श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी सोहळा २०१४
श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी सोहळा २०१४ सालाबाद प्रमाणे शनिवार दिनांक २० डिसें. २०१४ रोजी श्री क्षेत्र सुदूंबरे येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर उत्सवाचे निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह दि. १४/१२/२०१४ पासून सुरू होत असून त्या मध्ये महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकार हजेरी लावणारा आहेत. दि. नांक १४/१२/२०१४ ते २०/१२/२०१४ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन, भजन, प्रवचन होणार आहे.
श्री. संताजी महाराज जगनाडे हे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे समकालिन संत असुन त्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथेचे लिखाण व संगोपण केले. सदर पुण्यतिथी सोहळ्या निमित्त महाराष्ट्राच्या व देशाच्या कानाकोपर्यातून महाराजांचे भक्तगण दि. २०/१२/२०१४ रोजी श्री क्षेत्र सुदूंबरे येथे जमा होणार आहेत.
श्री. क्षेत्र सुदूंबरे हे महाराष्ट्र शासनाने तिर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून घोषीत केले आहे. सदर पुणयतिथी कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. जनार्दन गोपाळशेठ जगनाडे (चाकण) यांनी केले आहे.
सदर पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने खासदार रामदास तडस, आमदार जयदत्त क्षिरसागर, खासदार शिवाजी आढळराव पाटील, खासदार श्रीरंग मारणे, खासदार मा. वंदना चव्हाण, आमदार बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार चंद्रशेेखर बावनकुळे, आमदार चरणभाऊ वाघमारे, आमदार कृष्णाराव खोपडे, आमदार शिरीष चौधरी, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुरेश गोरे, मा. खासदार नानासाहेब नवले, सा. कार्यकर्ते मा. बाजीराव गाडे पाटील, साखर कारखाना संचालक गणपतराव शेडगे, सरपंच संगिताताई भांगे, उपसरपंच बाळासाहेब गाडे तसेच विविध क्षेत्रातील नामवंत व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर पुण्यतिथी सोहळ्या निमित्त पुढील उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
१. शिक्षण समिती तर्फे विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम.
२. भोसरी विभाग तेली समाजातर्फे - आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर.
३. दु. १२.०० नंतर महाप्रसाद.
दिनांक 07-11-2014 06:56:41