अध्यक्ष श्री. संभाजीराव म्हसे मराठा मोर्च्याचे आहेत तेव्हां - आयोगावर ओबीसीच अध्यक्ष हवा
पुणे, दि. 3 फेब्रुवारी: राज्य सरकारने नवीन राज्य मागासवर्ग आयोगाची फेररचना केली असून आज या आयोगाची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या आयोगाची निवड ही बेकायदेशीर असून अध्यक्ष श्री. संभाजीराव म्हसे मराठा मोर्च्याचे उपाध्यक्ष असल्याने त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशा मागणीचे निवेदन आज ओबीसी संघर्ष समितीने त्यांना दिले व त्यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. या आयोगावर ओबीसीच अध्यक्ष हवा अशीही मागणी करण्यात आली.
या 1 वर्षात 50 हजार मराठा - कुणबीचे बोगस दाखले काढण्यात आलेले असून ते सर्व रद्द करण्यात यावेत, ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये या मागण्या आयोगाकडे करण्यात आल्या.
नवनियुक्त अध्यक्ष श्री. संभाजी म्हसे यांच्यासमवेत ओबीसी संघर्ष समिती नेत्यांच्या शिष्टमंडळाने भेटून या प्रश्नांवर चर्चा केली.
यावेळी लक्ष्मण सुपेकर, मोहन देशमाने, सुधीर पाषाणकर, मनोज झेंडे, कमलाकर दरवडे, मंगेश ससाणे, मृणाल ढोलेपटील यांनी नेतृत्व केले.