विजय बागुल संजय बागुल, सदर परीश्रम घेतले.