इतिहास घडवीणारा तेली समाज व भवानी मातोचा पलंग ( भाग 4 )
माझ्या उमेदीच्या काळात बाळासाहेब पुरंदरे शिवचरित्र एकदा नव्हे तर 3/4 वेळा वाचले. किती स्फुर्ती मिळत होती ती अनुभवली. जेष्ठ चित्रकार दिनानाथ दलाल यांची चित्रे माझा जीव की प्राण होते. गणपती मंडळांना तर मी या रेखा चित्रावरून अनेक देखावे बनवुण दिले. पण जेंव्हा श्री संत संताजी व तेली समाज हा विषय गेली 30 वर्ष पाहू लागलो तेंव्हा कळू लागले. आरे ही तर एक बखर यात नुसता ब्राह्मण गौरव जाता जाता मराठा पराक्रम. पण यात तेली, माळी, सुतार, नाभीक, लोहार, मातंग, महार या जाती मधील बांधवांनी जो पराक्रम केला त्याची जाणीव सर्व पुस्तकात एक अक्षराने नाही. कारण आसे ही असावे बखर कार या समाजाचे नसावेत. दुसरे कारण असे असावे मुद्रण कला अस्तवात आल्यावर इतिहास संशोधन करण्यासाठी अनेकांनी विश्वासाने कागद पत्रे दिली ती लगेच नष्ट झाली का तर इतिहास हा त्यांना सोईचा लिहायचा हेाता. यातुन संत तुकाराम सुटले नाहीत तर इतरांची काय अवस्था असेल हे स्पष्ट होते. तरी सुद्धा आज जे त्यांच्या अतीरेकी कार्यवाहीतून जे शिल्लक आहे त्यावर संशोधन करणे तेवढेच गरजेचे आहे.