महाराष्ट्राच्या समाजाच्या इतिहासात पन्हाळे कुटूंबाला एक प्रतिष्ठा आहे. कै. अमृतराव पन्हाळे यांनी व्वसायाची दिशा दिली होती. आपला व्यवसाय संभाळून समाज कार्यात सहभाग घेत. तेली गल्ली मासिकाच्या मोफत वधु-वर पुस्तकेे प्रकाशन ही 1990 मध्ये त्यांच्या व मा. जयदत्त क्षिरसागर आमदार यांच्या उपस्थीत झाले होते. तेली समाजाच्या स्तुत्य उपक्रमात ते सहभागी असत. आपले योगदान ते देत असत. पुण्याच्या मंगळावर पेठेतील खडीच्या मैदाना जवळील नागेश्वर मंदिर हे श्रद्धास्थान. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे व कै. किसन रामचंद्र पन्हाळे यांचेे श्रद्धास्थान कै. अमृतशेठ पन्हाळे यांना कळू लागले आगदी तेंव्हा पासून स्वत: सायकल वर जाऊन नागेश्वराला दुध देत. रोजच्या व्यवसायाच्या व्यापातून ही ते न चुकता नागेश्वराला दुध घेऊन जात. आणी जेंव्हा बाहेरगावी असत किंवा आजारी तेंव्हा ते कामगार पाठवत असत. पण आपली निष्ठा, श्रद्धा व भक्ती चुकली नाही. या मंदिराचे संबंधीत एक माळी महाराज. त्यांनी त्यांना एक सल्ला दिला. या ठिकाणच्या भक्तीला आतंर देऊ नका. आणी तो आयुष्यभर जपला आगदी वयाची 83 गाठली शरीर दमले तरी सुद्धा. या मंदिराच्या विकासासाठी त्या वेळच्या विश्वस्तांचा विश्वासाला साथ व श्रद्धा म्हणुन अंदाजे 5 लाख दिले. पण विकास म्हणावा तसा झाला नाही ही खंत होती.
परंतू गत 1/2 वर्षात इथे जिर्णद्धोर कामाने गती घेतली. श्री. शिरीष अमृतशेठ पन्हाळे यांनी या कामात लक्ष ही दिले. आपला त्याग ही सर्मपीत केला कारण हे मंदिर पुर्वी पुणे शहराच्या बाहेर होते. जरी ते आज मध्यवर्ती ठिकाणी असले तरी. आगदी आज ही या मंदिर परिसरात गरीब व मध्यमवर्गीय नागरीकांची वसाहत आहे. मंदिराला 700 ते 800 वर्षाचा इतिहास आहे. पन्हाळे यांच्या अनेक पिड्या या मंदिराच्या सेवत गेल्या आहेत. मंदिराला प्राचीन सौंदर्य पुन्हा येण्यासाठी या परिसरातील जागृत नगर सेवक श्री. गणेश बिडकर यांनी अतोनात परिश्रम घेतले यातुनच जीर्णध्दार परीपुर्ण झाला. या मंदिराचा लोकार्पण सोहळा मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत दि. 21 डिसेंबर 2016 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात श्री. शिरीष पन्हाळे व कै. अमृतशेठ पन्हाळे यांच्या सहकार्याची निष्ठेची नोंद ठेवली गेली.
तेली गल्ली (गावकूस) मासिकाच्या पायाभरणीच्या काळात पन्हाळे बंगल्यात सहकार्याचा हात मिळाला होता. श्री. शिरीष पन्हाळे यांच्या ऑफीस मध्ये गेलो. त्यांच्याशी विविध प्रश्नावर चर्चा सुरू झाली तेंव्हा कळुन चुकले. मी एक तेली आहे. माझ्या समाजासाठी भरिव सहकार्य काम व उभारणे करेण माझे ही कर्तव्य आहे. या साठी ते आपल्या विचार प्रणाली प्रमाणे कार्यरथ आहेत. त्यांना व त्यांच्या धडपडीला सहकार्य.
श्री. शिरिष पन्हाळे यांच्या मातोश्री श्रिमती प्रमीला ताई यां अमृतशेठ यांच्या बरोबर मंदिरात जात. आज ही परंपरा त्यांच्या कन्या यामिनी, अल्पना व सौ. संगीता शिरीष पन्हाळे करतात.