श्री. भगवान बागूल (पत्रकार), मालेगाव (नाशिक ) मो. 9823340409
समाजजीवनात व राष्ट्रजीवनात काही आदर्श हे एैतिहासिक व आदर्शवत असतात. अनेक पिढ्या त्यापासून प्रेरणा घेतात एवढेच नव्हे तर ते इतिहासाचे साक्षीदार असता. यातील ज्या व्यक्तिंमुळे हा इतिहास घडतो त्या व्यक्ती आदराचा विषय बनतात तेली समाजाच्या उत्कर्षासाठी झटणारी मुंबईची शनेश्वर फाऊंडेशन ही संस्था समाजआदरास विषय बनली आहे. त्या संस्थेच्या व्यक्ति म्हणजे तेल्यांचे बाबा आमटे बनले असे म्हंटले तर वावगे होऊ नये. असे काय आहे. या संस्थेच्या कार्याबाबत ? त्या कार्यापासुन तुम्ही आम्ही काय बोध घेणार ? प्रगतिच्या अनेकं योजने दुर असलेल्या तेली समाजाला अशा संस्थांचे कार्य दिशा देणारे ठरले. अशा अनेक संस्थांच्या उभारणीने प्रगत समाजाच्या समान पातळीवर नेण्यास मदत होईल.
या संस्थेंचा सर्वांगाने परिचय होण्याचे कारण ठरले ते म्हणजे गेल्या वर्षीपुंडलिक संपत चौधरी पुरस्कार या संस्थेने मिळविला तेली समाजाच्या उत्कर्षासाठी झटणार्या व्यक्तिस गेल्या दहा वर्षापासुन हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत व्यक्तीस दिला जाणारा हा पुरस्कार प्रथम नियम मोडून संस्थेस दिला गेला. कारण या संस्थेचे हिमालया एवढे कार्य हे होय. ज्या निकषांच्या आधारे निवड समितीने निवड केली ते निकष प्रगतिचे मैलच होय !
1) स्थापना
1991 साली खरे तर विक्रोळीचे शनिमंदिरात मंदिर जिर्णोद्वारासाठी एकत्र जमण्याचे निमित्त झाले. त्याच वेळी शनेश्वर फाऊंडेशन नावाची निश्चिती झाली. मंडळाचे सदस्य एकत्र येऊ लागले. निश्चित कालावधित निश्चित प्रकल्पांची पुर्ती हा हेतु घेऊन हे मंडळ कार्यरत झाले. या मंडळाने मंदिराचा जिर्णोद्धार केला. ते केवळ तेली समाजाचेच श्रद्धास्थान बनले नाही तर मंबई उपनगरांचे श्रद्धास्थान बनले इतके महत्व या मंदिराने अल्पावधीत मिळविले.
2) संताजी महाराजांच्या वह्यांचे लॅमिनेशन -
हे या संस्थेचे महान कार्य होय. संत श्रेष्ठ संताजी महाराजांच्या 350 वर्षापुर्वीच्या मुळ वह्यांचे जतनच नव्हे तर हस्तलिखित वह्यांच लॅमिनेशन करण्याचे एैतिहासिक कार्य केले. अभ्यासुसाठी महत्वाचा संस्कृतिक ठेवा सुरक्षित ठेवण्यात त्यामुळे मदत मिळाली. त्यामुळे तुकारामाची गाथा परमेश्वराने नदीतुन वर आणली की संताजी महाराजांनी स्मरणाशक्तिने लिहुन काढली हे स्पष्ट होईल तुकारामांचे अक्षर की संताजी महाराजांचे या पुराव्यावरून हा वाद मिटण्यास मदत झालीच आहे. परंतु अद्यापही विविध मालीकांवरून गाथा परमेश्वराने च काढली असे समाजमनात बिंबवले जात आहे. वास्तव असे आहे की गाथा बुडविल्यानंतर तुकारामांनी अन्यत्याग केला. त्यात त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणुन संतश्रेष्ठ संताजी महाराजांनी परिसरातीलगावे पिंजून काढून काही भाविकांकडून तर काही स्वत: मुखतगोत ओवींवरून ही गाथा 15 दिवसात लिहुन काढली. परत आल्यावर तेथील मंदिराजवळील पोरांच्या टोळक्यांच्या कानात सांगीतले की गाथा इंद्रायणीतून परमेश्वराने वर काढल्या ही पोरं हेच पळत सांगत सुटले या गाथेचे त्यांनी प्राणपणाने जतन कसे केले, मोगली आक्रमकांपासुन तिचा बचाव कसा केला हा इतिहास आहेच.
