वधु-वर पालक परिचय मेळावा साजरा
पनवेलमध्ये प्रथमच तेली समाज मंडळातर्फे वधु-वर मेळावा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये दिनांक ३०/११/२०१४ रोजी (रविवार) मोठ्या उत्साहात पार पाडला. पनवेल येथील जय संताजी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश वैरागी यांच्या अधिपत्याखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण विभागातील वधु-वर पालक व तेली संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारणी मंडळ मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
पनवेल वधु-वर मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जयदत्त क्षिरसागर (आमदार बीड व माजी कॅबिनेट मंत्री सार्वजनिक बांधकाम तसेच अध्यक्ष भारतीय तेली महासभा) यांच्या उपस्थिती होती. मेळाव्याचे उद्घाटन श्री. शिरिष चौधरी (आमदार अमळनेर-नंदुरबार), श्री. गजानन शेलार (कोषाध्यक्ष, प्रांतिक तेली महासभा), श्री. अशोक व्यवहारे (कार्याध्यक्ष, प्रांतिक तेली महासभा), श्री. संतोषभाऊ चौधरी (ज्येष्ठ समाजसेवक) यांनी केले. वधु-वर पुस्तिकेचे प्रकाशन श्री. नितीन शिंदे (उद्योजक पुणे), श्रीम. राजश्री भगत (सामाजिक कार्यकर्त्या, पुणे), श्री. शरद तेली (नगरसेवक बदलापूर), श्री. अविनाश टेकावडे (नगरसेवक, पिंपरी-चिंचवड) यांच्या हस्ते झाले तर दिप प्रज्वलन श्री. मनोज साहू (उद्योजक नवी मुंबई), श्री. विलासराव त्रिंबककर (अध्यक्ष प्रांतिक तेली महासभा मुंबई विभाग), श्री. भुषण कर्डिले (महासचिव, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा), श्री. सुनिल चौधरी (अध्यक्ष प्रांतिक तेली महासभा ठाणे विभाग), श्री. जनार्दन जगनाडे (अध्यक्ष क्षेत्र सुदुंबरे संस्था), श्री. चंदक्रांत वाव्हळ (अध्यक्ष प्रांतिक तेली महासभा पुणे जिल्हा), सौ. प्रिया महेंद्रकर (ज्येष्ठ समाजसेविका), सौ. रेखाताई चौधरी (उद्योजिका नवी मुंबई), श्री. प्रभाकरशेठ डिंगोरकर (पनवेल तेली समाज आधारस्तंभ) या सर्वांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रस्ताविकात जय संताजी तेली समाज मंडळचे अध्यक्ष श्री. सतीश भालचंद्र वैरागी यांनी आढावा घेताना, वधु-वर मेळावा घेणे ही काळाची गरज असून त्या माध्यमातून समाज संघटीत होते. समाज ही ताकद असून मंडळातील श्री. अतुल खंडाळकर (सचिव), श्री. संदेश डिंगोरकर (उपाध्यक्ष), श्री. सुनिल खळदे (कार्याध्यक्ष), श्री. तुकाराम किरवे (खजिनदार), श्री. रविंद्र जगनाडे (सहसचिव), श्री. गणेश धोत्रे (सहखजिनदार), श्री. चिंतामणी कुकडे (सहसचिव), सदस्या- शुभांगी खळदे, सौ. प्रिया डिंगोरकर, सौ. ज्योती जगनाडे, सौ. स्वाती चौधरी, सौ. प्रज्ञा धोत्रे हे श्रेयाचे वाटेकरी असून त्यांनी रात्रंदिवस मेहनत, कष्ट करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहे. तसेच घरोघरी जाऊन संपर्क साधला. पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव व कोकणपट्टीमधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यामध्ये झंझावती दौरे केले. दौर्याची सुरूवात मा. श्री. गजानन शेलार साहेब यांच्यापासून केली. त्यांनी आम्हाला सकारात्मक विचार दिले व त्यांनी वधु-वर मेळाव्याविषयी मार्गदर्शन केले. श्री. वैरागी यांनी नंदुरबार येथील मा. श्री. हिरालाल काका चौधरी यांचे आवर्जून उल्लेख केले की हिरालाल काका म्हणजे खाणी मधील हिरा असून आम्हाला तेलांचा राजा पाहावयास मिळाला. गावातील लोक त्यांच्या पाया पडत असल्याचे दिसल्यावर मला त्यांचे देवपण दिसले. समाजाबद्दल ओढ, कळकळ, आपुलकी दिसली. तसेच मा. श्री. जयदत्त क्षिरसागर साहेब हे आमचे स्फूर्तीस्थान आहेत. शासकीय कामामुळे त्यांना समाजाच्या कार्यक्रमाला हजर होत नसेल त्यावेळेस ते सौ. प्रिया महेंद्रकर यांच्यामार्फत समाजासाठी खास मार्गदर्शन करीत असतात. समाजासाठी मदतीचा हात पुढे करीत असतात. नाशिकमधील मा. श्री. अशोक काका व्यवहारे, मा. श्री. सुनिलजी चौधरी साहेब, मा. डॉ. भुषण कर्डिल साहेब यांचे अनमोल सहकार्य लाभले. मा. श्री. नरेंद्रजी मोदी तेली समाजाचे घटक आहेत. त्यांच्या राष्ट्र निर्मितीत महाराष्ट्रातील मोठी लोकसंख्या असलेली तेली समाजाने हातभार लावण्याची आवश्यकता आहे असे श्री. वैरागींनी समजावून सांगितले.
मेळाव्याचे अध्यक्ष श्री. जयदत्त क्षिरसागर यांनी समाज संघटनेचे महत्व सांगितले. समाज व्यक्ती वधु-वर पालक मेळाव्याचे महत्व सांगताना समाजाला संघटीत राहण्याची विनंती केली. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या समाजाच्या मुला-मुलींनी स्वतःच्या बुध्दीच्या जोरावर यश संपादीत केले आहे. त्यामुळे जातीच्या आरक्षणापेक्षा स्वतःच्या बुध्दीच्या जोरावर आरक्षण मिळविणे आवश्यक आहे. श्री. शिरिष चौधरी यांनी तेली समाजाच्या मतांच्या जोरावर बहुमताने निवडून आणल्याबाबत तेली समाजाचे आभार मानले. माझे वडिल हिरालाल काकांचा दुरा पुढे मी त्यांच्या आशिर्वादाने चालविणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी माझे पाऊल नेहमीच पुढे असेल. श्री. डॉ. भुषण कर्डिले यांनी कै. क्षिरसागर काकू यांनी समाजासाठी जे काम केले त्याची आठवण करून दिली. आपल्या भाषणात श्री. गजानन (नाना) शेलार यांनी सांगितले की वधु-वरांनी बाह्य रंगावर भूलून न जाता अंतरंग महत्वाचे आहे. वधु-वर मेळावा करणे ही मोठी खर्चिक बाब आहे कारण त्याच्या पुस्तकाचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे, याची जाणीव पालकांनी घेणे आवश्यक आहे. तडफदार भाषणात समाज एकत्र आणण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा ही झंझावती दौरे व उपक्रम राबवित आहे. तसेच त्यांनी श्री. वैरागी व त्यांच्या कार्यकारणी मंडळाने अतिशय सुंदर, नियोजनबध्द कार्यक्रम राबविला. संताजींचे चलचित्र व रेखीव मुखपृष्ठ यामुळे वधु-वर तेली समाजाची पुस्तिका सुंदर झाल्याची शेवटी आपल्या भाषणात सांगितले. सरतशेवटी श्री. जयदत्त क्षिरसागर, श्री. रामदास तडस, श्री. अशोक व्यवहारे, श्री. गजानन शेलार, डॉ. भुषण कर्डिले यांनी श्री. सतीश वैरागी यांचे तेली महासभा कोकण विभाग प्रमुख (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा) म्हणून नाव जाहीर केले व उपस्थितांनी मान्यता स्विकारून टाळ्यांच्या कडकडात स्वागत केले