सेवा, त्याग, निष्ठा व धडपड या वाटेवर चालणारी ही एक समाज संस्था. या परिर्वतनाची सुरूवात साधारण तहा २४ वर्षापुर्वी सुरू झाली. या परिसरात पिड्यान पीड्या रहाणारी सायकर, शेलार ही मुळ घराणी. पिडीजात व्यवसाय ही वाटचाल. स्वातंत्र्य मिळताच या परिसरात यंत्रे आली आणि यंत्र येताच महाराष्ट्रातील कुशल अकुशल कामगारांचा लोंडा येथे येऊ लागला. यात समाज बांधव होते. नोकरी निवारा यात वर्ष जाऊ लागली. प्रत्येक जन समाजाचा शोध घेऊ लागला. पण अफाट पसरलेल्या शहरात हा शोध घेणे तेवढेच महाकठिण. आशा वेळी श्री. विनोद रहाटे, श्री. अनिल राऊत यांनी कधी पायी कधी सायकलवर समाज बांधव शोधुन काढले. यातुनच चिंचवड स्टेशन जवळील एका सभागृहात २३ वर्षा पुर्वी एक परिचय संमेलन आयोजित केले. या कार्यक्रमाचे प्ररेणास्थान व अध्यक्ष स्वातंत्र सेनानी सदाशिव सायकर होते. प्रमुख उपस्थीती मध्ये अँड. रेखाताई डिंगोरकर, अभिमन्यु दहितुले होते. अण्णा सायकर यांनी या परिसरात स्थिर झालेल्या समाज बांधवांना संघटन व समाज या बाबत मार्गदर्शन केले. खर्या अर्थाने हजारो संख्येनेया परिसरात स्थीर झालेल्या बांधवांना दिशा दिली.
आज कोणाच्याही लक्षात ही घटना नसेल ही परंतु त्या दिवशाी आम्ही प्रसिद्ध केलेल्या अंकात आज ही हा विषय आमच्याकडे संग्रहीत आहे. आज जास्ती जास्त २ हजार रूपये घेऊन वधुवरांचे मॉल भरवले जातत हे महाराष्ट्राचे वास्तव ही आहे. परंतु याच शहरात श्री. धोंडीराम शेठ सायकर यांच्या मार्गदर्शाना खाली फक्त १० रूपयात वधु-वर मेळावा ही संकल्पना रावबली होती. यातून शेकडो, लग्न जमली त्या पेक्षा समाज एकत्र येऊ लागला. एकत्र आलेल्या समाजाला भरीव संघटनेची गरज होती. कार्यकर्ते एकत्र येत होते. भव्य दिव्य कार्यकरता करता विचारात ताळ मेळ जमत नव्हता. एकमेकात गुंते वाढविण्यापेक्षा आपल्याला जे करावयाचे आहे या साठी सर्वश्री प्रदिप सायकर, डॉ. गणेश अंबिके, नरेंद्र मेहर, विष्णूपंत ढंगाळे, सुनिल देशमाने, आणेकर, डी. डी. चौधरी मंडळी एकत्र आली. यातुनच संताजी सेवा प्रतिष्ठाण पिंपरी चिंचवड या संस्थेची सुरूवात केली. सेवा, त्याग व निष्ठा या बळावर संस्थेने आपली उद्दिष्टे मानली. या परिसरात सर्व कामगार वर्ग. रोजची मेहनत करून घर चालवणारी जवळ जवळ सर्व जन उद्योजक, व्यापारी मंडळी फार थोडी. त्यांचे पाठबळ, मार्गदर्शन, सहभाग या बळावर सात वर्षा पुर्वी पहिला मेळावा संपन्न झाला. यातूनच एक उमेद मिळाली. महाराष्ट्र तेली महा सभा अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान संचालित कार्य झाले. गत सात वर्ष ही वाटचाल यशस्वी झाली. समाजाच्या सहकार्यावर फक्त वधु-वर मेळावे ही वाटचाल न ठेवता संत संताजी पालखी सोहळ्यास अन्नदान साठी दरवर्षी भरीव मदत करणे ही निष्ठा संस्थेने ठेवली पालखींच्या वाटेवर पाऊस, वारा व उन्ह आसतो, आशा वेळी