घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 1 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
बांधलेली झापड तोडून टाकली. ही माझी कथा 1994 मध्ये प्रसिद्ध झाली होती ओबीसींच्या साहित्य विश्वातील पहिले पुस्तक ओबीसी जीवन कथा या पुस्तक रूपात ती होती. त्या काळा पर्यंत मी गाव गाड्यातुन येताना तेंव्हा घरी बैलघाना होता. बैलाला झापड ही होती. तो घाना जेंव्हा जमीनीतुन खोदून काढला तेंव्हाचा तो काळ या काळात जगण्याचा जो संघर्ष करावा लागला त्या संघर्षाची ती तोंड ओळख. नुकताच मंडल आयोग लागु झाला होता. आणी याच काळात घानवड, घाना, बैल, घान्याची कातर, लाठ, डोक गायब झाले. फक्त गायब झाली नाही बैलाची झापड. आज पर्यंत आम्ही आमच्या बैलाच्या डोळ्याला बांधत होतो. ती बांधली की बैल थांब म्हणे पर्यंत फिरत होता. आणी आसे फिरताना ती झापड होती म्हणुन त्याला चक्कर येत नव्हती. मंडल आयोगा नंतर ती झापड आपन आपल्या डोळ्याला आपल्या हाताने करकचुन बांधली...