नागपूर :- महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेतर्फे दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्य राष्ट्रीय महाअधिवेशन घेण्यात येणार आहे, असे महासंघाचे राष्ट्रय अध्यक्ष व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जाहीर केले. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय महिला आणि युवक कार्यकारिणीच्या शपथ ग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, युवा पिढीने राजकारणात येऊन नेतृत्व करावे, सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शैखणिक आदी क्षेत्रांत पुढाकार घ्यावा आणि समाजातील होतकरू तरूणांना सामूहिकरित्या मद करा. ज्या सामाजिक घ्यावा आणि समाजातील होतकरू तरूणांना सामूहिकरित्या मदत करा. ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना राजकारणात आवड आहे, त्यांनी स्वत:चे नेतृत्व निर्माण करावे, संघटना पाठीशी राहील, असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले. बैठकीला नवनियुक्त महिला अध्यक्ष ममता साहु, प्रदेशाध्यक्षा प्रिया महिंद्रे, पुणे, विजय चौधरी, नंदूरबार, विक्रांत चांदवडकर नाशिक तसेच माजी खासदार सुरेश वाघमारे, ईर्वर बाळबुधे, संध्या सव्वालाखे, अॅड. धनराज खोब्रागडे, माधव घुसे, सुखदेव वंजारी, सुभाष घाटे, प्रशांत ईखार, बरविंद बेले, प्रशांत बारई, अरूण टिकल नाना चिलेकर, मराठवाडा समन्वय साई शेलार, सरिता मदनकर, सुनंदा मुंडले, सोनाली पडोहे, डॉ. पूजा धांडे उपस्थित होते, असे सामाजिक कार्यकर्ते सुखदेव वंजारी यांनी कळविले.