महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा पुणे विभागीय सहविचार मेळावा दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रोजी, क्रीडा संकुल, मंचर, ता आंबेगाव, जि. पुणे येथे संपन्न झाला अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात पदनियुक्ती आणि सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमास महासचिव डॉ भूषण कर्डीले सर सपत्नीक उपस्थित होते, त्यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन करताना समाजातील एकोपा टिकवण्यासाठी सर्वांनी बरोबरीने काम करण्याचा सल्ला दिला. नवीन आघाड्याची माहिती दिली.
आपल्या प्रास्ताविकात मारुती फल्ले सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, आणि अशा मेळाव्याची गरज पटवून दिली. राजकीय इच्छाशक्ती समाजाने जागवून आपले अस्तित्व अधोरेखित करण्याचे आवाहन केले. तसेच सुदुंबरे संस्था अध्यक्ष शिवदासजी उबाळे, कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी, सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे, भोर नगराध्यक्ष तृप्ती किर्वे, बारामती नगरसेविका सीमा चिंचकर, जुन्नर नगरसेवक अविनाश कर्डीले, हवेली पंचायत समिती मा सभापती वसुंधरा उबाळे, महोत्सव अध्यक्ष सुलोचना कर्डीले, उदघाटक विमल वाव्हळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विभाग अध्यक्ष चंद्रकांतशेठ वाव्हळ ह्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रमात प्रांतिक पुणे विभागाचे कार्याध्यक्ष गंगाधर हाडके, सचिव राजेश येवले, जिल्हाध्यक्ष दक्षिण पुणे अजय किर्वे, पुणे महानगर राजेश शेजवळ, पिंपरी चिंचवड महानगर डेंगाळे साहेब आणि महिला आघाडी, युवा आघाडी, सेवा आघाडी, तालुका अध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकारी बहुसंख्येने संमिलित झाले.
डॉ भूषण कर्डीले यांची महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ह्यावेळी उत्तर पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गिधे यांनी समाजाच्या वतीने त्यांना आयोगाकडून असलेल्या अपेक्षांचे निवेदन दिले. लग्न, घरभरणी यांची मोठी तिथी असूनही *250-300 समाज बंधू भगिनीनच्या उपस्थितीत अतिशय उत्तमप्रकारे विचार आणि सूचना यांचे आदानप्रदान करण्यात आले.
ह्या सोहळ्याचे आयोजन उत्तर पुणे जिल्हयाला करायला मिळाले, मारुती महादेव फल्ले, सर अध्यक्ष उत्तर पुणे जिल्हा यांनी ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. आंबारसाच्या जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली. आयोजनासाठी फल्ले सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजनातं आंबेगाव तालुक्यातील सरपंच भरत फल्ले, सरपंच राजू तेली, सोमनाथ फल्ले, वासुदेव कर्पे, अरुण घाटकर, राजू मेहेर, रमेश डिंगोरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
संजय फल्ले सचिव पुणे विभाग सेवा आघाडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच विभागीय सदस्य भरत फल्ले यांनी सर्वांचे आभार मानले. सर्व पदाधिकारी, महिला, युवा, सेवा आघाडी आणि तालुका अध्यक्ष