चिंचवड :- चिखली येथिल कै. माधवराव अंबिके हे व्यवसायामुळे जवळच असलेल्या चिंचवड येथे स्थाईक झाले. एक धार्मीक वृत्ती असल्याने ते श्री. संत संताजी पालखी सोहळ्यात सामील झाले. पालखी नुकतीच सुर झाली. मोहन नगर मध्येच पालखी सोहळ्याचे संस्थापक कै. धोंडीबा राऊत व कै. सदाशिवराव पवार रहात होते. यांच्या बरोबर काम करिताना त्यांना समजले पालखी शुन्यातुन सुरवात करावी लागली. पालखी गतीमान करण्यात सहभाग. ही पालखी रजीस्ट्रेशन ही करण्यात आघाडीवर जनमानसातुन नीधी संकलन करण्यास सर्वा बरोबर होते. यातुन पालखीला प्रभावी पणा आला, सुदूंबरे संसथा अध्यक्ष पद हे ह.भ.प.दहितुले बुवा यांना मिळाले. या वेळी संस्थेच्या जागेत अतीक्रमणे झाली होती. ती हटवण्यासाठी मोजणीकरुन घेतली. अनेकांचा राग अंगावर ओढूण घेतला. पालखी पंढरपूर येथे गेल्यावर तेली धर्मशाळेत उतरत आसे एक तर ही इमारत जुनी व लहान त्यामुळे महाराष्ट्र व्यापी संस्थेची मालकीची जागा असावी आसा विचार सुरु झाला. जवळ पैसे नसताना जागा खरेदी करून समाजातुन पैसे गोळा करण्यात दहितुले बुवा, सहादु शेठ घाटकर मेरूकर साहेब, ताराचंद देवराय यांच्या बरोबर फिरले. जेंव्हा बांधकाम करावयाचे होते तेंव्हा सुद्धा त्यांनी देणगीदार शोधण्यास सामील होते. कै. अंबिके यांचा स्पष्ट वागणे व बोलणे या मुळे अनेक वेळा अप्रिय प्रसंगाना सामोरे गेले. त्यांनी जी सामाजीक जाणीव ठेवून काम केले याची नोंद ठेवली जाते. संत संताजी सेवा मंडळ पिंपरी चिंचवड, संत संताजी पालखी सोहळा व समाज बांधवा तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.