पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सातत्याने दुषकाळाला समामेरे जावे लागत असून परिणामी जमिनीतली पाण्याची पातळी कमी होत असल्याने पाणी बचत ही काळाची गरज झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये जुन्या पाझर लतवांची गरज झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये जुन्या पाझर तलावांची दुरूस्ती करणे, साखळी बंधारे बांधून पाणी टिकवून ठेवले पाहिजे. जायगावच्या ग्रामस्थांनी अशीच संकल्पना राबविल्याने वॉटर कप स्पर्धेत यशा मिळवले आहे. जायगावच्या यशामागे या गावचे सुपुत्र आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथवीराज चव्हाण यांनी केले.
येथील कुमठे फाट्यावर असलेल्या साई मंगल कार्यालयामध्ये उद्योगपती, जायगावचे सुपुत्र पोपटराव गवळी यांचा तेली समाज व ग्रामस्थांच्या वतीने शाल, पुष्पहार सन्मानपत्र दऊन पफथवीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील, दादाराजे खर्डेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बाचल, माजी जि. प. सदस्य किरण बर्गे, मनोहर बर्गे, सरपंच जयश्री सपकाळ, सुभाष उर्फ नाथा कदम उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पोेपटराव गवळी यांनी खडतर परिस्थितीचा सामना करून शून्यातून विश्व निर्माण केली आहे. ते एक उद्यागपती आहेत. ऐशोआरामातील जीवन सोडुन त्यांनी गावासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आह गावच्या कामात त्यांना आपण सर्व ते सहकार्य करू, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
पोपटराव गवळी म्हणाले, सर्व गोष्टी पैशाने होतात. असे नाही. ज्या गावात जन्म झाला, मोठा झालो, त्या गावासाठी काही तरी केले पाहिजे या भावनेतुन आपण केले. उन्हातान्हात काम करून सर्वांना साथ दिली. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेत यश मिळाले. आनंदराव पाटील यांचेही भाषण झाले. तत्पुर्वी पृथवीराज चव्हाण यांनी जायगाव या गावाला भेट देवून गावाची पहाणी केली.
जितेंद्र भोसल, श्रीकांत चव्हाण, पोपट कर्पे, अर्जुन वीर, रवींद्र बोतालजी, संपत माने, मेघराज भोईटे, रविंद्र मान दुष्यंतराजे शिंदे, आदी काँग्रेसच कार्यकर्ते उपस्थित होते.