पुणे - देशात प्रथमच पुणे महानगर पालिकेने एक लाख रूपये व सन्मान चिन्ह देऊन श्री संत संताजी पुरस्कार जाहीर केला होता. पहिला व सन 2017 चा पुरस्कार मनपाच्या सभागृहात 5 जानेवारी रोजी संपन्न झाला. या वेळी अध्यक्ष स्थानी महापौर श्री. प्रशाांत जगताप अध्यक्षस्थानी होते. सदरचा पुरस्कार श्री. संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार मा. उल्हासदादा पवार यांना मा. सदानंद मोरे यांच्या हास्ते देण्यात आला तेंव्हा ते म्हणाले. श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे संत तुकाराम हे अभंगा सहीत अस्तीत्वात राहिले. त्या काळातील व्यवस्थेतील सामान्यांंनी त्याग केला. म्हणुन आज तुकोबा गाथा अस्तीत्वात आहे. आज आपण पुरसकार दिलेले श्री. उल्हास पवार राजकीय जेवढे आहेत तेवढे ते संत साहित्याचे अभ्यासक ही आहेत. धार्मीक अध्यात्मीका पेक्षा सामाजीक अध्यत्म त्यांनी जीवनभर आचरणात आनले. महानगर पालिके तर्फे मा. आमदार उल्हास पवार याना दिला तेंव्हा त्यांनी संत तुकोबांची गांथा संताजी यांनी जीवंत ठेवली याचा उल्लेख केला.
पुण्याचे मा. उपमहापौर श्री. आबा बागुल यांनी आपल्या कार्यकाळात कायम स्वरूपी ठराव महानगर पालिकेत सर्वांना सोबत घेऊन केला होता. संत साहित्यातील एका अभ्यासकाला एक लाख व प्रमाणपत्र दिले जाईल. कार्यक्रमात तो दिला जाणार होता. या वर्षाचा पुरस्कार सोहळा होता. या वेळी श्री. आबा बागुल यांनी आपली भुमीका स्पष्ट केली महानगर पालीका मार्फत मार्फत पुरस्कार देण्याची सुरूवात झाली. आता इतर ठिकाणी ही याचे अनुकरण व्हावे ही विनंती केली. या वेळी मा. मंत्री बाळासोा शिवरकर. आ. शरद रणपीसे, मा. अलुगडे उपमहापौर, आबा बागुल मा. उपमहापौर यांनी विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमास सहकार्य तिळवण तेली समाजाचे विश्वस्त प्रकाश कर्डीले, घनश्याम वाळुंजकर, सतीश उबाळे, संजय भगत विजय शिंदे व सर्व विश्वस्त यांनी केले होते. कार्यक्रमास सर्वश्री चंद्रकांत वाव्हळ, फल्ले सर, शैलेश मखामले, सुभाष पन्हाळे, हरिष देशमाने, मोहन देशमाने, जगनाडे (नगराध्यक्षा तळेगाव) व इतर बांधव उपस्थीत होते