भोसरी :- महाराष्ट्र तेली महासभा पिंपरी चिंचवड, पुणे शहर व ग्रामिण व पुणे विभागातर्फे खा. रामदास तडस व संपादक श्री. वसंत कर्डीले यांचा सत्कार व पुरस्कार समारंभ भोसरी येथे लांडगे सभागृहात आयोजीत केला होता. सदर सत्कारास उत्तर देताना वर्धा येथिल खासदार रामदास तडस यांनी सांगितले महाराष्ट्र तेली महासभे तर्फे समाजाचे काम. समाजाचे संघटन हीच माझी जमेची बाजू या जोरावर मी दोन वेळा विधान परिषदेवर निवडुन गेलो. तेली मत हिच माझी गंगाजळ. या वेळच्या खासदारकीला मी समाजाची दिडलाख मते ही तुमचीच आहेत हे समाजाचे मत. ही मते जेथे असतील तोच खासदर या मतदार संघात निवडला जातो. मी दबकत दबकत उभा राहिलो. माझ्या जवळ तुटपुंजा पैसा पणा समाज बांधवांनी स्वत:ची लढाई निर्माण केली. निवडणूक निधी गोळा करून दिला. दिलेले पत्रक प्रत्येक घरात देऊन मतदान पर्यंत जागृत राहिले आणि त्यामुळे अडीच लाख मतानी निवडून आलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी सहीत ७ खासदार समाजाचे निवडून आलेत. या खासदारांना एकत्र घेऊन ना. जयदत्त क्षिारसागर यांच्या मार्गदर्शना खाली एक महामेळावा दिल्ली येथे घेतला जाणार आहे.. त्या शिवाय देशातील समाज एकत्र येणार नाही. या कार्यक्रमा वेळी तैलिकचे प्रसिद्धी प्रमुख डी.डी. चौधारी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी श्री. चंद्रकांत व्हावळ अध्यक्ष ग्रामिण श्री. विजय रत्नपारखी अध्यक्ष पुणे विभाग, राजेश शेजवळ पुणे शहर सौ. प्रियाताई महिंद्रे अध्यक्ष महिला आघाडी यांनी आपले विचार व्यक्त केले. सर्वश्री. विजय शिंदे समाज अध्यक्ष पुणे, सौ. व्हावळ महिला आघाडी पुणे ग्रामिण. शिवाजी क्षिरसागर सेवा आघाडी, गाडेकर साहेब पंचगडे काका, सुभाष पन्हाळे, अरूण काळे, सौ. मंगल जाधव या विचार मंचावर होते. या कार्यक्रमास अंबादास शिंदे मा. अध्यक्ष गंगाधर हाडके, सत्यवान शेठ कहाणे दुर्गुडे, प्रदिप कर्पे, कृष्णा भादेकर, माऊली व्हावळ, रमेश भोज, राधीका मखामले व इतर प्रतिष्ठीत बांधव उपस्थीत होते.
या वेळी नाशिक येथिल तेली समाज सेवक या मासिकाचे संपादक व जेष्ठ बांधव श्री. वसंतराव कर्डीले यांना सामाजिक बांधीलकी हा सामाजिक पुरस्कार देण्यात आला या वेळी सत्काराला उत्तर देताना कर्डीले म्हणाले, या समाजाचा इतिहास दैदीप्यमान आहे. आगदी गुप्त वंशीय राजे हे तेली होते. राजस्थानातील अनेक राजघराणी तेली होती. आपले आजचे पंतप्रधान हे सुद्धा तेली आहेत. हा देश घडविणारा तेली आहे. या वेळी सौ. प्रिया महिंद्रे यांनी संघटने बाबत मौलिक विचार व्यक्त केले. समाजमाता केशार काकू व ना. जयदत्त क्षिरसागर यांनी केलेल्या कार्यांचा आढावा समाजा समोर मांडला श्री. चंंद्रकांत वाव्हळ यांनी पुणे ग्रामिण अध्यक्ष पद मिळताच प्रथमच ग्रामिण भागातील खाणे सुमारी करून त्याच्या मुद्रित पुस्तकेची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्षप्रांतिकचे कार्याध्यक्ष श्री. अशोक काका व्वहारे यांनी संघटनेवरचे विचार व्यक्त केले. या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वश्री विजय रत्नपारखी चंद्रकांत वाव्हळ, डी.डी. चौधरी, विष्णूपंत ढेंगाळे, दुर्गुडे, राजेश शेजवळ, व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.