मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
गेली दोन वर्षा पासुन रस्त्यावर नसलेले अंदोलन कुठे तरी धुमसत होते. तेवढ्यात महाराष्ट्र शासनाने पुरंदरेंना महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहिर केला. तो होताच त्याला प्रचंड असा विरोध सुरू झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधाच्या नाकावर टिचुन महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार जाहीर केला. इथेच विस्तवाला फुंकर मारली. पुरोगामी विचाराचे चळवळ वाले काही संघटना दाबलया गेल्यात त्यांचा आवाज दडपला गेला हा मुक्त संदेश होता. पण पुरंदरे विषयी एवढा राग का याचे उत्तर मी शोधत होतो त्याच दरम्यान प्रा. अ.ह. साळुंखे यांचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात त्यांनी अभ्यास करून ज्या बाबी पुराव्यानीशी मांडल्या. पुरंदरे यांनी शिवचरित्र्यात संधी मिळेल तेथे मराठा समाजाची अब्रू वेशीवर कशी टांगली. पुरंदरे आपल्या शब्द सामर्थावर पराक्रम मांडताना मराठ्यांना हिन कसे बनवतात हे पुराव्या निशी त्यांनी मांडले. याच वेळी ब्रामहणांचा उद्धात्तीकरण करिताना त्यांनी केलेली धडपड स्पष्ट पणे समोर येते. आशा पुरंदरेंना पुरस्कार ही चिड त्या समाजा समोर येते. परंतु तेली, माळी, नाभीक, महार, लोहार, चांभार, अशा जातीतील मंडळींचा इतिहासच पुसन टाकुन आपल्याला शिवाजीच्या पराक्रमी इतिहासातुन नामशेष केले. याचे साधे सोयर सुतक ही वाटले नाही. आपण कुणाच्या तरी कळपाचे चाकर झालो. ही वास्तवता विसरता येत नाही. म्हणुन ही मांडणी करतो.
सुशील कुमार शिंदेचे 2004 साल.
सन 2003 साली 2004 च्या निवडणुकी पुर्वी न भुतो न भविष्यती असा राजकीय पक्ष विसरून तेली या शब्दाने एकत्र आले. श्री. शरद पवारांच्या पायावर समाजाचे डोके ठेवले. सर्व विकास समाजाचा होणार यांच्या दंवड्या पिटल्या यावेळी श्री. छगन भुजबळ एक ओबीसी नेते म्हणुन हाजर होते. त्या वेळी ते मंत्री मंडळाच्या बाहेर होते तरी दरारा कायम होता. मा. जयदत्त अण्णाा क्षिरसागर मा. रामदास तडस साहेब व स्थानिक मंडळींचा ते एक त्यागाचे शिल्प होते. आमच्या विकास आमच्या खिशात आला या आनंदात होते. राजकारण जेवढे पडद्यावर दिसते त्या पेक्षा ते किती तरी पट पडद्या मागे शिजत आसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जीवनात उभे राहिलेल्या सोलापूरच्या सुशीलकुमार शिंदे यांनी एक जी आर काढुन ठरविले मराठा - कुणबी ही जात अस्तीत्वात आहे त्यांना ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे. मराठा समाजातील मंडळींनी त्या वेळच्या सत्ता केंद्राच्या विरोधात जाऊ नये. निवडणुक जवळ आल्याने विरोधक व सत्ताधीश मंडळीतील ओबीसी मंडळींंनी राजकीय लाभा साठी गप्प बसने हि पक्ष निष्ठा मांणली. या दिवसा पासुन गावचा पाटील गावचा देशमुख ओबीसी होऊ लागला. 2003 च्या मेळाव्याच्या यशातुन आपन मोठे होऊ या आपल्या आनंदाला विरजन कधी लावले हे समजन्या इतकी आपली राजकीय, सामाजीक, एैतिहासिक जाणीव आपण प्रगत केली नव्हती। आणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी दरम्यान या मराठा मंडळींनी आपली जात प्रमाण पत्रे ओबीीची बनवली हे देण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे फोन येत आणी कलेक्टर यांना आबीसी बनवत कमीत कमी एक लाख ते दहा लाख हा बाहेर असणार्या एजंटच्या दर होता. आम्ही पराभूत होऊन उंबर्या आड बसलो.
पक्षाच्या मालकाच्या नजरेचा धाकात.
अशी प्रमाण पत्र घेऊन पुणे मनपा, पुणे जिल्हा परिषद इथेच नव्हे तर सर्व नगर पालीका व ग्रा. पं. मध्ये सदस्य म्हणुन निवडुण आलेत या बाबत कोणताच ओबीसी समाज या विषयी साधा ब्र काढु शकला नाही. कारण ही निवडणूक ही त्या बांधवाने स्वत्: लढलो याचा आमचा संबंध काय ? आणी जरी असेल तर ही लढाई लढावी कशी आणी का ? इतकी विचार करण्याची माणसीकता नव्हती याचा ही आपण आढावा घेऊया महात्मा फुले यांनी प्रथम सत्यशोधक समाज स्थापन केला. यात किती ओबीसी जातींनी ही लढाई आपली मानली हा प्रश्नच आहे. राजश्री शाहुंच्या मुळे सत्य शोधनाला प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या नंतर ही चळवळ सत्यशोधक प्रणाली पासुन दुर जावुन ब्राम्हण - ब्राम्हणेत्तर वादात समील झाली. आम्ही तेंव्हा आजच्या सारखेच कोणत्याच तंबुत सामील न होता कपडे संभाळत आपल्या चंद्रमोळ्या घरात राहणे यातच मोठे पण मानत होतो. पण या मराठा समाजाने ब्राम्हणाशी दोन हात करीत काँग्रेस ताब्यात घेतली. बहुजन हा शब्द वापरून उभे दिसताच यात आनेक ओबीसी जाती सामील झाल्या. स्वातंत्र्या साठी घर दार उध्वस्त करून यांनी मरण ही पत्करल. स्वातंत्र्यात ब्राम्हण व मराठा ह्या दोन छावण्या होत्याच। आगदी महात्मा गांधींना गोळ्या मारल्या तेंव्हा ही ब्राम्हणांची घरे जाळताना घराच्या उंबर्या आडून पहात होतो. ब्राम्हणांच्या इस्टेटचे मालक मराठा. आगदी तेंव्हा ही आपल्या ताटात काही आले नाही तरी मराठा छावणी आपलीच मानली. परंतू बहुजनांच्या नावा खाली त्यांचीच सत्ता होती. आपली चुल पेटत राहिली पाहिजे एवढीच काय ती धडपड. परंतु हे असे का ? स्वातंत्र्यात ही आपली गुलामगीरी अबाधीत आहे. ही खंत जरूर होती. पण या साठी आपण काय केले का ? याचे उत्तर नाही. परंतु 1920 च्या दरम्यान मराठा समाजाने जो संघर्ष केला तो करताना आपले हारणकर्ते कोण हे ओळखुन त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. या प्रबोधनातुन हा समाज अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या पोटजाती विसरला. लग्न हे त्याच पोटाजातीतलावत होते. पण इतर समाजा बरोबर ते मराठा म्हणुनच सामोरे जात होते. त्यामुळे संख्येच बळ वाढले या मुळे सर्व समाज उच्च झाला. याला अपवाद कोकणातील कुणबी आहेत. त्यांनी अभिमानाने कुणबी पण संभाळले. या वेळी आपण पोटजातीत रोटी व बेटी व्यवहार करीत नव्हतो. म्हणजे समोरच्या तंबुत जात एक होत आहे. आपन त्याच गुंत्यात मोठे पण मानले. निदान आपली पोट जात व या जातीवर आपली कसे प्रभुत्व राहील या साठी पोटजातीच्या भिंती भक्कम केल्या. मग पोटजाती व जात विसरून आपल्या सारखे जगणारे इतर म्हणजे माळी, सुतार, नाभीक, शिंपी या सुद्धा आपल्या सारख्या जाती आहेत. याची जाणीव झाली नाही. परंतु सत्तेसाठी मराठा ही प्रणाली वापरून शिक्षण, सहकार,, सर्व सत्ता केंद्रे ताब्यात ठेवली. विरोधी ब्राम्हणी तंबुने हे ओळखले होते. म्हणुन 1920 च्या दरम्यान हेगडेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केला. वरून हिंदू आतुन ब्राम्हण ही वाट चालताना या ब्राम्हण्याला अस्पश्यपणा आला. या ब्राम्हण्यासाठी हजारो असे होते की त्यांनी घरदाराचा त्याग केला. काही अविवाहीत राहिले परंतु ब्राम्हण उभे करण्यास किंवा जपण्यास त्यांनी जो त्याग केला. त्याला आलेली जी फळे आहेत ती आज आपण पहात आहोत. ब्राम्हण्य व मराठा यांच्या तंबुत जे जेे घडत होते तेंव्हा आपण काय करीत होतो. स्वत:च्या बचावासाठी तडजोड करीत होतो. समाज कार्य, समाज संघटन, समाजाचा उद्धार म्हणजे समाजाची वास्तु या वास्तुत होणारी लग्न कार्य, मयती दहव्या साठी आपली हाजेरी एवढ्यात वर्तुळात किंवा बैल घाण्याच्या घानवडीत फिरत राहिलो. हे का मांडणी केली. ब्राम्हण व मराठा या समाजाने आपले तंबु उभे करण्यासाठी त्यांनी जो जाणीव पुर्वक प्रयत्न केले या साठी संघटन, त्याग निष्ठा या सामाजीक, राजकीय पातळीवर उभा केल्या. एकाने बहुजन व एकान हिंदू हे मुखवटे वापरले. आपण ही एक मुखवटा मुखवटा धारण केला होता. तो म्हणजे समाजाच्या पातळीवर आपणच शुर विर. हे सर्व असुन सुद्धा मंडल आयोग नेमला. तो पेटीत दडवला तो लागु झाला याचा साधा सुगंध ही एक टक्का समाजाला नव्हता उलट विरोध करण्यास जे सामील होत त्यात लपून जाण्यात ही काही मोठे पण मानत होते. हे सर्व मिळाले ते या साठी आम्ही काय त्याग केला. यासाठी कुठे संघर्ष केला. या साठी किती समाजाने प्रबोधन केले ? तर याचे उत्तर शुन्याच्या आसपास जाते. मंडलने एक नक्की झाले आपल्याला संविधानात हक्क आहेत. आपली गुलामगीरी यातुन नष्ट होते याची जाणीव झाली.
