रमेश भोज, विश्वस्त तेली समाज पुणे मो. नं. 9604767068
लग्न झाल्यानंतर वर्षाच्या आतच दोघा नवरा - बायको यांचे पटत नाही दोघांच्या आवडी निवडी फारच वेगळ्या असल्याकारणाने त्यांचे विचारही साहजीक वेगळेच असणार. त्यामुळे रोजच कटकट, वाद, कामावर येता जाता वाद आगदी किरकोळ कारणावरून भांडण. त्यामुळे दोघेही विचार करतात की पुढे पुर्ण आयुष्यभर वाद घालण्यापेक्षा वेळीच आपण वेगळे झालेलो बर म्हणुन दोघेही एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्यास तयार होतात. अशा प्रकारे घटस्फोट घेणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हि संख्या कमी करणे फार गरजेचे होऊन बसले आहे.
मुलींचे उच्चशिक्षण भरपुर पगाराची नोकरी आणि अपेक्षा भरपुर स्वत:च्या स्वभावामध्ये बदल करणार नाही आणि कोणी समजुन सांगीतले तर पटणार नाही. सहनशक्तीचा वापर करणार नाही थोड्या थोड्या कारणावरून दोघांमध्ये वाद होणार ते विकोपाला जाणार आणि मग विभक्त होण्याचा पर्याय एकमेकांच्या संमतीने घेणार. या सर्व प्रकरणामध्ये आईवडीलांना त्रास होणार. त्यासाठी लग्नाचा अर्थ अगोदर समजुन घेणे फार गरजेचे आहे. दोघांमधील संवादही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे नाते टिकण्यास मदत होते.
सध्याचा काळ बदलत चालला आहे. पुर्वी मुलींचे शिक्षण फारच कमी असायचे जास्ती जास्त 10 वी पर्यंत शिकवीले जायचे परंतु सध्या मुली मुलांपेक्षाही जास्त शिकलेल्या आहेत. स्वत:च्या पायावर उभे राहू लागल्या आहेत. स्वावलंबी बनु लागल्या आहेत. पुर्वी शिक्षणाचा अभाव असल्यमुळे महिलांना घरकामाशिवाय पर्याय नव्हता. आता उच्चशिक्षणामुळे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. आता ती पुरूषांच्या बरोबरीन काम करु लागली आहे. पगारही भरपुर त्यामुळे तीलाही वाटणे साहजीकच आहे की आपण का कमी पणा घ्यायचा ? या सर्व गोष्टी मुळे त्यांना स्वतंत्र विचार आहे. एकत्र कुटूंब पद्धती त्यांना पसंत पडत नाही . संसारात काही बिनसले तर स्वतंत्र (वेगळे) रहाणे अधिक पसंत करतात.
प्रत्येकाचा जोडीदार हा परमेश्वरांने अगोदरच ठरवीलेला असतो. आपण फक्त नाम मात्र निमित्त असतो. हे सर्व पारंपारीक पद्धतीने चालत आलेले आहे. एकमेकांचे विचार पटणे फार गरजेचे झाले आहे. स्वभाव भिन्न असल्यामुळे आपसात पटत नाही एकमेकांत समझोता करूण परस्पर निर्णय घेवून आमचे जुळत नाही, आमचे आचार, विचार रहाणीमान वेगळे असल्यामुळे आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही असे अनेक प्रकारच कारणे दाखवून घटस्फोट घेवून वेगळे रहाण्याचे प्रमाण समाजात सध्या फारच वाढले आहे. त्यामुळे नातेसंबंधात एक प्रकारची दरी निर्माण झाली आहे. सध्याच्या काही मुली स्वत:मध्ये बदल करूण घ्यायला तयार नाहीत. त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे स्मार्ट फोन, फेसबुक, व्हॉटस अॅप, चॅटींग हे मेन कारणे दोघा नवरा बायकोचे भांडणाचे आहे न पटण्याचे आहे. दोघेही आपआपल्या नादात असतात, दोघांचा संवाद नाही चर्चा नाही हे कवेळ एका स्मार्ट फोन मुळेच.
