नाशिक - तेली समाजासाठी कार्य करणार्या श्रीग्रुप फाउंडेशनच्या वतीने अयोजित वंचितांच्या वूध-वर मेळाव्यासाठी यंदा तब्बल 400 इच्छुकांची नावनोंदणी करण्यात आली होती. त्यात आर्थिक दुर्बल, अंध, मुक - बधिर, घटस्फोटित, विधूर, विधवा व वयस्कर वधू -वरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यानिमित्ताने त्यांच्यासाठी आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळण्याचा योग आला होता.
समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांसाठीही त्यांचे आयुष्य असते. त्यांच्याही मनोकामना पूर्ण करण्याचा ध्यास घ्यायला हवा, या विचाराने महाकवी कालिदास कलामंदिरात रविवारी (दि. 30 ) श्रीग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातुन वधू - वर मेळावा आयेजित करण्यात आला होता. काही कारणास्तव घरची जबाबदारी व परिस्थितीमुळे लग्न करू न शकलेल्या वयस्कर विवाहोच्छुक, पूर्णांध व्यक्ती, अपंग किंवा अधू व्यक्ती, मूक - बधीर व्यक्ती, विधवा विधूर आणि घटस्फोटितांचा यात समावेश होता. गेल्या वर्षी झालेल्या या वधू -वर मेळाव्यातून 53 विवाह निश्चित झाले. या पैकी 3 अंध व्यक्तींचे विवाह हे डोळस मुलींशी झाले आहेत.
पाल्याच्या आयुष्यात जीवनभराचा जोडीदार असावा, त्यांनाही सुखात रहाता यावे, या अपेक्षेने प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. पाल्यात व्यंग असल्यास समाजात त्याला स्थान मिळवुन देण्याची धडपड पालकांमध्ये दिसून येते. ही धडपड या मेळाव्यामध्ये आलेल्या पालकांची दिसत होती.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उद्घाटक म्हणून शकुंतला चौधरी, संतोष चौधरी, प्रमुख पाहूणे म्हणून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समिती सभापती मनीष पवार, रमेश चांवडकर, महेश जंगम, सलिम शेख, बी.एम. कांळे, आसीफ शेख , यू. बी. पवार प्रमुख होते. मेळाव्याचे आयोजन, उपाध्यक्ष विक्रांत चांदवडकर माजी महापौर अँड. यनित वाघ, सुधाकर देसाई, श्रीमंगलचे संपादक यांनी केले होते.
प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष जी. एम. जाधव यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते वधू-वर सुचीचे प्रकाशन करण्यात आले.