3) सामाजिक सुरक्षा योजना :-
एकदम कोसळलेल्या आर्थिक संकटांमुळे माणुस खचतो हतबल होतो. जर समजा हृदयविकाराच्या झटक्याने कुटूंबप्रमुखच गेला तर त्या कुटूंबाचे काय ? त्याच क्षणाला मदतीला कोण धाऊन येणार केवळ मृत्यूच नाही तर गंभीर आजारपणासाठी उपचारासाठी पैसे कोठुन आणणार ? लग्न, शिक्षण फी यासाठी पैसा कसा उपलब्ध करणार ? या व यासारख्या आर्थिक समस्यांच्या सोडवणुकी साठी ज्ञानेश्वर फाऊंडेशनने सुरू केली सामाजिक सुरक्षा योजना ! या योजनेचे स्वरूप असे. या योजनेनुसार सभासद समाज बांधवाने ठराविक निधी दरवर्षासाठी ठराविक मुदतीत गुंतवायचा त्यात संस्था स्वत: काही पैसे टाकते हा निधी 20 वर्षद्यावयाचा तुमचे वय 18 ते 25 दरम्यान असेल तर कायम निधी 1500 रू. आधिक संस्था 100 टाकते त्यामुळे सभासदाच्या खात्यावर 1600 रू. जमा होतात हा निधी 20 वर्षानंतर व्याजासह परत मिळतो. 25 ते 35 वयोगटासाठी 2000 कायमनिधी तर 35 ते 45 वयोगटासाठी 2000 रूपये, 35 ते 45 वयोगटासाठी 2500 रू. कायम वर्गणी आहे. हा निधी इतर कोणत्याही कामासाठी वापरला जात नाही. आतापर्यंत मृत पावलेल्या 66 कुटूंबियांना 26 लाख 91 हजार रूपयांच्या निधीचे वाटप झाले, दु:खै दैन्य विहीनता असे ब्रिदवाक्य या योजनेत वापरले आहे. या योजनेने खरोखरच दु:ख दैन्य यांचा नाश झाला आहे. ती नाहिशी झाली आहेत. आतापर्यंत 1300 सभासद असुन या योजनेत संस्थेकडे 60 लाख 73 हजारापेक्षा आधिक रक्कम शिल्लक आहे.
4) बळ देऊ पंरवांना -
समाज्यातील दारिद्रय रेषेखाली जीवन जगणार्या सामजाबांधवांच्या मुलांना केवळ दारिद्रायामुळे शिक्षण घेता येत नाही अंगी हुशारी कष्ट करण्याची तयारी असुन ही हे सोशल टॅलेन्ट वाया जाणार कां ? या एकाच समस्येे या क्रियाशिल कार्यकर्त्यांना अस्वस्थ केले. या मुळ संकल्पनेतुन ही संस्था उदयास आली मोठी झाली समाजाच्या आदराचा विषय बनली. पुंडलिक संपत चौधरी पुरस्कारासारख्या अन्य पुरस्कारांची धनी झाली.
