औरंगाबाद, ता. 11 : अंमळनेर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या फलकावर चिखलफेक करणार्या व्यक्तीना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी तेली युवा संघटनेतर्फे क्रांती चौक येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, की संताजी जगनाडे महाराज यांच्या नावाच्या फलकावर अज्ञात समाजकंटकांनी चिलफेक करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तेली युवा संघअना, तेली समाजातर्फे लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले. यामध्ये विशाल नांदरकर, बाबासाहेब पवार, अंबादास देवराये, कचरू वेळंजकर, मनोज संतान्से, दीपक राऊत, राजू मगर, सुभाष रत्नपारखे, संतोष काकडे, प्रवीण वाघलव्हाळे, ईश्वर पेंढारे, नितीन मिसाळ, रमेश बागले , संतोष सुरळे, मंगेश वाघमारे, योगेश मिसाळ, अमोल बागले, योगेश चौधरी, रवींद्र सुपडकर, कृष्णा पेंढारे, शुभम राऊत, सतीश पंडित, आनंद लगडे, उमेश चौधरी, प्रशांत वाघ, योगेश शेलार, साईनाथ चौथे, किरन पन्हाळे, संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, महेश देशमुख, प्रदीप बोरडे, मुस्तकीम शेख सहभागी होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade