नागपूर , ता. 8 दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअमवर तेली समाजाचे राष्ट्रीय महाधिवेशन घेण्यात येणार असुन, ते यशस्वी करण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी केले. दिल्ली येथील कन्सिट्युशी क्लब येथे राष्ट्रीय महिला आणि युवक कार्यकारिणीच्या शपथग्रहण सोहळ्याला आलेल्या समाजातील शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले समाजातील तरूण पिढीन राजकारणात यावे, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातही पुढाकार घ्यावा. शहरासोबत ग्रामीण भागातील तरूणांना मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणावे. राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विभागस्तरीय मेळावे घ्यावे. समाजातील शेवटच्या माणसांशी संपर्क साधावा आणि समाजाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade