धुळे, (प्रतिनिधी) : पंढरपूर येथील कैकाडी महाराज यांच्या मठात संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्याची मागणी तालुका तेली समाज महासभेतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार नुकतीच मठात संत जगनाडे महाराज यांची मुर्ती स्थापन करण्यात आली. धुळे तालुका तेली समाज महासभेतर्फे अध्यक्ष दौलत नामदेव चौधरी यांनी पंढरपुर येथील कैकाडी महाराज यांच्या मठात संत जगनाडे महाराजांची मुर्ती भेट दिली. गेल्या सहा वर्षांपासून तेथील मठाचे व्यवस्थापक ह.भ.प. रामदासबाबा जाधव यांच्याकडे संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार संत जगनाडे महाराजांची मुर्ती बसविण्यात आली आहे. या मुर्तीचे लाखो भाविकांना दर्शन होणार आहे.