राजगुरू नगर :- श्री. संत संताजी महाराज ट्रस्ट राजगुरू नगर तर्फे तेली समाज वधु-वर मेळावा आयोजित केला होता. यावेळी श्री. जनार्दन जगनाडे अध्यक्ष सुदूंबरे संस्था बोलत होते. ते पुढे म्हणाले ग्रामीण भागातील या आयोजकांनी गेली 2/3 महिने कष्ट घेतले. या कष्टातुन हा क्षण आला आहे. यातुन अनेकांच्या घरात जावाई येणार आहे. सुन येणार आहे. याचे श्रेय या अयोजकांना जाते. या साठी सर्वश्री नामदेव कहाणे, दिलीप खोंड, खळदकर, गणेश कहाणे, अविनाश कहाणे व त्यांच्या टिमने कष्ट घेतले आहेत. या मंडळींनी समविचार एकत्र ठेऊन गत 2 वर्ष विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमातुन विद्यार्थी गुण गौरव , हळदी कुंकू या माध्यमातून त्यांनी समाज संघटन सुरू ठेवले आह. वधु वर मेळावे सामुदाईक विवाह ही गरज जरूर आहे आपल्यतील विविध संस्था आजी - माजी आमदार नेते हा उपक्रम राबविलाल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत आता या मेळाव्यातील उपक्रमातुन आपण सामाजीक जाणीव ठेऊन या साठी 1) विद्यार्थी दत्तक योजना 2) संताजी महाराज मंदिर पिरसर विकास 3) सामुदाईक विवाह सोहळे सुरू करावेत अवघे धरून सुपंथ या भावानेन वाटचाल व समाजाचे अशीर्वाद मिळावेत यातच आनंद आहे.
वधु - वर पालकांनी आळस न ठेवता 29 पोटजाती आहेत त्यातच विवाह करावेत. समविचार वधु-वर 29 पोटजातीत शोधावेत व यातून समाज एक संघ बनवावा आपले क्षेत्र मर्यादित न ठेवता राज्य स्तराचा विचार करावा गोर गरिब बांधवांची नोंद मोफत सुरू ठेवावी. त्सांनाही प्रसिद्धी द्यावी यातुनच 1) गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार व मार्गदर्शन 2) तालुका संघटन व मेळावे 3) सुशिक्षित बेरोजबारांना माहिती त्यांना विनाव्याजी कर्ज 4) महिला बचत गटांना आर्थिक सहकार्य 5) शासकीय र्निणयाचे लाभ ळिवून देणे 6) श्री संत संताजी जीनावर ज्ञान स्पर्धा घेणे आसे उपक्रम राबवावेत यातुनच समाज घडण होईल.
सदर मेळाव्याचे उदघाटन प्रविण शेठे येवले यांनी मेळाव्याचे अध्यक्ष श्री. प्रकाशशेठ गिधे कार्याध्यक्ष म. तैलिक महासभा उत्तर यांनी आपले विचार मांडताना सांगीतले आज तरूण गुचकळ्यात आहेत. त्यांनी विचार मंचावर यावे. आपला परिचय करून द्याव. यातुनच खरी जागफती होणार ाहे. यावेळी सौ. यवले यांना उपस्थित बांधवांना अन्नदान दिले. सदर मेळाव्यास सर्वश्री चंद्रकांत शेठ वाव्हळ, मारूती फल्ले, वासुदव कर्पे, गजानन घाटकर, ज्ञानेश्वर दुर्गुडे, भागवत लुटे, विजय रत्नपारखी, विजय शिंदे, श्रीमती मिरा फल्ले व समाज बांधव उपस्थीत होते. पाऊस असताना ही हजारो समाज बांधव उपस्थीत होते हे यश मेळावा संयोजकांचे आहे.