बळ देऊ पखांना असे ब्रिद घेऊन समाजाच्या गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते 1992 - 93 या शैक्षणिक वर्षात सुरू झालेल्या या योजनेत पहिल्या वर्षी फक्त चार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली गेली त्यात दरमहा 500 रु. याप्रमाणे पहिल्या वर्षी 24 हजार रूपये वाटले. या रोपट्याचे असे संगोपन केले की त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आता दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रूपयांची आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत 326 विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले तब्बल 85 लाख 80 हजार रूपयांचे वाटप करण्यात आले शैक्षणीक मदतीचे तेली समाज कार्यकर्त्यांनी हाच आदर्श घेऊन कार्य केले तर समाजातील कोणताही गरीब विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहणार नाही. स: विद्या विमुक्तये असे बोधचिन्ह वापरुन संस्थेने या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. माजी आ. डॉ. एल.एम.परिहार हे या योजनेच मुख्य आधारस्तंभ. या एकट्या माणसाने संस्थेला ताकद प्राप्त करून दिली अगदी उदाहरणच द्यायचे झाले त्यात एकट्या डॉ. परिहार यांनी 4 लाख 70 हजार रू. जमा केले. उत्तर प्रदेशातुन मुंबईत स्थिरावलेले हे नामवंत सर्जन होते. तेली समाजाचा त्यांना अभिमान होता. माझ्या जातीचा कोणताही गरीब विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये. ही त्यांची धारणा होती. विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियानी आर्थिक मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. आज ही सर्वाधिक निधी त्यांचाच असतो. गेल्या वर्षापर्यंत 326 विद्यार्थ्यांचा पुर्ण शिक्षणाची जबाबदारी (शै.फीची) उचली त्यात 74 डॉक्टर्स 196 अभियंते घडविले. समाज मदतीने जीवन मिळालेल्या या विद्यार्थ्यांनी इतर अशाच गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी अशी अपेक्षा संस्था धरून आहे.
हुशार व होतकरू मुलांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्व पटवुन आर्थिक शिष्यवृत्ती देणारी शैक्षणीक शिष्यवृत्ती योजना म्हणुनच समाजाचा दीपस्तंंभ ठरली आहे गेल्या वर्षापर्यंत संस्थेने 85 लाख 80 हजार रूपयांचे वाटप केले आहे. या योजनेसाठी संस्थेकडे 72 लाख 64 हजार रूपयांचा निधी होता आता तो कोटीपर्यंत पोहचला असेल.
5) आंबेडकर घडविण्याची प्रक्रिया -
शिका संघटित व्हा संघर्ष या त्रिसुत्रीच्या द्वारे डॉ. बाासाहेब आंबेडकरांनी गेल्या 50/60 वर्षात हीन दीन अवस्थेतला दलित प्रगत समाजाचा रांगेत आणुन बसविला त्यात होते नियोजन, जागफती, शिक्षणाबद्दलची कमालीची जागृकता, सामाजिक एकता असे किती मार्ग या नात्याने दिले. ज्ञानावर मालकी मिळवा जग तुमच्या पायावर लोळण घेईल हे सुत्र तर जगाताचा कोणत्याही जातीला, धर्माला लागु पडते. मात्र त्यासाठी हवी ज्ञानापिपासू वृत्ती कष्टावर अविरत श्रद्धा जाणिव पूर्वक पिकाला खतपाणी घातले तर पिक जोमाने येणार च ! म्हणुन बुद्धीमान विद्यार्थ्यांच्या जगात सर्वात पुढे राहील. संस्थेने हे मर्म ओळखुन स्थानिक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे. मुंबई सारख्या ठिकाणी जेथे राहावाचा प्रश्नच बिकट असतो. तेथे स्वतंत्र अभ्यासिका कोठून येणार ? ही अडचण लक्षात घेऊन संस्थेत हा उपक्रम सुरु केला.
