बुलढाणा - स्थानिय सहकार विद्या मंदिरातील सांस्कृतिक भवनात आज 18 जानेवारी 2015 रोजी आयोजित जिल्हास्तयि तेली समाज संमेलन आणि उपवर वधू-वर व पालक परिचय मेळाव्याला उत्साही प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भरभकक्म ऐक्यातून सामाजिक - शैक्षणिक क्रांती घडविण्याचे आवाहन उपस्थित हजारो समाजबांधवांना केले.
जिल्हा शाखेतर्फे या आयोजक श्रीराम हिंगे यांच्या पुढाकारातून सलग दुसर्या वर्षी आयोजित या कार्यक्रमाला धुळे पालिकेच्या महापौर जयश्री अहिरराव, माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष टी.डी. अंभारे पाटील, शंकर चौधरी, सुनील उदयकार, कमलाकर अहिरराव , संत संताजी महाराज शिक्षण संस्थेचे राजू उर्फ प्रवीण भिसे, संतोष पिंपळे, अकोटकर, विष्णूपंत पाखरे, किशोर करपे, रत्नपारखी, श्रीकृष्ण वाघमारे, बंडुसेठ राठोड आदींसह समाजबांधव, पालकवृंद उपवर वधू वर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात श्रीराम हिंगे यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली, सलग दुसर्या वर्षी संमेलन यशस्वी केल्याबद्दल समाजबांधवांचे अभार मानले. भविष्यात सामुहिक विवाह सोहळा घेण्याचा मानस यांनी बोलून दाखविला. जयश्री अहिरराव यांनी जोशिल्या मार्गदर्शनपर भाषणाने मेळाव्याची रंगत वाढविली.
युवक - युवतींनी समाजसेवा वसा सांभाळत शैक्षणिक क्रांतीतून समाज निर्मीती करावी, असे अवाहन त्यांनी केले. महिलाना पुरूष वर्गांनी पाठबळ दिले तर त्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. महिलांना पुरूष वर्गानी पाठबळ दिले तर त्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, असे प्रतिपादन त्यानी केले हुंडा, स्त्रीभ्रूणहत्या स्त्री-पुरूष विषमता या सारख्या अनिष्ठ पद्धती नष्ठ करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष अभोरेपाटील यांनी मेळाव्याच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून पुएील उपक्रमांना सर्वतोपरी आयोजकांचे अभिनंदन करून पुढील उपक्रमाना सर्वतोपरी आयोजकांचे अभिनंदन करून पुढील उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विजयराज शिंदेयांनी संमेलन व परिचय मेळाव्यासारखे कार्यक्रम म्हणजे सोशल इंटरनेट (समाजमन जुळपिण्याचे माध्यम) होय, असे प्रतिपादन केले. तेली समाजाने आज प्रगतीचा मोठा पल्ला गाठला असून शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात समाजाची कामगिरी उंचावत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात समाजाच्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी मान्यवारांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यावर कार्यक्रमाला औपचारिक प्रारंभ झाला. यावेळी उपवर-वधुंची माहिती असलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर हिंगे व संध्या राऊत यांनी केले.
यानंतर मेळाव्यात सहभागी शेकडो उपवर वधू-वरांनी व्यासपीठावर येऊन आपला परिचय दिला.