घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 2 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
परवा एका व्हॉटस ऑप ग्रुपवर लग्न जमवीण्याची शंभरी गाठण्यार्या कार्यकर्त्यानं सांगीतले आता एकच टारगेट वधुवर मेळाव्याचा व्यवसाय बंद करणार. झाले ही बातमी वधुवर मेळाव्याच्या पंढरीत पोहचली. ती बातमी पोहचताच हातावर घडी तोंडवर बोट दरबारात उभ्या असणार्या दूताने फर्मान आईकला कोणरे हा भामटा त्याला दरबारात हाजर करा. नेहमी प्रमाणे दुताने बाहेर येऊन एक डरकाळी फोडली ती डरकाळी मोबाईल मधुन महाराष्ट्रात फिरली. तेंव्हा समाजच नव्हे तर उभा सह्याद्री हादरला कारण आसे दुत हे दरबारात हात बांधुन तोंडवर बोट ठेवून असतात. हे यासाठी आशा भाट मंडळीची सध्या चलती आहे. त्यांच्या शब्दाला वजन आहे. ते देशाचे पंतप्रधान या नंतर कोण हे ही ठरवू शकतात. तेली समाजात जे जे चांगले जे जे उतुंग आहे त्याचे हे दुत शिल्पकार आहेत. हे सर्व बाहेर पण जेंव्हा दरबारात जातात तेंव्हा यांच्या साठी कोपर्यातली जागा कायमची दिलेली आसते. पुर्वी राजे होते तेंव्हा राजवाड्यात भाट मंडळींना हीच जागा असे आज काळ बदलला परंतू जेंव्हा पुण्यात सुरू झालेला वधुवर मेळावा इतरत्र सुरू झाला तेंव्हा त्या कार्यकर्त्यांना वधुवर नोंदणी करणे हे एक दिव्य होते. वधुवरांच्या घरी जावून मनधरणी करावी लागे, त्यांना उपस्थीत करणे व परिचय करावयास लावणे ही कसरत होती. याला तेंव्हा काही आम्ही येरे गबाळे नव्हे किंवा हा बाजार म्हणत. तेंव्हा त्या काळी जिद्दी समाज बांधवांनी आपल्या त्यागावर निष्ठेवर वधुवर मेळावा काळाची गरज म्हणून सुरू केला तेंव्हा इथे समाजासाठी त्याग होता तेंव्हा इथे समाजासाठी निष्ठा होती. तेंव्हा येथे तळमळ होती. मळमळीला आधार नव्हता. मी आसे किती तरी मेळावे पाहिले शहरात गावात होणारे वधुवर मेळावे यशस्वी करण्यासाठी व्यवसाय बंद करून घराला कुलूप लावून यशस्वी करीत होते. आजही त्या काळातील जाणती माणसे याला साक्षी आहेत. नंतर असे काय घडले की त्याला हे स्वरूप आले. याला अनेक कारणे. हे त्या पैकी आपन काही कारणाचाच मागोवा घेऊ. आपल्या मुलीला चांगले स्थळ किंवा मुलाला चांगली व सुंदर व आर्थिक भक्कम स्थळ मिळताच. आमचे लग्न इथे जपले हे सांगण्यास ही जो मोठे पणा लागतो. काम करणार्याला जी शक्ती यातून मिळते ती सुद्धा देण्याची माणसिकता विशेष दिसून आली नाही. बाल्य अवस्थेतील मेळावे. या वेळी शिक्षणाने अपेक्षा वाढल्या. नोकरी मुळे स्थलांतरीत पण झाले. अपेक्षा वाढल्या आयटी पार्क मुळै खेळता पैसा आला पैसे घ्या लग्न जमवायला हात द्या. मग लग्न जमताच समाज व समाज कार्यकर्ता कोण हा प्रश्न करू लागले ? मुळात गरज म्हणुन सुरू झाले वधु वर मेळाव्याला पहिली झापड बांधली गेली. मेळाव्याला समाज येतो भाषण पेक्षा वधु वर पुस्तक व भव्य दिव्य पणा या साठी पैसा तो देणारे वधु वर व हवसे नवसे व गवसे भेटू लागले यातून स्पर्धा जन्माला आली समाजाच्या स्तरातुन अर्थीक पाठबळ मिळू लागताच हौस वाढली या हौसे पोटी इतर समाजाच्या देणग्या जहीराती ढिगाने मिळू लागल्या. यात मराठा समाजाच्या जहिरातींचा पाऊस पडू लागला हे असले राजकीय जहिरात दारांच्या फोटोने वधुवर पुस्तीका भरून गेली. आणी या स्पर्धेत या मोठे पणात आम्ही एक झापड बांधली. आम्ही मराठा समाजाच्या नजरेतून राजकारणातून बहिषकृत झालो. या बहिष्कृत पणा मुळे लाखो रूपये देऊन आलेले खोटे ओबीसी प्रामणपत्र पाहून आम्ही मैदानात उतरलोच नाही. उलट दुसर्या मेळाव्याला मदतीचा शब्द घेऊन त्यांना मत दिली व खुले आम प्रचार ही केला. आम्ही वधु वर मेळाव्याचे राजे तुम्ही जिल्हा परिषद नगर पालीका, महानगर पालीकाचे राजे विकासाच्या नाड्या तुमच्या हातात तुम्ही आर्थीक बलवान व्हा तुम्ही सत्ताधारी व्हा तुमचा कोणाताही पक्ष असो त्याशी आमचे तुमच्या मुळे नाते. फक्त एक करा तुमची एक चिंधी आमच्या भव्य दिव्य वधु वर मेळाव्याच्या कपाळावर बांधा. ही अपेक्षा ठेऊन आज वधु वर मेळावे भरवले जातात हे खाजगीत कबुल करतात त्यावर तावा तावाने बोलणारे भेटतात पण कार्यकर्त्याच्यां डोळ्यावर झापड इतक आवळून बांधली की कितपत रास्त आहे ? आता मुळ प्रश्न राहिला सोशल मिडीयाचा, व्हॉटस ऑप, वेब साईट ही नवी प्रणाली उदयास येऊ लागली. या एका क्षणात संपर्क येऊ लागला. यातून ही लग्न जमु लागली.पण त्याला काही धोक्यांची किनार आहे. हे क्षेत्र बंदिस्त नाही ते मुक्त आहे. तेंव्हा जबाबदारीचे भान तेवढेच गरजेचे आहे. आणी काळ बदलला आहे. या बदलत्या काळा नरूप ही वधु वर मेळाव्यासाठी धडपडणार्या मंडळीने आत्मपरिक्षण करून बदल केला पाहिजे. नाहीतर भाटांचे काम काय माहिती देणे व स्वत:ची पाठ शुभेच्छांची करणे.