तळेगांव दाभाडे दि. 13 :- सालाबादप्रमाणे दि. 11 एप्रिल रोजी तेली आळीतील मारूती मंदिर येथे हनुमान जयंती महोतसव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.
पहाटे 5 वाजता प्रथेप्रमाणे तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संदिप पिंगळे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. 5.30 ते 7 वा. या वेेळेत ह. भ. प. नितीन महाराज काकडे यांचे हनुमानजन्मावर कीर्तन झाले. संपूर्ण दिवसभर समितीच्या वतिने मंदिरामध्ये प्रसाद वितरित करण्यात आला. रात्री 8 वा. सौ. चित्रा जगनाडे, संदीप जगनाडे, पोपटभाऊ जगनाडे, तनुंजा जगनाडे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.
मंदिरामध्ये हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. त्यामुळे तेली आळी येथे जत्रेचे स्वरूप आले होते. मंदिरामध्ये विद्युत रोषणाई व आरास निोद इंगळे व गणेश क्षिरसागर व मंडळाच्या मित्रपरिवरांने केली होती. मारूती व शनिदेवावर वाहण्यासाठी तेल, उडिद, मीठ, रूईच्या माळा भक्तजन आणत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलाकर क्षिरसागर, नंदू किर्वे, कमलाकर कसाबी, संदिप पिंगळे, योगेश चौधरी, मुरलीधर जगनाडे, भाऊ खोंड, विठ्ठल करपे, प्रदीप टेकवडे, सुरेश बारमुख, नारायण केदारी, माने देशपांडे मामा यांनी श्रम घेतले.
मारूती मंदिर भंडारा उत्सव समिती व संताजी प्रतिष्ठाण यांच्या वतीने तेली समाज कार्यालय येथे महाप्रसाद वितरित करण्यात आला.