रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ रत्नागिरी संलग्न महारार्ष्ट प्रांतिक तैलिक महासभा, तेली समाज वधू-वर मंडळ, रत्नागिरी शहर तेली ज्ञाती महिला मंडळ, श्री. संत संजताजी जगनाडे महाराज मंदिर ट्रस्ट आणि संताजी जगनाडे महाराज सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाज वधू-वर पालक परीचय मेळावा सन 2016 जल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी समर्थ मंगल कार्यालय, नाचणं रोड रत्नागिरी येथे उत्साहात पार पडला.
श्री संत संताजींच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने मेहाव्याची सुरूवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणुन तेली सेवा समाज मुंबईचे अध्यक्ष भगवान सातार्डेकर, मासिक कोकणस्नेहीचे सेक्रेटरी श्रीकृष्ण तळवडेकर, संपादक सुरेश पडवळकर, कोकण प्रदेश कार्याध्यक्ष गणेश धोत्रे, काका तळवडेकर, महेश साळुंखे, नंदकुमार आरोलकर, किरण आंब्रे, श्रीरंग तेली आदी उपस्थित होते. मेळावा संयोजन प्रमुख विजय ुनसकर यांनी मेळाव्याचे आयोजन व सर्वसामान्य वधू-वर पालकांसाठी परिचय मेळाव्याची गरज या विषयी प्रास्ताविकात विचार मांडले. प्रमुख पाहुणे भगवान सातार्डेकर यांनी समाज संघटन ही काळाची गरज असून त्यासाठी प्रत्येक समाजबांधवाने कर्तव्यभावनेने योगदान द्यावे, तसेच युवा वर्गाने उच्च शिक्षण घेऊन समाज ऋण फडण्याचे आवाहन केले. अध्यक्ष रघुवीरर शेलार यांनी वधु-वरांना अनुरूप जोडीदार निवडण्याची सुवर्णसंधी म्हणुन मेळाव्याचे महत्व विशद केले.
यावेळी वधु-वर परीचय मेळावा स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वधु-वर परीचय मेळाव्यासाठी रत्नागिरी जिल्हा तसेच राज्यभरातून नोंदणीकृत 72 वधु 147 वर तसेच मेळाव्याप्रसंगी नोंदणी झालेले सुमारे 70 वधु-वर असे सुमारे 300 वधु-वरांची उपस्थिती होती. वधू-वरांच्या परिचयानंतर पालक बैठक, गुणमिलन यासाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आले होते. मेळाव्यात अनेक वधु वरांनी प्रत्यक्ष भेटून विवाहविषयक बोलणी केली. मेळावा आयोजनाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.