प्रत्यक्षात एकमेकांचे बोलणे कमी झाले आहे आणि वाद वाढत जातात त्यामुळे दोघांचे नाते धोक्यात येते. अति शिक्षण आणि भरगच्च पगाराची नोकरी यामुळे अहंकार निर्माण होतो कारण दोघेही आर्थीक दृष्ट्या सक्षम असतात. त्याला वाटले तिने माघार घ्यावी माझे एैकावे तीलाही वाटते त्याने माघार घ्यावी माझे एैकावे कोणीही कमी पणा घ्यायला तयार नाही. या सर्व कारणांमुळे दोघांमध्ये तनाव निर्माण होतो. एकमेकांवर संशय घेणे सुरू होते. आणि या संशयामुळे घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यासाठी दोघा नवराबायकोचा संवाद होणे चर्चा होणे एकमेकांसाठी वेळ देणे एकमेकांच कौतुक करणे संसारीक चर्चे बरोबर भावनीक चर्चाही तेवढीच महतवाची आहे स्पर्धा टाकावी किरकोळ मतभेद टाळुन आपले कौटुंबीक जीवन सुखी करावे नातेवाईकांचा आदर करावा विशेषकरून आईवडिलांचा आदर करावा सर्व जबाबदार्या पार पोडून तडजोडीची भुमीका पार पाडावी. त्यामुळे आपल नाते अधिक घट होण्यास मदत होते. आणि ते किती तानायचे किती टिकवायचे का त्या नात्याचा शेवट करायचा ? हे ज्याने त्याने ठरवायचे असते परंतु एकदा की नाते तुटले की मनाला फार वेदना होतात त्याच बरोबर आपल्या आईवडिलांना फारच त्रास सहन करावा लागतो.
सध्या एकमेकांच्या संमतीने विभक्त होण्याच प्रमाण भरपुर वाढलेले आहे घटस्फोट जर मुले झाल्यानंतर झाला तर मुलांचे फार हाल होतात. कारण मुलांना आईबाबा दोघेही हवे असतात त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम होऊ. शकतो. कारण घटस्फोट ही फार मोठी दु:खदायक अशी घटना आहे की दोघांच्याही मनावर फार मोठी जखम होऊ शकते. त्यामुळे वैवाहीक जीवणात तडजोड ही पाहिजेच.
प्रत्येकाने लग्नाच्या अगोदर जोउीदाराविषयी फार स्वप्ने पाहिलेली असतात. आणि ती सत्यात उतरावयाची असतात. त्यासाठी वैवाहिक जीवनात तडजोड ही पाहिजेच असते. त्याशिवाय पर्याय नाही. आपला जोडीदार सर्वगुण संपन्न पाहिजे ही अपेक्षा ही सर्वांनाच असते. आणि तसा हट्टही असायला पाहिजे. परंतु प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो ते सर्व जमवून घेतल की त्याची सवय होऊन जाते आणि त्याप्रमाणे आपल्या जोढीदाराचा स्वभाव बदलण्यास वेळ लागत नाही. आपल्याला त्याच्याकडुन जेवढ्या अपेक्षा असतात तेवढ्याच अपेक्षा त्यालाही तुमच्याकडुन हव्या असतात. त्यासाठी आपण नेहमी आनंदी व उत्साही असणे गरजेचे आहे.
जोडीदाराला योग्य तो आदर सन्मान देणे, त्याच्या भावना समजावून घेणे, एकमेकांसाठी वेळ देणे महत्वाचे आहे.
सध्याच युग म्हणजे दोघेही नोकरीला असणारं युग आणि त्या ठिकाणी मित्र किंवा मैत्रिन असणरच पण ते ऑफीस पुरते ठिक आहे आणि तेही ठरावीक मर्यादेपर्यंत त्यासाठी आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणे. एकदा जर त्या विश्वासालाच तडा गेला तर आपल संपुर्ण जिवण उध्वस्त झाल्या खेरीज रहाणार नाही हे ही तेवढेच खरे आहे. रोज संशयाचे वारे डोक्यात शिरूण वाद होत जाणार आणि ते वाद विकोपाला जावुन त्याचे रूपांतर घटस्फोटात होणार. हे टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यामध्ये दोघांनीही सहभागी असणे गरजेचे आहे. दोघांमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. अगदी शांत डोके ठेवून एकमेकांचे एैकुण घेतले पाहिजे. आपल्याला काय सांगायचे हे समोरच्या व्यक्तीला समझेल अशा सोप्या भाषेत आदराने हळुवारपण सांगीलते तर त्यात मार्ग निघू शकतो.