6) अद्ययावत कार्यालय :- संस्थेचे अद्ययावत कार्यालय असुन भव्य सभागृहही आहे विद्यमान अवस्थेत जवळपास 1 कोटी रूपयाचे वास्तुमुल्य असलेली इमारत आहे विक्रोळीचे शनेश्वर मंदिरात दर शनिजयंतीला मोठा उत्सव होतो. एकंदरीत धार्मिक अभिसरणातही ही संख्या अग्रेसर आहे. संस्था वधुवर मेळावे घेते आतापर्यंत देान वेळा वधुवर मेळावे घेतले. येणार्या काळात सभासद संख्या (कायम) वाढविण्याचा उद्देश असुन त्याद्वारे शिक्षणनिधी एक कोटीच्या पुढे करण्याचा संस्थेचा मानस आहे.
संस्थेचा प्रत्येक कार्यक्रम आदर्श असतो. पुंडलिक संपत चौधरी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मी व सामाजिक कार्यकर्ते रमेश उचित हजर होतो. यावेळी आम्ही येथील आदर्श क्रार्यक्रम पाहुन स्तंथित झालो. डॉ. श्याम शिदे म्हणजे या संस्थेचे बाबा आमटे आहेत. विखुरलेल्या समाजाला आपलेपणा जोपासणारी मुंबईत स्थिरावलेली परंतु महाराष्ट्रातुन आलेली आणि 25 पेक्षा आधिक तेली पोटजाती व त्यांची अस्मिता जोपासणारी मंडळींना फक्त तेली या एकाच झेंड्यात आणुन त्यांना सक्रीय करण्याचा विडाच उचलण्याचे काम या मंडळींनी केले. आणि 2 ऑक्टेाबर 1989 रोजी पहिला परिचय मेळावा घेतला. निमित्त ठेवले समाजासाठी आयुष्यभर झिजलेले संताजी प्रसादचे संपादक गो. ना. चौधरी यांचा सत्कार निमित्त स्मरणिका व त्यात 1200 समाजबांधवांची सुचि या संस्थेचे बिजारोपण सुर झाले. 6 फेब्रुवारी 1991 ला बीपीटी ऑक्ट खाली ही संस्था नोंदली गेली 28 मार्च 1991 ला. म्हणजे नोंदणीनंतर पहिल्याच महिन्यात शनेश्वर मंदरावा जिर्णीेद्धाराचा कार्यक्रम घेण्यात आला. भारत सरकारचे तत्कालीन वित्तराज्यमंत्री ना. शांताराम पोटदुखेंचा कार्यक्रम 17 नोव्हेंबर 1991 घेण्यात आला. डॉ. परिहार यांचया प्रेरणेन सामाजिक सुरक्षा योजना त्याच वर्षी सुरू करण्यात आली. म्हणजे स्थापनेच्याच वर्षीत कितीतरी कार्यक्रम सुरू झाले. 1993 मध्ये विद्यार्थी शिषयवृत्ती योजना सुरू झाली ही योजना देशात तेली समाजासाठी राबविण्यात आलेलया योजनेत सर्वश्रेष्ठ योजना असलचे माझे मत आहे. शिष्यवृतीत वाढ करण्यासाठी 1995 मध्ये प्रसिद्ध गायक खानवीलकर यांचा कार्यक्रम ठेऊन निधी वाढीचा उपक्रम ठेऊन आवजकी दुनिया हा गायक खानविलकरांचा कार्यक्रम ठेऊन या कार्यक्रमाद्वारे 20 लाख रू. ची भरीव वाढ झाली. 2008 मधये प्रेरणा कार्यक्रम हनुमान थेअटर मध्ये झाला विद्यार्थी व देणगीदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी गुजराती समाजाने नवग्रह मंदिर उभारले 70 70 हे त्याचे क्षेत्रफळ असुन या समाजाने 25 लाख खर्च केले.
