इतिहास घडवीणारा तेली समाज व भवानी मातोचा पलंग ( भाग 3 )
हा पलंग जो आहे त्याचा इतिहास सुद्धा पुसट ठेवला आहे. आणी आम्ही नगर सबजेल चौकातील नगर पलंगे बांधव घेऊन जातत एवढेच समजतो. तो घोडेगाव येथे बनविला जात तोे येथे लाकडाचे कारीव काम करणार्या समाजाकडे असे त्यांना ठाकूर किंवा तुलवे म्हणत त्यांना त्याबद्दल दोन घरे वतन म्हणुन आहेत. ही घराणी कालांतराने पुणे येथे स्थालांरीत झाली. घोडेगाव, ता. अंबेगाव, जि. पुणे येथिल तेली समाज बांधव हा पलंग बनवुन घेतात बनवलेला पलंग हा तेली समाज संस्थेत ठेवतात येथे भावीक दर्शन घेतात. घोडेगाव येथिल जेष्ठ व जाणकार बांधव यांच्याकडे चौकशी केली असता समजले देवगीरीवर यादव राजे राज्य करीत होते तेंव्हा पासून भवानी मातेचा पलंग हा घोडेगांव येथुन पाठविला जात आहे. ही बाब जर सत्य धरली तर देवगीरीचे यादव हे सिन्नर येथे राज्य करिताना त्यांच्याकडे असलेल्या भवानी मांतासाठी याच ठिकणा पासून पलंग तिला दसर्या मध्ये छबिना खेळण्यास दिला जात असावा. याला आधार मिळतो. सुदूंबरे संस्थेचे सचिव व जेष्ठ बांधव जुन्नर यथील श्री. वसंत रघुनाथ कर्डीले यांनी तेली गल्ली मासिकात ऑक्टोंबर 2001 मधये या संबंधी आपले एैतिहासीक मत मांउले आहे. हा सर्व परिसर शहाजी राज्यांच्या जहागीरीत येत होता. आणी या वेळी एक सुरक्षित ठिकाण म्हणून राजमाता जिजाऊने जुन्नर येथिल शिवनेरी किल्ला निवडला. या जहागीरीतील पुर्ण माहिती असल्याने त्यांनी येथे येताच पुन्हा माहिती पक्की करून घेतली . यावेळी जीजाऊंनी नवस केला. ही भुमी स्वातंत्र्याची होती हे स्वातंत्र्य मिळावे. देवगीरी पडल्या नंतर सर्वत्र हहाकार आहे. स्वकीय व परकीय एकत्र येऊन इथे आपलाच नाश करीत आहेत. या साठी माझ्या पोटी जन्मघेणारा मुलगा हा स्वातंत्र्याचा संस्थापक होऊ दे. शिनेरीवर शिवाई देवीच्या साक्षीने छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. या काळापासून पुन्हा तो पलंग जुन्नर येथून भाद्रपद वद्या प्रतीपदेला तुळजापूराकडे मार्गस्थ होत आसतो. घोडेगावकर तेली समाजाच्या नेतृत्वा खाली व मराठा समाजाला सोबत घेऊन पलंग भाद्रपद शु. 6 ला जुन्नरला येतो. पुर्वी तो तेली समाज बांधवांच्या घरी उतरवत असत। ती घरे ही ठरलेली होती कै. हरिभा। सहादु कर्पे, कल्याण पेठ, कै. नाथु तुकाराम करडीले, रवीवार पेठ, कै. रामचंद्र बापूजी कर्पे, रवीवार पेठ, कै. आबा भाऊ करडिले, रवीवार पेठ यांच्या येथे 10 ते 12 दिवस मुक्कामाला कालांतरांने सन 1935 मध्ये या समाजाने तेली बुधवार पेठ मध्ये समाजाची वास्तु उभी केली. या समाजाच्या वास्तुत पलंग 10 ते 12 दिवस म्हणजे भाद्रपद वद्य प्रतिपदे पर्यंत. या सर्व काळात पलंगाची जबाबदारी समाज बांधव स्वीकारतात. दिवसभर जुन्नर शहर व पिरीसरातील भावीक रांग लावुन दर्शन घेतात. पलंग आणणे 10 दिवस सेवा करणे व मार्गस्थ लावणे या साठी येणारा सर्व खर्च समाज बांधव समाजाकडूनच गोळा करतात. या साठी तेली समाजा शिवाय देणगी मागीतली जात नाही. या पलंगा विषयी नगर येथिल श्री. बाबूराव पलंगे श्री. गणेश पलंगे यांच्याकडे विचारणा केली आसता त्यांनी या पंरपरेची सुरुवात शिवकाळा पुर्वी असावी करण ही बाब इतिहासात स्पष्ट ठेवलेली आहे. तरी ही जबाबदारी आम्ही पलंगे कुटूंबीय मंडळी सलग दोन महिने घरदार सोडून जबाबदारी पार पाडत आहोत. या मार्गावरील समाज बांधव शेकडो वर्षे पलंगाचे स्वागत व सेवा करीत आहेत.