पुणे :- सहकार नगर प्रभागातून विद्यमान नगरसेवक श्री. आबा बागुल पुन्हा नगर सेवक पदी 5203 मतानी विजयी झाले. त्यांना 7394 मते मिळाली तर बनावट कुणबी (मराठा) यांना 6549 मते मिळाली. ओबीसी राखीव मतदार संघात सर्वच पक्षांनी विजयी होण्यासाठी बनावट ओबीसी उभे केले होते. जात दांडगे व धनदांडगे यांनी दहशद निर्माण केली होती. मोदींचा बागुल बुवा लाट उभी करून अनेक प्रभागात भले भले पाडले. परंतु जे मोजके खरे ओबीसी विजय झालेत त्यात आबा अधीक मताने विजयी झालेत. उपमहापौर म्हणून त्यांनी केलेले काम. ओबीसी विषयी असलेली तळमळ या बळावर ते विजयी झालेत. त्यांचे अभिनंदन ओबीसी सेवा संघाचे सर्वश्री मोहन देशमाने उपाध्यक्ष महाराष्ट्र. योगेश ढगे, प. म. अध्यक्ष, रमेश भोज पुणे जि. अध्यक्ष, दिलीप शिंदे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा तसेच पुणे समाज बांधवा तर्फे घनश्याम वाळंजकर, प्रकाश कर्डिले, दिलीप व्हावळ, माऊली व्हावळ व सर्व विश्वस्त यांलनी केले आहे. त्यांच्या भावी वाटचालीस तेली गल्ली तर्फे शुभेच्छा.