इतिहास घडवीणारा तेली समाज व भवानी मातोचा पलंग ( भाग 2 )
नगर जवळच्या बुर्हानगर येथे भवानी मातेचे मंदिर आहे. या मंदिरातून निघालेल्या पालखीत भवानी माता तुळजापूर येथे शिलांगनच्या उल्सवात बसलेली आसते. हा मान भगत घराण्याला शेकडो वर्ष मिळतआहे. पुराणात नुसती वांगी आसतात अशी एक म्हण आहे. इतिहासाचार्य राजवाडे आपल्या संशोधनात म्हणतात व्यास हा एक अतीबुद्धीमान माणुस होता. त्याने त्या वेळच्या कथा, त्या वेळच्या दंतकथा, त्यावेळच्या लोककथा, या पिढी पासुन त्या पिढीकडे हस्तांतरीत झालेल्या कथा. संग्रहीत केल्या आणी त्यांना आपल्या विचार प्रणाली प्रमाणे, बदलत्या काळा प्रमाणे आकार देऊन लेखन केले. आणी यांच ग्रंथावर उभा देश व्यापला याचा आर्थ एकच व्यासानी त्यातून हवे ते बाजुला सारून आपली हुकमत निर्माण केली. त्या नंतर अनेकांनी पुराणे लिहीली ती लिहीताना बहुजनांच्या पराक्रमाला आपल्या सारखा आकार देऊन त्यात इतिहास संपून टाकला गेला. परंतू आपण जर चाणाक्ष पणे पाहिले तर त्या वेळच्या पुराण लेखकांचे पितळ उघडे पडते. आणी सत्य समोर येते. हे का सांगावयाचे असाच पराक्रमाचा इतिहास तेली समाजाचा दडविला आहे. फक्त बुर्हानगरच्या अर्जुनराव भगत यांच्याकडील, प्रचलित कथा, काही नोंदी जुन्या बांधवांकडे मते एकत्र करून एका ब्राह्मणाकडून पुस्तक तयार केले आहे. ते जेंव्हा बारकाईने वाचतो तेंव्हा काही गोष्टी समोर येतात हेमांड, बोपदेव, रामदेव यांच्या मुर्खपणामुळे देवगीरी हातातून गेली. याच वेळी गडावरील त्रासलेली तेली मंडळी असावीत कारण बोपदेव हेमांड या मंडळींचा विश्वास हा धर्मशास्त्राची काशी म्हणून त्यांनी तयार केलेल्या पैठणवर होता. त्यांची निष्ठा इथे कितपत असावी अशी शंका आहे. कदाचित याच मुळे त्या तेली बांधवांनी ही मुर्ती नगर जवळील बुर्हानगर येथे नेहली असणार. त्या वेळी या भागाला अंधेरी नगरी म्हणत असत. किंवा मुसलीम राजवट स्थिर झाल्यावर इथे तेली सरदार किंवा राजा असणार. त्या वेळी या भागाला अंधेरी नगरी म्हणत असत. किंवा मुसलीम राजवट स्थावर झाल्यावर इथे तेली सरदार किंवा राजा असावा. त्यांने मुर्ती संभाळली असणार. कारण असे की यातील भक्तीचा धागा उलगढला तर कळुन येते. जी अंबिका म्हणुन लहान मुलगी तेल्याच्या घरी विद्रुप असताना आली. पण तेली बांधवांनी तिला मुलगी म्हणुन जपली. काही काळाने ती अंबिका माता अर्थात भवानी माता तेल्याच्या घरी होती. याचा अर्थ एकच होऊ शकेल. संकट काळात मुर्ती तेली समाजाने जपली. पण संधी मिळताच तीला अन्य ठिकणी घेऊन जाताना तो सरदार राजा धारातीर्थी पडला म्हणुन आजच्या तुळजापूर येथे तीची स्थापना झाली. छ. शिवरायांनी या मातेला आपले दैवत मानले होते. त्या वेळचा राजनीतीचा भाग म्हणून शिवरायांना मोकळ्या मैदानात येण्यााठी आफजलखान आपल्या बरेबर ब्राह्मणांनाही बरोबर घेऊन हाल्ला करावयास तुळजापूर येथे निघाला. कारण त्याने फर्मान काढून महाराष्ट्रातील सर्व सरदारांना एकत्र केले होते. त्याचा वकील तर कुलकर्णी ब्राह्मण होता. हा इतिहास सांगतो तो हल्ला करीत आहे म्हणताच जानकोजी भगतांनी लढाई करून भवानी माता सुरक्षित स्थळी आणली. महाराष्ट्र भुषण म्हणुन ज्यांना गौरवले ते पुरंदरे आपल्या सोईने लिहीलेल्या बखर वजा पुस्तकात साधा उल्लेख ही करीत नाहीत. उलट ब्राह्मणांचे उदात्तीकरण करण्यास आपले उभे आयुष्य खर्च करतात. यावरून एक स्पष्ट होते. मराठ्यांनी मराठ्यांचे कौतूक केले, ब्राह्मणांनी तापल्या तव्यावर आपल्या भाकरी भाजण्याचा कारखाना नव्हे तर कारखाने सुरू केले. आपण मात्र हा इतिहास किती जपला न्हवे तर किती प्रखर पणे साठवण केली संशोधन करीत गेलो. माती म्हणुन सोने विकणार्यांना टाळ्या देत रहातो. पण ते प्रतिष्ठीत पणे, विश्वास संपादन करून आपल्या सोन्याची माती ते करतात. हे न मानणे म्हणजे एक प्रकारची माणसीक गुलामगीरी आहे. शिवकाळ सुरू होण्या दरम्यानची उपलब्ध असलेली कागदपत्रे त्याच्या नोंद व काही बाबतीतले संदर्भगोळा केले पाहिजेत काही बाबी श्री. गणेश पलंगे यांच्या कडे पलंगा विषयी मिळाल्या. त्यातून आसे अनुमान निघते की राजमाता जिजाऊ ह्या जुन्नर येथे सुरक्षितता म्हणुन थांबल्या. अगदी त्या काळा पासून भवानी मातेचा पलंग सुरू झाला असावा. राहुरी येथे दरवर्षी नवी पालखी बनवली जाते. गावचे पाटील मंडळी व तेली मंडळी ती बनवुन तीची मिरवणूक व अनेक पंरपरेचे रिवाज आज ही साजरे करतात. या नंतर ती भिंगार येथे जाते. या ठिकाणी पालखी व पलंग यांची भेट होते. त्यांनतर पालखी तुळजापूराकडे मार्गस्थ होते. दसर्याचा छबीना याच पालखीत देवीला बसवुन साजरा होतो. यावेळी तेल घाण्यावर तयार झालेल्या पेंडीचा व भाकरीचा नैवद्य दाखविला जाते. हे शेकडो वर्ष सुरू आहे. आज आपन मान म्हणुन पहातो. मागे दडलेला आपला पराक्रम शोधला नाही आणी शोधला नाही म्हणुन आपण ही महाराष्ट्र घडविण्याचे शिल्पकार म्हणुन समोर येत नाही. हीच बाब गोब्राह्मण किंवा मराठे बाबत आसती तर त्यांनी याला शौर्याचे किर्तीचे गर्वाचे रूप दिले आसते आणी इतिहासाचे वारसदार म्हणुन यावर शेकडो पुस्तके लिहीले आसती.