दौड शहर:- सालाबाद प्रमाणे दौंड येथे तेली समाजाचे आराध्य दैवत व वारकरी संप्रदायाचे संत "भगवद् भक्त जय श्री संताजी महाराज जगनाडे"यांची पुण्यतिथी ह्या ही वर्षी खुप आनंदात साजरी झाली व ६०० ते ७०० समाजबांधव उपस्थीत राहीले.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे दौंड तालुका आध्यक्ष कु.महेश पांडुरंग देशमाने यांच्या आध्यक्षतेखाली उत्सव समीती नेमुन उत्सव समिती आध्यक्ष अजय मुरलीधर क्षीरसागर यांना नेमुन कार्यक्रम ऊत्साहात पार पाडला.कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलनाने करुन,प्रवचन व शहरामधुन महेश देशमाने व माउली क्षीरसागर यांच्या संकल्पनेतुन पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
.या वेळी महेश पांडुरंग देशमाने यांनी स्वतः सबंद दौंड तालुक्यातील तेली समाजाची केलेली खाणी सुमारीचे व मोफत वधु वर सुचक पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हास्ते करण्यात आले आणि नवनिर्वाचित नगरसेविका सौ.अनिता दळवी,वरवंडचे ग्रा.प.सदस्य कचरे यांचा सत्कार करण्यात आला.व राधीका क्षीरसागर,स्नेहल राऊत,वैष्णवी क्षीरसागर, सोनी क्षीरसागर यांनी रांगोळीचे सुशोभीकरन केले.
यावेळ तेली समाजाचे कार्यकारणी सदस्य आ.महेश देशमाने शहर आ.उल्हास पवार उत्सव समीती आ.अजय क्षीरसागर,माऊली क्षीरसागर,कार्य आ.गणेश चव्हान,प्रशांत मचाले,भालचंद्र खळदे,गणेश दळवी,विष्णु क्षीरसागर,मनोज देशमाने,दिलीप किरवे,किरण देशमाने,एकनाथ क्षीरसागर,अमित शिंदे,लहु खाडे,पांडुरंग देशमाने,महेश क्षीरसागर,अंबादास पवार,अमोल लोखंडे,हरी क्षीरसागर,बाळु खळदे,आनंद क्षीरसागर,या सर्वांनी कार्यक्रमाचे योग्य आसे नियोजन करुन यशस्वीरितीन हा पुण्यतिथी सोहळा पार पाडला व गणेश चव्हानांनी शेवटी सर्वांचे आभार मानले..
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade