संत नामदेवा नंतर महाराष्ट्रात सामाजिक, धार्मिक, राजकीय बाबत अन्यायाची आवस्था होती. खर्या अर्थाने धर्माला ग्लानी आली होती. आशा वेळी संत तुकारामांच्या नेतृत्वा खाली शेकडो वर्षांची दडपशाही झटकून इतिहास निर्माण करण्याचे कार्य झाले. यामुळे पुढे शेकडो वर्ष जे राजकीय, सामाजिक, धार्मिक परिवर्तन धडले त्याचे शिल्पकार संत संताजी जगनाडे आहेत ते संत तुकारामांचे शिष्य, लेखनिक या त्यांच्या भुमिके पेक्षा धार्मिक व सामाजीक परिर्वतनातील लढाईतले ते एक सर सेनापती होते. हा अभिमान, हि साठवण ही आठवण हे स्फर्ती ठिकाण, ही मानवता तमाम मानव जातीची आहे. आणि याची जाणीव केंद्र शासना, राज्य शासन यांनी ठेवली, ठेवतात व ठेवावी ही लागेल म्हणुन ही तुम्हा आम्हा सर्व तेली समाज बांधवांची कार्यर्त्याची भुमीका आहे. ती आपण पार पाडतो ही पण आज मी या विचार प्रक्रिये द्वारे काही नम्र पणे विचार मांडतोय. या विचार प्रक्रियेतुन आपण मिळुन सारे श्री संताजी समाधी स्थळ भव्य करूया. सामाजिक प्रक्रियेची वाटचाल शंभर वर्षा पुर्वी सुदूंबरे येथे उत्सव सुरू झाला. दत्तोवामन पोतदार यांच्या मुळे संत संताजी खर्या अर्थाने प्रकाशात आले. मुंबई येथुन बांधव रावसाहेब केदारी यांना घेऊन सुदूंबर्यात आले. बांधवांनी श्रमदान करून वाटचाल सुरू केल. माझे आजोबा आमच्या घरी स्मृतीदिन साजरा करित होते ते सांगत हा स्मृतीदिन पिड्यान पिड्या सुरू आहे. परंतु प्रत्यक्ष समाधी स्थळी स्मृती दिनाला सुरूवात होताच महाराष्ट्र तेथे गोळा होऊ लागला. केदारी यांच्या इच्छे खातर श्रिमती शेटे यांनी समाज संस्थेला आपली शेत जमीन देऊ केली. अनेक वर्ष संस्था वाटचाल करू लागली. कधी शेव चिवडा देऊन स्मृती दिन संपन्न झाला. समाजातील हजारो बांधवांनी आपले योगदान दिले. मला कळत आहे तेंव्हा पासुन मी या स्मृती दिनात सहभागी होत आहे. माझे वडील श्री. गोपाळशेठ जगनाडे हे काही वर्ष अध्यक्ष होते. या वेळी नियोजनात सहभागी होता आले. त्या नंतर संस्था प्रक्रीयेत पदाधीकारी म्हणुन ही मला काम करता आले. अनुकूल परिस्थीती कधी तरीच आसते प्रतीकुल परस्थिती ही राजचीच आसते. आशा या परस्थीतीवर वाटचाल करीताना विश्वास, कष्ट, नम्रता व त्याग यातुन मार्ग काढतो हे माझे वडिल श्री. गोपाळशेठ जगनाडे यांनी दिलेली शिदोरी. त्यामुळे ते सामाजीक, धार्मिक राजकीय वाटचालीतले पहिले गुरू चाकण परिसरातील श्री नरपतराज मेहता हे उद्योजक हे माझे आदर्श. जोडीला जेष्ठ गांधी वादी विचारवंत द. भि. मामासाहेब शिंदे हे ही माझे आदर्श. वयाच्या दहाव्या वर्षापासुन पुणे ते सुदूंबरे सुरूवातीला पायी येऊन सर्व प्रक्रियेत सहभागी होणारे. स्वच्छ, त्यागी व स्पष्ट वक्ते म्हणुन ज्यांना ओळखले जाते. जेष्ठ म्हणुन संबोधले जाते ते श्री. अंबादस शिंदे यांच्या विचार पगडा माण्यावर आहे. संस्थेेचे रोपटे लावण्या साठी कै. हरिश्चंद्र डिंगोरकर यांनी सहभाग घेतला तीच त्यागी भुमीका न सांगता न बोलता कर्तव्य करणे ही भुमीका बजावणारे श्री. प्रभाकर डिंागेरकर माझे आदर्श आहेत. सामता, बंधुता, त्याग, सेवा व निष्ठ या साने गुरूजींच्या विचाराने भारावलेले ग. प्र. प्रधान, एस.एम.जोशी या सारखे लहान मोठी विचरांची माणसे माझ्या घरी येत त्यांच्या पासुन मी राष्ट्र सेवा दल समजुन घेतला. संत सावता, संत गोरोबा, संत नरहरी, संत जोगा, संत जनाबाई, संत रोहिदास, संत सेना, संत नामदेव, संत संताजी. ही सर्व मंडळी आपन पाहिली तर यांनी हिंदू धर्म वाचवला यांनी सत्यशोधक यांनी अवृत्तीवर हाल्ले केले. गंध, टाळ, भजन व मंदिर ही साधने आनुन पंढरपूरच्या विठोबा समोर समतेच्या सह्याद्री पर्वत उभा केला. त्यांचे दर्शन घेऊन आपले मन शांत होते. त्यांच्यापसून आपल्याला दिशा ही मिळते. त्यांच्या जीवनाचा शोध घेऊन आपन मानवता निर्माण करू शकतो. सामाजीक, राजकीय, आर्थीक, धार्मीक बाबत महान संकटे असता ही त्यांनी निष्ठेने मात केली. ती मात करून त्यांनी भव्य वाटचाल निर्माण केली. याची साठवण झाली पाहिजे. दुसर्यावर विसंबुन रहाण्यापेक्षा .... आपल्या पुर्वजांनी दुष्काळात प्रसंगी उपवास ही काढले पण सुदूंबरे येथे येऊन संत संताजी पुण्यतीथी साजरी केली. थंडी पासुन संरक्षण ही सुरूवातीस होत नव्हते. परंतु आपल्या पुर्वजांनी जे शक्य ते केले. आपल्या सर्वांच्या धडपडीतून शासनातर्फे निधी घेऊन मंदिर काम पुर्ण झाले बाकी विकास आराखडा अपूर्णच आहे. तो गत दशक उन्हावारा पाऊस याला. तोंड देत कसा तरी तग धरून आहे. शासनाकडे हेलपाटे सुरूच आहेत. या धडपडीला कदाचीत यश येईल ही ते कधी येईल हे सांगता येणार नाही. तो पर्यंत उभे राहिलेले अपुरे काम जमिनदोस्त होईल. या साठी काय करावे हा प्रश्न उभा होता. आशा वेळी सर्वश्री सुरेश जगनाडे, शैलेश मखामले. या मंडळींनी होकार देताच मदतीचा हात ही दिला आणि बांधकाम सुरू झाले. विकासाची नांदी एैकताच अनेक बांधव मदत घेऊन आले. पुणे येथे कात्रज परिसरात संत रोहिदास, जैन समाजाची अनेक स्थानेक, मारवाडी समाजाची अनेक मंदिरे आपण पाहिली तर ती आज भव्य दिव्य आहेत. या ठिकाणी धार्मीक सामाजिक प्रक्रिया गतीमान आहे. शासन जेंव्हा येईल तेंव्हा आपन विककास करू ही भुमीका यथे नाही. प्रथम आपण देऊ मग शासनाचे आले तर अधीक भाष्य करू. यातुन या ठिकाणी आज भव्य विकास आराखडा राबवला गेला आहे. दुसर्यावर पुर्ण पणे अवलंबुन राहिले आसते तर हे शक्य नव्हते. वुध वर मेळावे ते सुद्धा भव्य दिव्य असतात. संत संजातीना फॉर्म पासून उद्घाटन सोहळ्या पर्यंत मान सन्मान देतो ४/५ कोट रूपये किमान दरवर्षी खर्च होतात परंतु ज्या संत संताजींच्या नावे आपण वाटचाल करतो त्या संत संताजींच्या विचार आचार प्रक्रियेच्या स्थळाला विसरतो हे नम्र पणे नमुद करावे लागते. वधु वर मेळावे ही जरूर गरज आहे ती आपण पुर्ण ही करतो पण समाजाची जननी ही सुदूंबरे संस्था आहे. हे विसरता कामा नये. प्रत्येक वधु वर मळाव्याच्या संयोजकांनी आपली खारीची भुमीका बजावाली तर भव्य आसे स्मृतीस्थळ उभे राहूशकते. हाकेला साथ एकीचे बळ हीच भव्य वाट. संत संताजी साठवण ही तमाम महाराष्ट्राची आहे. ते तेली समाजाचे होते. त्यांनी शेकडो वर्षाची महाराष्ट्राची मानवता निर्माण केली. ती जोपासणे वाढवणे हे तुम्हा आम्हा सर्व बांधवांचे कर्तव्य आहे. मंदिर, निवास स्थान म्हणज विकास नव्हे. चमकणारा भव्य पणा म्हणजे भव्य दिव्य नव्हे. या सर्वा बरोबर आपल्या समाजाची घडण करावयाची आहे. समाजाची जपणूक करावयाची आहे. समाजाची बांधणी करावयाची आहे, संत संताजींनी हेच केले या साठी सखोल अभ्यास निर्माण होण्यासाठी एक भव्य ग्रंथ दालन तयार करावयाचे आहे. समाजाची बांधणी करावयाची आहे. संत संताजींनी हेच केले या साठी सखोल अभ्यासू निर्माण होण्यासाठी एक भव्य ग्रंथ दालन तयार करावायाचे आहे. जगभरातील संत विचारावर मानवता विचारावर येथे मंथन व्हावे. यातून संत संताजींचे धार्मिक, सामाजिक राजकीय कार्य सर्व मानव जातीला दिपस्तंभ ठरले पाहिजे संत संताजींनी ज्या प्रमाणे सामाजीक समता निर्माण केली. त्या समतेचे केंद्र समाधी स्थळ बनवणे. आज गरिबी कमी झाली म्हणतात पण जीवनाचे क्षितीज उंचवणारे शिक्ष सर्व समान्याला ही आवघउ झाले आहे. ४०० किंवा पाचशे रूपये त्या विद्यर्थाला एका पुस्ताकाला लागतात. संस्था आशी मदत देण्याचा प्रयत्नात आहे. पण यातून त्याचे शिक्षण पुर्ण होतच नाही. दतो विद्यार्थी अपुरे शिक्षण घेऊन जीवनाच्या लढाईत यशस्वी होऊन क्षितीज उंचावू शकत नाही या साठी संस्था आपणास हाक देत आहे. आर्थिक मदत देऊ करा अन्यथा आशी मुले दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पुर्ण करण्यास दत्तक पालक व्हा अनाथ, गरब, निराधार महिला व त्यांचे कुटूंब समाजा पासून कोपर्यात आसते त्यांची हाक सहज एैकू येत नाही. त्यांची साठी कासेणालाच थांबता येत नाही परंतू संस्था हे आपले कर्तव्य मानते या साठी त्यांना आर्थिक सहकार्य त्यांच्या साठी शासनाचे फायदे मिळवून देणे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम स्वरूपी कक्ष निर्माण करणे ही वाटचाल असेल. गाव ते राज्य संताजी विचार वंश करूया मी व माझा जगनाडे परिवार हा संताजीचा वंश आहे. परंतु महाराष्ट्रातील तेली समाज हा संत संताजींचा विचार वंश आहे. विचार वंश संघटीत झाला पाहिजे वर जे मी सांगीतले त्याची पूर्णता ही या विचारर वंशाच्या बळावर होणार आहे. या सर्वाला गतीमानता येणार आहे. मर्यादित क्षेत्रात संस्थेच्या वावर व संपर्क हा विस्तारीत झाला पाहिजे आणि या साठी सर्वाना सहभागी करण्यास सुरूवात झालील आहे. तशी वाटचाल निर्माण केली जात आहे. कार्यकारणी विस्तार करण्याची प्रक्रिया अंतीम टप्यात आहे. यातूनच जिल्हा कमिटी तालुका कमिटी व गाव कमीटी निर्माण करूया याची सुरूवात म्हणून प्रथम पुणे जिल्हा अध्यक्ष पदी श्री. अनंत देशमाने यांची निवड करून सुरूवात केली आहे. हा असंघटीत समाज हा एक दिवसात होणार नाही त्यासाठी काही महिने जातील परंतू संस्थे तर्फे व समाज बांधवा तर्फे ही सामाजीक धार्मीक बांधणी पुर्ण होईल. म्हणुन म्हणतो स्मारक भव्य दिव्य होईल. माझ्या मागे असेलली जगनाडे घराण्याची पंरपरा व समाज बांधवांचा विश्वास या बळावर उभे रहाताना सोबतीला असलेले पदाधिकारी ही खरी जमेची बाजू या मुळे नम्र पणे सांगतो विकासाच आराखडा राबवू लागलो. आज विचार प्रक्रिये द्वारे आपना सर्वांना पुन्हा एक वेळ विनंती करतो रोजचा एक रूपया बाजूला ठेवा आसे वर्षाचे ३६५ रूपये घरटी विकासासाठी संस्थेला द्या जास्त नाही फक्त वर्षाला ३६५ रूपये. हा प्रचंड निधी विकासाला भव्य दिव्य पणा साकारू शकेल शासनाकडे हेलपाटे मारून तो निधी मिळाला तर अधीक भव्य दिव्य पणा येईल. जय संताजी