इतिहास घडवीणारा तेली समाज व भवानी मातेचा पलंग ( भाग 1 )
आगदी दहा हजार वर्षाच्या दरम्यान नाशीक सिन्नर येथे यादव राजे राज्य करीत होते. त्यांचे मुळ गवळी समाजात होते असे ही काही इतिहासकार नोंदवतात. काही त्यांचे नाते यादव कालीन कृष्णाशी जोडातात. पण काही नोंद करतात हे गवळी मुळ कानडी मुलखातील. हे असले तरी त्यांची सुरवात सिन्नर येथे आहे आज ही तेथे जूने भवानीमाता मंदिर आहे. यादवांची ही कुलस्वामीनी मातृसत्ताक कुटूंब पध्दतीची ही ठेवण होती. जेंव्हा यादवांची सत्ता आली राजधानी देवगीरी येथे नेहली तेंव्हा बरोबर भवानी मातेचीमुर्ती सुद्धा होती. त्यांची सत्ता महाराष्ट्रभर पसरी सर्व मराठी मनाची ती देवता म्हणुन अंतकरणत रूजली. रामदेवराय हा घात दगा फटका करून राजा झाला. राजा होताच हेमांड व बोपदेव या ब्राह्मण मंडळींचे सहकार्य झाले म्हणुन राजा नावापुरता. शुद्र कमलाकर सारखी वेगवेगळी पुस्तके रचुन यानां या मंडळींनी धर्मशास्त्र बनविले. या धर्म शास्त्राने प्रजा खचली गेली. त्याच वेळी राजा व हेमांड यांच्या विषयी प्रचंड राग पोटात ठेऊन प्रजा होती. याच वेळी उत्तर भारत जिकंणारा अल्लाउद्दीन खीलजी दक्षिणेकडे येत होता तरी हेमांड व बोपदेव हे सरदार धर्म शास्त्राच्या जोरावर उभे होते. देवगीरीला वेढा पडला देवगीरी धोक्यात आली तरी या हेमांड बोपदेवला धर्म शास्त्र मोठेे होते. या यादवांचा प्रभाव मातीमोल होऊन देवगीरीचा पराभव झाला.