सध्याच्या काळात मुले मुली लग्न जमल्यानंतर फोनच्या माध्यमातुन एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यावेळेसच आपल्या जोडीदाराला जाणुन घेणे फार महत्वाचे असुन त्याचा उपयोग आपल्याा भविष्यात होऊ शकतो आपल्या कल्पना, अपेक्षा , आवडी निवडी मनमोकळे पणानं सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले वैवाहिक जिवण सुरळीत पार पडू शकते.
वाढत्या घटस्फोटांचे कारणे म्हणजे .........
सध्या एकत्र कुंटूंब व्यवस्था लयास चालली आहे पुर्वी एकत्र कुटूंब पद्धती असल्यामुळे वडिलधार्यांचा धाक असायचा आणि अता त्यांच्या पुर्णपणे उलटे आहे. स्वतंत्र राहून एकमेकांशी वाद घालतात आणि त्याचे रूपांतर घटस्फोटात होते.
जोडीदाराच्या मताला किंमत न देणे मी म्हणेन तसेच व्हायला पाहिजे हा अट्टहास असणे.
ऑफीसमधुन घरी आल्यावरही मित्र मैत्रीणीबरोबर फोनवर बोलणे म्हणजे संशयाचे वातावरण तयार होणे.
एकमेकांना वेळ न देणे बारीक सारीक सारीक गोष्टी वरूण सारखी चिडचिड करणे अपमानास्पद वागणूक देणे व्यसणाधीन असणे, एकमेकांच्या आवडी निवडी भिन्न असणे माहेरच्यांना आर्थिक झळ बसेल अशा गोष्टींची मागणी करणे.
सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तीचा प्रगार त्याच्यापेक्षा जास्त असणे त्यामुळे इगो निर्माण होण आणि जोडीदाराला कमी लेखणे.
वाढते घटस्फोट हे हर्षा, अहंकार, संशय, शिघ्रकोपी स्वभाव या दुर्गूणांमुळे होत आहे. त्यामुळे संस्कार पुर्णपणे विसरलेले आहेत.
परिणाम :- घटस्फोटीत असल्यामुळे पुनर्विवहास वेळ लागणे, वय वाढत जाणे।
:- घटस्फोट झाल्यानंतर दोन्ही बाजुंची प्रगती खुंटते शाररीक माणसिक स्थिती बिघडते. मनाची बैचेनी वाढते.
-ः आईवडिलांच्या मनावर परिणाम होऊन ते अडचणीत सापडतात घरातील शांतता बिगडून जाते समाजात जाणे टाळले जाते.
:- मुलांच्या मनावर परिणाम होऊन त्यांचे जिवण व तुमचे वैवाहिक जिवण अस्थीर होऊ जाते.
हे सर्व टाळायचे असेल तर :-
* बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरीक सौंदर्य तपासले पाहिजे
* कष्टावर धारणा असणारा जोडीदार युवतीने निवडला पाहिजे.
* इगो आणि अहंकार दोघांनाही असता कामा नये.
* एकमेकावरचा संशय टाळणे ही तेवढेच गरजेचे आहे.
* एकमेकांच्या आईवडिलांचा आदर दोघांनीही करणे गरजेचे आहे.
यासाठी घटस्फोटाचे प्रमाण कमी करणेची गरज आहे. एकमेकांच्या संमतीने असो वा नसो घटस्फोट ही अतिशय वेदना देणारी घटना आहे. फक्त एकमेकांनाच नाही तर आईवडिलांनाही त्याचा त्रास होतो. घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यापेक्षा ते होऊ नये यासाठीच सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेथे फसवणूक झाली आहे, अन्याय होत आहे. तेथे मात्र वेळ न घालवीता घटस्फोटा शिवाय पर्याय नाही...... तो घ्यायलाच पाहिजे.
धन्यवाद !!!!
रमेश भोज, विश्वस्त तेली समाज पुणे
मो. नं. 9604767068