घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 3 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
काँग्रेस ही क्षत्रीय ब्राह्मण व समाजाची होती घटनेनुसार ओबीसी साठी 341 कलम असताना ही नेहरूंनी ते लागू केले नाही. लोकशाहीतील ही दहशदवादी कार्यवाही होती. भिती होती जर हा ओबीसी जागा झाला राजकीय जमात झाला तर आपना सर्वांची मोठी अडचण होणार. म्हणून त्यांनी ओबीसी जातींना जाणीवपुर्वक दूर ठेवले. सर्व सत्ता केंद्रे त्या त्या राज्यातील याच समाजाच्या हातात होत्या. विकास पासून हे समाज दूर ठेवले म्हणून समाज अंतरगत एक अदृश्य दरी निर्माण झाली. एकसंघ काँग्रेस मधील मतभेद यातुन एक हाती सत्ता राबवताना आणीबाणी लादली. या आणीबाणीमुळे प्रथमच बहुसंख्य ओबीसी सत्तेत गेले यांनीच बी.पी. मंडल आयोग नेमावयास लावला. तो नेमताच ब्राम्हणवादी पक्षाने फूट पाडून भाजपा केला. महाराष्ट्रातील क्षत्रीय जातीने याच दरम्यान कै. आण्णापाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा महासंघ उभा केला. याच काळात त्यांनी ओबीसी आरक्षणाला रस्त्यावर उत्तरून उत्तर दिले. आता काँग्रेसचेे नेतृत्व हे मुळात क्षत्रीय जातीकडे व भाजपाचे नेतृत्व ब्राम्हणाकडे. एकाने राममंदिर हा मुद्दा निर्माण करून मंडल कोपर्यात ठेवला. या दोन्ही जातींनी संगनमत करून मंडल गोठावला आता हे दोन्ही पक्ष आपले होऊ शकतात ? त्यांनी आपला विकास होऊ दिला ? या प्रश्नाचे उत्तर नाही हेच आहे. तरी आपन कधी काँग्रेस कधी भाजपा या सारख्या उच्च जातींच्या वळचनीलां उभे असतो. त्यांच्या साठी राबतो हे दोघे ही त्यांच्या स्वार्थासाठी राममंदिर, हिंदू मुसलीम हे फड उभे करतात आपनच आपले एकमेकांचे रक्त ही सांडतो. याची जाणीव होऊ नये म्हणुन या मंडळींनी झापड आपल्या डोळ्याला करकचून बांधली आहे ती नसेल तर यांचे सत्य स्वरूप दिसेल ते ----- ? म्हणुनच त्यांनी सांगीतले ही झापड गोंजरत रहा हीच पक्ष निष्ठा हीच देश निष्ठा, हिच राष्ट्र निष्ठा.