सुमारे 1 कोटी निधीकडे वाटचाल करणार्या या संस्थेचा आर्थिक कारभार अत्यांत पारर्दक आहे. स्थापनेपासुन आजपर्यंत गेल्या 24 वर्षात एकदाही आर्थिक हिशोब पत्रक सभासदांना उशिरा मिळालेले नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात अनेकांसारखे आपले नशिब अजमावणे, व्यवसाय वद्धीसाठी कलेसाठी हे शहर निवडतात. राज्य व राष्ट्रीय शासनाची प्रमुख कार्याये या शहरात आहेत. या सर्व संस्थांमध्ये काम करणार्या परंतु राष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळालेल समाजबांधवांचा सत्कार हे ही या संस्थेचे ऊलेखनिय कार्य आहे. आम्ही उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात पुढील व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला त्यांचे डोंगराएवढे कार्यपाहुन आणि हा तेली समाजाचा माणुस (?) हे समजुन आमची मान ताठ होते. डोके नतमस्तक होते. 32 वेळा चित्रप्रदर्शन भरविणारे किशोर नादावडेकर पाटबंधारे विभागात डेप्युटी कमिशनर असणारे जयंत दिवटे, प्रिंटर निर्माते सुभाष मलते, बोरीवलीच्या नगरसेवकिा सिद्ध सुरसंगे, टाटा उद्योग समुहाच्या ह्युमन रिसोर्स च्या जनरल मॅनेजर सौ. जानकी नाईक, काुँग्रेसचे नगरसेवक राम आशिश गोपाल गुप्ता, राष्ट्रीय रायफल स्पर्धेतील महिला खेळाडू जे जे स्कुल ऑफ आर्टचे खयातनाम चित्रकार अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले तसेच मोडी भाषा तज्ञ म्हणुन ओळखले जाणारे प्रा. सुनिल यशवंत नांदीस्कर, मुंबईचा लालबागच्या राज्याची मुर्ती बनविणारेमुर्तीकार विलास त्रिंबककर, देशाविदेशात 8 हजार पेक्षा आधिक ऑकेस्ट्राचे कार्यक्रम करणारे सुधिर सिन्हा आम्ॅर्केस्ट्राचे मालक सुनिल खानविलकर 2007 पासुन कायम नगरसेवक म्हणुन निवडुन येत अलेले विधी समितीचे अध्यक्ष असलेले रमाकांत रहाटे, हॉलंड मधु पीएचडी मिळविणाररे डॉ. वनित चिलेकर, जे. जे. सकुल ऑफ आर्टचा 5 वेळा सर्वोत्कृष्ट पोर्ट्रेट चा पुरस्कार मिळवणारे अरूण गोंगाडे (याच गोंगाडेंना अॅनिमेशन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपतिंनी 5 चेळा सन्मानित केले आहे देश विदेशातील नामांकित मासिकात मुखपृष्टे बनवितात.) पोलीस अधिकारी धनराज भंसाळी (श्री भंसाळी हे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असुन त्यांनी 5 पुस्तके प्रकाशित आहेत ते नामांकित वक्ते आहेत.) सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ राजा शिवाजी विद्यालयाच्या सौ. उत्पला शिंदे (जर्मन कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत नासा येथे भारताच प्रतिनिधत्व) मुंबई विद्याीपीठ प्राध्यापक संघटनेचे सचिव डॉ. विजय पवार आदीचा सतकारार्थीत समावेश होता.
या संस्थेसाठी डॉ. श्याम शिंदे विश्वस्त प्रभाकर कोते, आदी कार्यरत आहेत. प्रसिद्धीपासुन दुर राहुन पर्वता एवढे काम करार्या या कार्यकर्त्यांच्या कार्याची पद्धत कणभर काम मणभर प्रसिद्धी करणार्यांना एक धडाच आह. कुटूंबाचा आधार गेला उत्तर कार्य करायला ही पैसे नाहीत एवढेच नव्हे अत्यंविधीलाही पैसे नाहीत असे असतानांही ही संस्था कशी मदतीला धावली असे स्पष्ट करणार्या चित्रफित पाहिल्या म्हणजे प्रत्येक पाहणार्यास गहिवरून येते या संस्थेने वृत्तांत हे मासिक चालविले आहे तेली प्रबोधनाचे काम त्याद्वारे चालविले जाते.