या दोन छावण्यात जे चालले ती चाल ही समजु शकलो नाही.
मराठा समाजाच्या 1930 च्या दरम्यान ज्या संघटना होत्या ज्या चळवळी हो त्या त्याच वेळी काँग्रस मध्ये विलीन होऊन गेल्या होत्या. त्या मंडल आयोग नेमताच 1977 मध्ये पुन्हा आकाराला आल्या आणी प्रत्यक्ष मंडल लागु होताच त्यांनी आक्रमक पणा घेण्यास सुरवात केली. या वाटचालीला आलेल हे स्वरूप होय. मी अनेक वेळा जी मांडणी केली तरी पुन्हा हे मांडत आहे की मंडल नेमताच मराठा जसे सावध झाले तसे त्यांच्या पुर्वी ब्राम्हण सावध होते. या साठी यांनी राममंदिर साठी कमंडल सुर केले. आम्ही कुठे होतो. मंडल गोठविण्यास कमंडलकडे किंवा आपली भाकरी ही वाड्यावरून येते म्हणुन हात बांधुन गप्प होतो. आपल्या पक्षाच्या मालकावर न्वहे तर त्या मालकाच्या पायावर डोके ठेऊन सांगत होतो. हे जे मिळाले ते तुमच्या मुळे. आमाचा उद्धार हे तुमचे काम. जो आज ग्रा. पं. सदस्य, सरपंच, सभापती आहेत पक्षाच्या मालका मुळे. या देशाच्या संविधानामुळे नव्हे. मी निवडुन आलो तेच मुळात माझा मालक व माझा पैसा यामुळे. माझ्या समाजाचा विकास झाला पाहिजे ही भुमीका एक क्षणभर ही नव्हती आणी मग सुशीलकुमार शिंदेनी मराठा कुणबी जात निर्माण केली. याला मागास वर्गीय आयोगाचा आधार काय ? ही चाल का व कश्या साठी आहे याचा विचार कधी करणार आणि चुकून जरी केला तेंव्हा विचार केला आरे ही फळे त्या विचारापेंक्षा मोठी आहेत. ही माणसीकता मारक ठरली आहेत.
यांना नाउमेद करणारे कोण ?
ओबीसी समाजातील एक तरूण श्री. मृणाल ढोल पाटील यांनी गेली दोन वर्ष प्रयत्न पाठ पुरावा करून 2004 च्या जी. आर. विरोधत केस दाखल केली. या घटनेकडे जाण्यापुर्वी आपना कडे वळु 2000 च्या दरम्यान ओबीसी जागे करिताना अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले. आपलेच विरोधक निर्माण झाले. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरू शकत होता. याला ही न डगमगता सामोरे जावुन जागृती जे जे करीत होते. त्यांनाच खरे समाज निष्ठा वान मांनले पाहिजे.
हाक्क हिरावणार्या विरोधात न बोलणार त्यांनाच जाहीर पाठिंबा ?
1920 च्या दरम्यान पासुन मराठ समाजाला ब्राम्हण समाज शत्रु कायम ओळखला या शत्रु विरोधात काळानरूप स्वरूप, मार्ग, सवंगडी बदलले पण ध्येय तेच ठरविले. त्यामुळे ते सत्ताधीश होऊ शकले. सत्तेची दारे स्वत:साठी ठेवली. पण आपल्यात मुळात जागृतीच उशीरा झाली समाजाची संघटनात्मक बांधणी जाणीव पुर्वक केली नाही. नेत्यांना समाज मेळाव्यात पाहिजे. मेळावे समाजाच्या उत्कर्षासरठी सांगतात आशा मेळाव्यातुन नेते मोठे होतात. सत्तेत जातात. आणि समाज विसरतात पुन्हा निवडणुकी साठी पुन्हा तोच डाव आसतो. समाजाचे नेते 2004 पासुन जे चालले आहे. जो मराठा समाज आपल्या समाजाची हक्काची सत्ते केंद्रे हिसकावत आहे. त्या विषयी किती नेत्यांनी चळवळ उभी केली किती नेत्यांनी या साठी समाज संघटन केले. जाहीर सभेत ही या विषयी आवाज न काढणारे नेते मी अनुभवलेत. ही आपल्या जीवनाचे शिल्पकार मंडळी समाजाच्या सभेत शासन दरबारी सांगतात तुमच्या आरक्षणाला जाहीर पाठिंबा कारण मराठा समाजाला नक्की माहित आहे. आपल्याला आरक्षण मिळणार तेच मुळात ओबीसींंच्या 27 टक्के मध्ये. आणी या साठी न मागता पाठिंबा देणारे भेटतात तेंव्हा किव करावी लागते. आमच्या जागृत पणाची.
जय संताजी ....