पुणे - येथिल तिळवण तेली समाज कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. सकाळी विश्वस्त सुनिल राऊत यांच्या हास्ते ध्वज फडकविण्यात आला या वेळी सर्वश्री घनश्याम वाळुंजकर, संजय भग्रत, प्रकाश कर्डिले, अशोक सोनवणे, दिलीप वाव्हळ, रामदास धोत्रे, माऊली व्हावळ, संजय व्हावळ, वाघचौरे, अजय शिंदे, रमेश भोज, विजय शिंदे व संतोष उबाळे, या सह सर्वश्री अंबादास शिंदे, रत्नाकर दळवी, सुभाष काका देशमाने, संजय पवार व सर्व समाज बांधव उपस्थीत होते.
सायंकाळी महिला साठी हळदी कुकूं सभारंभ आयोजित केला होता. या वेळी तेली समाजाची वास्तु महिलांनी भरली गेली. महिलांचा सहभाग नोंद ठेवावा असा होता. महिला कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सौ. निता कर्पे, सौ. ज्योती निगडकर, सौ. आशालता कर्पे, सौ. सुवर्णा भगत, सौ. उषा केदारी या इतर सर्व महिलांनी नियोजन व सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुणे समाज विश्वस्तांनी सहकार्य दिले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade