ओबीसी भटक्या विमुक्त जनजाती विमाप्र व मुस्लीम ओबीसी अल्पसंख्यांकांचा महामेळावा
ओबीसी महासभा महाराष्ट्र प्रदेश व ओबीसी प्रहार (मासिक) यांचे संयुक्त विद्यमाने ओबीसी भटक्या विमुक्त जनजाती विमाप्र व मुस्लीम ओबीसी अल्पसंख्यांकांचा महामेळावा उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे 30 येथे 4 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. सदरच्या महामेळाव्यास महाराष्ट्रातील विविध भागातुन हजारो लोक आलेल होते.
सदरच्या महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी जम्मू व कश्मिरचे विख्यात वितिज्ञ व ओबीसीचे नेते मा. अॅड. अशोक बसतराज, मध्यपुरा बिहारचे चंद्रशेखर कुमार, अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा व शोषीत वर्ग संघटना मध्यपुरा, गुजरातचे जयंत भाई मनानी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राष्ट्रीय पिछडा व शोषीत वर्ग संघटना नांदेडचे श्री. एस.जी. माचनवार, राष्ट्रीय पिछडा व शोषित संघटना मा. श्री. विजय शिनकर उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड, मा. श्री. गोपाळशेठ तिवारी नगरसेवक व सदस्य राष्ट्रीय काँग्रेस कमिटी काँग्रेस, मा. कैलास नेवासकर मा. नगरसेवक पिंपरी चिंचवड, शिवसेना मा. आबा बागुल माजी उपमहापौर म.न.पा. , पुण मा. नाना क्षिरसागर नेते, माथाडी कामगार व रिक्षा संघटना, पुणे मा. सुनिल कदम प्रााध्यापक, स्किल्डा डेव्हलपमेंट व अध्यक्ष रिपब्लीकन जनशक्ती महाराष्ट्र प्रदेश पार्टी मा. नजीर अहमद शेख तांबोळी , महासचिव राष्ट्रीय मुस्लीम ओबीसी महासंघ व संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब अंबिके ओबीसी कार्याध्यक्ष रामदासजी धोत्रे, संघअक नाना कासार व अध्यक्ष व संपादक डॉ. पी. बी. कुंभार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अॅडव्होकेट अशोकरावजी बसवतराज, जम्मु काश्मीर यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस हार घालुन करण्यात आली. ओबीसी प्रकारच्या आजपर्यंतच्या 16 अंकाचे एकत्रित प्रदर्शनाचे उद्घाटन मा. विजयराव शिनकर अध्यक्ष बालाजी बहुउद्देशीय संस्था, पुणे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रथम प्रास्ताविक मा. श्री. महादेव मेंगे यांनी केले त्यांचे प्रस्स्ताविक ओबीसी प्रहार मासिकात सविस्तार छापले आहे.
तर दुसर्या सत्राचे प्रस्ताविक मा. श्री. रामदासजी धोत्रे कार्याध्यक्ष ओबीसी महासभा म. प्र. यांनी खालीलप्रमाणे केले. ओबीसी महासभा महाराष्ट्र प्रदेशची स्थापना 2012 साली डॉ. पी. बी. कुंभार यांचे अध्यक्षतेखाली मा. बाळासाहेब अंबिके व इतर ओबीसींचे कार्यकर्ते एकत्र येऊन स्थापन केली. या संघटनेस आज 4 वर्षे पुर्ण होत असुन या चार वर्षात अनेक मोठ मोठे कार्यक्रम घेऊन ओबीसी भटके विमुक्त, विमाप्र व अल्यपसंख्याक ओबीसी समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. हजारोंच्या संख्येत होणे कार्यक्रम म्हणजे ओबीसी हक्क परिषद ओबीसी जागृती मेळावा ओबीसी हजारोंच्या संख्येत होणारे कार्यक्रम म्हणजे ओबीसी हक्क परिषद ओबीसी जागृती मेळावा ओबीसी भटक्या विमुक्त जाती व विमाप्र व मुस्लीम ओबीसी राज्यव्यापी महाअधिवेशन तसेच ओबीसी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण इ. कार्यक्रम घेतले व महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यात महासभेचे अध्यक्ष व पदाधिकारी नेमुन ओबीसींचे कार्यक्रम पुढे सुरू केलेले आहेत. तसेच ओबीसी प्रहार हे मासिक ही सुरू केलेल आहे. म्हणून सर्व ओबीसी भटक्या विमुक्त विमप्र व मुस्लीम ओबीसींनी एकत्र येऊन 52 टक्के आपली शक्ती दाखवावी. मा. मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र मंत्रालय करण्याची मागणी केली आहे.
उद्घाटक अॅड. अशोक बसवराज यांनी उद्घाटनपर भाषणात ओबीसींनी एकत्र येण्यासाठी महात्मा फुले यांचे विचारधारा पुढे घेऊन आपले हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आता ओबीसींना मोठी किंमत मोजावी लागेल पण त्यामुळे पुढील पिढी सुखी होईल. तसेच समान न्याय बंधुता व स्वातंत्र्य हा ओबीसींचा हक्क आहे. तो मिळवुन देण्यासाठी ओबीसी महासभेने प्रयत्न करावेत.
जयंतीभाई मनानी राष्ट्रीय कोषाध्यक्ष, गुजरात हे बोलताना म्हणाले, हिंदू, मुस्लीम आणि आपआपसातील मतभेद विसरून सर्व ओबीसींनी एकत्र आले पाहिजे, फुले, शाहु, आंबेडकर यांची विचारधारा आत्मसाथ करून ओबीसी महासभेने पुर्ढ कार्य करावे. त्यांना आम्ही राष्ट्रीय स्तरावर पाठींबा देत आहोत.
अध्यक्षीय भाषणात डॉ. पी. बी. कुंभार यांनी प्रत्येक ओबीसी व भटक्याविमुक्त विमाप्र व अल्पसंख्यांकाचे दैनंदिन प्रश्न गंभीर आहेत. त्यांचे शिक्षण, व्यवसाय, उद्योग इ. प्रश्न अत्यंत संवेदनशील आहेत. रेशनकार्ड जातीचे दाखले, नॉन क्रीमीलेअरचे दाखले, स्कॉलरशिप इ. वेळेत मिळत नसल्याने शिक्षण व नोकर्यांचे प्रश्न उपस्थित होत आहेत. बेकारीचे प्रमाण तरूणांच्यामध्ये वाढत आहे. आर्थिक मदत विविध मामंडळे व बँकाकडून मिळण्यास खुप अडचणी येतात इ. प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवले गेल्यास ओबीसींच्या विकासाला चालना मिळेल असे मत व्यक्त केले. त्या पुढील काळात अल्पसंख्यांक ओबीसींना एकत्र करून महाराष्ट्रातील सर्व वातावरण बदलण्याचा आपण सर्व प्रयत्न करू या. असे मत व्यक्त केले.
मा. श्री. बाळासाहेब अंबिके, उपाध्यक्ष ओबीसी महासभा यांनी ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आले पाहिजे. ओबीसी विद्यार्थ्यांना 100 % शिषयवृत्ती मिळावी ओबीसींची जातीनीहाय जणगणना करून त्वरीत जाहीर करावी. ओबीसींच्या 27 % आरक्षणास धक्का लावु नये. नॉन क्रिमीलेअरची अट रद्द करावी इ. विषयावर विचार व्यक्त करून ओबीसींनी एकत्र यावे असे आव्हान केले.