शिंगणापुर तिळवणतेली समाज व संताजी तरूण मंडळ व समस्त ग्रामस्थ राजुर यांच्या पाच दिवसांच्या राजूहुन शनि शिंगणापूरला निघालेल्या पायी तेल कावड दिंडी प्रवासाच्या दिंडींचे स्वागत सोनई येथे भव्य मिरवणुकीन स्वागत करण्यात आले. तेल कापड पायी यात्रा ही अखंडपणे चालु राहुन तरुणांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रोत्साहन द्यावे व सहभाग घेण्याचे आवाहन शनि-शिंगनापुरचे पो.नि. कैलास देशमाने यांनी केले व पुढील शनी-शिंगणापुर ते राजुर प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
तेली समाजाच्या वतीने पो. नि. देशमाने यांनी संपत्नीक शनिप्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. तसेच शनि-शिंगनापुरात देवस्थानचे विश्वस्त सौ. शालीनीताई लांडे व राजु लांडे व्यवस्थापक संजय बनकर यांनी पुष्पहार अर्पण करून जोरदार स्वागत केले.
समाजाच्या वतीने तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरसे व महिला अध्यक्षा सुशिला सुद्रिंक यांनी कावडीचे पुजन केले.
या प्रसंगी माजी जि. प. सदस्य पुरूषोत्तम सर्जे, प्रतिष्ठीत व्यापारी विठ्ठल साळूंके, राहुरीचे सदाशिव पवार, प्रत्रकार विजय खंडागळे, अशोक क्षिरसागर, संजय शेजवळ, गणेश देशमाने, संजय खंडागळे, राजु सुद्रिक, नेवासे ता. दुध संघाचे व्यवस्थापक नंद किशोर लुटे, अशोक सुद्रक, रमेश सुद्रिक, चंद्रकांत जगताप, विलास क्षिरसागर, शहराध्यक्ष संतोष क्षिरसागर, माजी सरपंच गोरख जगताप, मनोहर सुद्रिक, दत्तात्रय राऊत, भिमा महाले, अर्जुन महाले, खंडागळे यांचेसह महाविर चोपडा, गणेश कुसळकर, ग्रा. प. सदस्य नंदिनी कुसळकर या महिलांही उपस्थित होत्या.
राजुर येथिल दिंडी सोबत आलेले उत्तर जिल्हा प्रमुख भागवतराव लुटे, उपाध्यक्ष सोमनाथ बनसोड, राहत्याचे योगेश बनसोडे, राहुरी अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, प्रकाश शिन्दे, देवीदास शेलार, राम चोथवें, बालाजी चोथवे, नितीन घाटकर, किरण पाबळकर, शिवाजी पाबळकर, गोरख कर्डिले नामदेव आहेर आदि सहभाग झाले होते.