तुमचे योगदान काय ? समाज मित्रानों, संस्थेची स्तुती करणे व निव्वळ कार्याचा परिचय करून देण्यासाठी हा लेख प्रपंच नाही 1) हा लेख वाचणार्यान स्वत:या संस्थेला वार्षिक मदत म्हणुन किमान 1000 रू. चा चेक डॉ. श्याम शिंदे , श्री शनेश्वर फाऊंडेशन, 18/ए/147/151, शिंदे बिल्डींग, साने गुरजी मार्ग, चिंचपोकळी ।, मुंबई 11 या पत्यावर पाठवा. चेक श्री शनेश्वर फाउंडेशन य नावाचा असावा. तुमची फक्त एक हजाराची मदत तेल्यांचे गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवायला मदत करेल. खारीचा वाटा तुम्हाला समाधान देईल. पण भविष्यातले तुम्ही तेल्यांचे आंबेडकर घडविणयात मदत केली असे होईल. 2) तुमचा वाढदिवस तुम्ही वेगळ्या पद्धतीने साजरे करु शका संस्थां एक विद्यार्थ्यास दहा हजार रूपये मदत देते तुम्ही फक्त एक विद्यार्थी दत्तक घेऊ शकत नाही ? असे केले तर तुम्ही खरा ाढदिवस साजरा केला असे होईल. 3) तेली समाजात आदर्श उपक्रम कसे राबवावेत ? हे पाहण्यासाठी उपक्रम सुरू करण्यासाठी संबंधित संस्थेला भेट देण्याची सहल आयोजित करावी वा संबंधित पदाधिकार्यांची विद्यर्थिी सत्काराच्या वेळी व्याख्याने आयोजित करावीत. 4) गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ज्वलंत झाला आहे. त्यासाठी हजारो शनेश्वर फाउंडेशन संस्थांची गरज आहे. प्रतयेक जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यातील हा प्रश्न सोडवावा त्यासाठी शनेश्वर फारम्युला वापरावा. जिल्ह्यातील एक हजार देणारे फक्त एक हजार समाजबांधव शोधले तर 10 लाख निधी गोळा होईल तर 100 गरीब विद्यार्थ्यांचा फिचा प्रश्न सुटेल तैलिक महासभेने हा प्रकलपात रस दाखवावा पण सुधारणेचा कोणताही मार्ग या संघटनेला टीका वाटते एवढेच नव्हे तर तीन मूख्यगुरू आपणच प्रवक्ते असल्याच्या थाटात तुटून पडतात. 5) अत्यंत पारदर्शक सामाजिक कारभार कसा करावा हे याच संस्थेकडून शिकावे. मेळावे घेतात लाखो गोळा करतात परंतु वर्षानुवर्ष हिशोब देत नाही. ट्रस्टी म्हणवतात पण समाजाच्या पैश्यावर मोटारित फिरतात ? या पेक्षा वाईट ते काय ? दरवर्षी वार्षिक अहवाल ते देतात कां हे पाहावे 6) आपले कार्यालय समाजसेवेचे मंदिर कसे व्हावे हेही यापासून शिकणार की नाही ? 7) समाजसेवा सतिचे वाण आहे ते करुन ही हवेत न चालता सतत जमिनीवर कसे राहावे हे ही यापासुन शिका 8) संस्था प्रगतिचा मैल बनली तर तिच्या पायाच्या दगडांना धन्यता वाटत तुम्ही ज्या संस्थेत आहात ती तशी आहे ना ? नसल्यास करा, 9) दरवर्षी किंवा पाचवर्षांनी संस्थेत आहे ती तशी आहे ना ? नसल्यास करा. 9) दरवर्षी किंवा पाचवर्षांनी संस्थेची मालमत्ता वाढली तरच मंडळ क्रियाशिल हे समजा, 10) तेली समाजाच्या उत्कर्षासाठी माझे योगदान काय ? कसे ? ह्यापासुन शिका ?
भगवान बागूल
(पत्रकार) मालेगाव (नाशिक )
मो. नं. 9823340409