निवडणुकीतील आकडेवारीचे कटु सत्य
महाराष्ट्रात ओबीसी ३६० जाती आहेत. परंतु या जातीपैकी नेहमीप्रमाणे माधव म्हणजे माळी (११), धनगर (०५), बंजारा (०४), वंजारा (०५), कुणबी (१८), (विदर्भ - उत्तर महाराष्ट्र एल.पी), आग्री कोळी (१२), (मंबई कोकण विभाग), विदर्भातील तेली (०७), गवळी (०१), कोष्टी (०३), पोवार (०१), कोहली (०१), गाडली (०२), वैष्णववाणी व वाणी (०२), भंडारी (०३), सोनार (०१) अशा दहा जाती म्हणजे १७ जातींचे प्रतिनिधी सत्तेत जातात, पण उर्वरीत सत्तेमधुन वर्षानुवर्ष ३४८ जाती ज्या अत्यल्प व उपेक्षिात आहेत. त्या राजकारणापासून वंचित आहेत. कालच्या २०१४ च्या निवडणुकीत ओबीसी मधील तेली समाजाचे जयदत्त क्षिरसागर, सि. बावन्नकुले, चरण वाघमारे, कृष्णा खोपडे, शिरीष चौधरी, विजय वट्टेवार निवडून आले. तर माळी जातीतून सर्वश्री बळीराम सीरसकर (भारिप) बाळापुर, अतुले सावे (बीजेपी) औरंगाबाद, पंकज भुजबळ (एनसीपी), नांदगांव, छगन भुजबळ (एनसीपी), येवला, देवयानी फरांदे (बीजेपी), नाशिक भिमराव धोंडे (भाजपा) आष्टी, शिवराम म्हेत्रे (कॉंग्रेस) अक्कलकोट, जयकुमार गोरे (कॉंग्रेस ) मान, सुरेश गोरे (सेना), खेड आळंदी, योगेश टिळेकर (बीजेपे) हडपसर, मनिषा चौधरी (बीजेपी), दहिसरअसे ११ माळी जातीचे आमदार निवडून आले.
त्यांचे पक्ष पुढील प्रमाणे एनसीपी (०२), बीजेपी (०५), सेना (०१), कॉंग्रेस (०२), भारिप (०१) आहेत. ओबीसींचे नेते छगन भुजबळ माळी जातीवे आहेत. त्यांना राज्यात ११ माळी जातीचे आमदार निवड करण्याचे श्रेय जाते का ? कदाचित ते घेणारही नाहीत . कारण त्यांनी स्वत: बाप व मुलाशिवाय आपल्या पक्षात माळ्यांना निवडून आणले नाही. इतर पक्षांनी ०९ माळींना निवडून दिले व पक्षांतर्गत ओबीसी उमेदवरांसाठी जाहीरसभाा घेतल्याही नाहीत. कारण ७७ ओबीसी निवडून आलेल्या आमदारांपैकी फक्त १० राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले. त्यात दोन माळी भुजबळ (बाप-मुलगा) सोडला तर त्यात मनोहर नाईक (बंजारा), पुसद, प्रदिप जाधव, नाईक (बंजारा) किनवट, मधुसुदन केंद्रे (बंजारा) गंगाखेड, जितेंद्र आव्हाड (बंजारा ), मुंब्रा., संदिप नाईक (आग्री), अवद्युत तटकरे (गवळी), श्रीवर्धन दत्ता भरणे (धनगर) इंदापूर, जयदत्त क्षिरसागर तेली बिड या आठ आमदारांची राजकीय तपासणी केली तर तथाकथित भुजबळांचा त्यांना निवडुन आणण्यात काहीही संबंध नाही, ते केवळ स्वकर्तव्यवार निवडून आलेले आहेत. मग भुजबळ ओबीसींचे नेते ? त्यात बीडचे दुसरे मंत्री जयदत्त क्षीरसागर हे नावाला ओबीसींचे असून, फक्त स्वत:ची खुर्ची व स्वार्थी सांभाळण्यासाठी आहेत. महाराष्ट्र तेली जातीचे सात आमदार निवडून आलेत पण एकही एनसीपीचा आमदार तेली, क्षीरसागर शिवाय नाही. त्यात सर्व बीजेेपी, एक अपक्ष, एक कॉंग्रेस आहे याचा अर्थ ओबीसीं नावाचे लेबल लावुन चमडी बचाव काम करणारे असे प्रस्थापित धनदांडगे म्हणुन ते पक्षात आहेत.
दिनांक 09-11-2014 12:59:21