घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 4 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
तुमचा धर्म कोणता रे. तुमचा ब्राम्हणी धर्म तुम्ही लिहीलात. या धर्माला देवाचा आदेश तुम्ही सांगता. हे जगने हेच तुमचे पुण्य. असा हा ब्राह्मणाळलेला धर्म व त्याचे ठेकेदार संत संताजींनी पायदळी तुडवले. तो तुडवून ते शांत बसले नाही तर शेकडो वर्षा साठी ब्राह्मणी पणाला एक दहशद निर्माण केली. त्या साठी त्यांनी दिलेली झापड संताजींनी हिसकावली ती पाययदळी तुडवली व ब्राह्मणी काव्यांचे त्यांना दर्शन झाले. संताजी हे माणूस होते. ते दैवी चमत्कार करणारे नव्हते ते वास्तव समजुन घेऊन. लढण्याचे ठिकाण ओळखुन. त्या शत्रुची बलस्थाने समजुन घेऊन हाल्ला करणारे होतेे. ते तसे डोळस होते म्हणुन हाल्ले करू शकले व ब्राह्मणी प्रणाली पायदळी तुडवली. ती झापड तोडली म्हणून त्यांना त्यांनी चक्कर दिली, भोव ळ ही दिली. परंतु त्यावर मात करून ते विजयी झाले. माझ्या नंतर माझा फोटो पुजावा माझे भक्त बनुन जय संताजी म्हणत रहावे. माझ्या साठी मंदिर बांधावे त्यात आरती, आगरबत्ती धुप यांचा सहवासात मुर्तीत बसवावे. या साठी त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थे विरोधात लढण्यास झापड तोडली? ब्राह्मण्याची संताजीजींनी तोडलेली झापड आपण आज नेमकी शोधली आहे. ती शोधुण देण्यास त्यांनी सहकार्य ही केले आहे. ती आज आपन डोळ्याला बांधली आहे. ती का बांधली याची पुसटसी जानीव काहींना आहे हे ही नाकरता येणार नाही पण ही तोडली तर =====??? हा काल्पनीक प्रश्न तोडू देत नाही. ही बांधल्या मुळे आपण संताजींना त्यांच्या कार्यप्रणालीला विसरून फक्त पुजनाने माणसीक समाधान मानतो त्यांची सेवा केली तर पुण्य लाभते ही असली झापड बांधून जर आपन वावरलो तर संत संताजी यांनी जो संघर्ष केला. त्यांनी जी गाथा लेखन केले. ती गाथा फक्त पुजना पुरती वापरत आसु ती फक्त पारायण पुरती वापरत असू तर ती ब्राम्हणी झापड अधीक घट्ट बांधावयास पाहिजे कारण यातूनच मानवतेला ग्लानी येणार आहे. खरा धर्म भ्रष्ट होणार आहे. गुलामीत अनेक पिड्या कुजणार आहेत. आणी हे चक्र आज सुरू आहे. हे चक्र जेंव्हा पुर्ण होईल तेंव्हा ही झापड आपल्या पूर्वजांना तोडावीच लागेल. संत संताजींना पुजनात न ठेवता कार्याने समजावून घ्यावे लागेल.
- जय संताजी