वारकर्यांचे हाल होतात. ही विनंती संबंधीतांनी करताच. संस्थेने पालखी सोहळ्यास तंबु भेट देऊन सामाजिक कर्तव्य पार पाडले. भविष्यात गुणवंत कामगार, गुणवंत समाज बांधव, हुशार विद्यार्थी गुण गौरव करण्याचा माणस आहे. गोर गरिब व निराधार महिंलाना स्वावलंबनाचा आधार देण्याची वाटचाल संस्था सुरू करणार आहे. वधु-वर मेळावे सर्वच घेतात यातुन लग्न सर्वच जमवतात. परंतु भविष्यात घटस्फोट, विधवा, विधुर अपंग हे प्रश्न काही बांधवा समोर उभे रहातात आशा वेळी यांच्या साठी धडपड सुरू आसते. हे लक्षात येताच. प्रतिष्ठाण तर्फे पहिला विधवा, विधुर, अपंग यांचा मेळावा २१ सप्टेंबर २०१४ रोजी राजमाता सभागृह चिंचवड येथे आयोजित केला. यासाठी कोणतीच फि घेतली नाही. प्रतिष्ठानने, मोफत वधु-वर माहिती, मोफत प्रवेश, मोफत चहा व भोजन दिले, या पहिल्या धडपडीला ही प्रतिसाथ ही अपेक्षे पेक्षा जास्त आला. जवळ जवळ १५० वधु-वर उपस्थीत होते. अंदाजे ५०० बांधव उपस्थीत होते. या मेळाव्यातुन लग्न जमण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रतीष्ठानने फक्त पिंपरी चिंचवड हे कार्यक्षेत्र न निवडता. शेजारिल ग्रामिण भागातील, शेजारील तालुक्यातील ज्या बांधवांना कष्टाची आवड आहे त्यांना ही संस्थेने आपले म्हणून समावून घेतले. त्यातून कार्याकर्त्यांची एक फौज निर्माण झाली. संस्थेचे डॉ. गणेश अंबिके, श्री. नरेंद्र मेहर यांच्या मोरया मेडीकल ट्रस्ट तर्फे परिचारीका शिक्षणात प्रवेश देताना सवलत दिली जाते. प्रतिष्ठान त्या साठी प्रयत्न करतेे. या प्रतिष्ठणच्या यशस्वी वाटचालीत श्री. विष्णुपंत ढेंगाळे यांचा सिंहाचा वाटा स्वता:ला पद, मोठे पणा न घेता इतर त्यागी कार्यकर्त्यांना देऊन संघटना मजबुत करणे ही जिद्द म्हणून प्रतिष्ठाणला आज शेकडो कार्यकर्ते निर्माण करता आले. प्रतिष्ठाण यशस्वी वाटचाल करण्यासाठी आपला प्रचंड व्याप बाजूला सारून सर्व सामान्य कार्यकर्ता होतात ही त्याची समाज निष्ठाा आहे. यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र तेली महासभा कार्यरत आहे. संघटनेच्या आदेशानुसार खाने सुमारी ही त्यांनी पुर्ण केली आहे. संताजी सेवा प्रतिष्ठाण मध्ये यांच्या सह डॉ. गणेश अंबिके, प्रदिप सायकर, सुनिल देेशमाने, विष्णुपंत ढेगाळे मनोज अणेकर, नरेंद्र मेहर, पीटी. चौधरी, अमोल देशामाने, रोहिदास पडगळ, श्री. ज्ञानेश्वर दुर्गडे, श्री. सुभाष धों. चौधरी, अशाोक कल्याणकर, दिलीप बा. चौधरी, रामभाऊ पिसे, गजानन सायकर, सचिन काळे, अविनाश भोज, विनोद भिसे, लताताई डोंगरे, विजय दळवी, देविदास क्षिरसागर, गोविंद ब. चौधरी, राजेंद्र भि. चौधरी, श्री. प्रदिप बोरसे, श्री. संतोष किरवे, श्री. भरत द. चौधरी, श्री. सुधीर रत्नपारखी, श्री. राजाराम गंधाले, सागर सायकर या व इतर सर्व समाज बांधवांच्या धडपडीतून प्रतिष्ठाण भविष्यात गरूड भरारी घेत आहे.