तळेगांव दाभाडे - या ठिकाणचे श्री. नंदकुमार किर्वे पाटबंधारे खात्यातून सेवाकाल संपववून सेवा निवृत्त होत आहेत. त्याबद्दल त्यांना उर्वरीत जीवन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवनाच्या आढावा घेत आहे. घरात अठरा विश्व दारिद्र सुखात नांदत असतानाच वडील वारले. घरात रांगणारी धडपडणारी चालू पहाणारी मुले तेंव्हा आई ने संसार खांद्यावर घेतला. घाण्याच्या बैलाचे ज्यु खांद्यावर घेऊन ती उभी राहिली. कुणाचे घर काम कर, कुणाची भांडी घास. कुणाची मुले शाळेत पोहच कर कधी कधी देहू रोडला जावून कंपनीत काम कर पण मुले मोठी करू लागली श्री. नंदकुमार लहान होते. वडील कळू लागले तेंव्हा वारले. आईला मदत करण्यासाठी ते गावातील समाजाच्या दुकानात कामाला जात. याच वाटेवर कसे तरी शिकले. गावातील दुकानात काम करू लागले. काही काळ कंपनीत ते कामाला जाऊ लागले. पण मुळात स्वभाव धडपड्या. यामुळे याच धडपडीतून त्यांना शासनाच्या पाटबंधारे खात्यात चतुर्थश्रेणीची नोकरी मिळाली.
या नोकरीने एक झाले एक हक्काची भाकरी मिळाली. या भाकरीने स्थिरता आली. तळेगाव या गावाला समाजाचा इतिहास आहे. एैतिहासीक काळी संत संताजींची पाऊले इथे उमटली. त्याच पाऊलाच्या खुना आज इतिहास ठरला आहे. कारण आज श्री संत संताजींचे हास्त लिखीत याच शहरात सुरक्षित आहेत इथ समाजाची वास्तु व समाजाचे मारूती मंदिर आहे. याच समाजाच्या वास्तुत कै. बाळासोा. बारमुख यांची विचार परंमपरा होती. त्यामुळे समाजाच्या कामात नंदकुमार यांनी उमेदवारी केली. समाज सेवा त्यांच्या रक्तात भिनली. मारूती मंदिर चौकातील मारूती मंदिर हे समाजाचे होते. परंतु या मंदिराला पुर्ण शहराचा वावर होता. किर्वे मंदिराच्या कामात सामील झाले. मंदिर जुने झाले होते. याची जीर्णीद्धार करणे गरजेचे होते. एक विश्वस्त व जबाबदार घटक म्हणुन त्यांना या जीर्णीद्धार कामात स्वत:ला झोकून दिले.आणि जिर्णध्दार पुर्ण केला यासाठी त्यांनी सर्वांनी सहकार्य दिले व घ्रेतले सुद्धा समाज कार्य हा पिंड बनला असल्याने सुदूंबरे येथे ते सेवेत असत. यातुनच मोफत वधुवर फॉर्म गोळा करणे. मोफत माहिती पुरवणे ही जबाबदारी बरेच वर्ष संभाळली समाज सर्वे, समाज खाणें समुारी आज सर्वत्र होते परंतु घरची भाकरी बांधुन घरोघरी जावुन समाजाचे माहिती गोळा करून प्रसिद्ध करण्याचे काम त्यांंनी एकदा नव्हे तर दोनदा केले आहे. आज वधुवर मेळावा भरवणे म्हणजे नेमके काय होत आसते. हे गुपीत सर्वाना कळुन चुकले आहे. आशाच काळात तळेगाव येथे मोफत वधु -वर मेळावा घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. श्री. संत संताजी महाराज तेली संस्था सुदुंबरे या संस्थेचे ते सचीव ही होते. याच काळात सुदूंबरे येथे महामेळावा झाला होता. पाटबंधारे खात्यात चतुर्थ कर्मचारी असल्याने आपल्या सोबत्यांची दु:खे शासनदरबारी मांडतात चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेत ते अध्यक्ष होते. याच सुजाण नेत्याला भावी आयुष्याला हार्दिक शुभेच्छा.