आनारसे
तेली समाज हा शिवास सर्वात जास्त मानतात. त्यामुळे आज ही आनेक ठिकाणी सोमवारी तेल घाणा बंद आसतो. तेल घाण्यास शिवाचे आवातार ही मानले जाते. दसर्याला घाण्याची यथासांग पूजा करून त्यास नैवेद्य दाखविला जातो, तो आनारश्यांचा.
साहित्य :- जुने तांदूळ (चिकट तांदूळ वर्ज्य), कोल्हापूरी पिवळा गूळ, तूप, खसखस साखर,
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन भिजत घालावेल, दररोज पाणी बदलून तांदूळ 3 दिवस भिजत ठेवावे. नंतर ते उपसून पाणी निथळून काढावे तांदूळ दमट असतानाच ते कुटून अगर मिक्सरमधुन त्याचे खुप बारीक पिठ करावे. जेवढ पिठ आसेल तेवढाचाच वजनाचा गुळ बारीक किसुन घ्यावापीठ व गुळ निट एकजिव करावा व त्यात दोन चमचे साजुकतुप घालावे. हे पिठ डब्यात बंद करून ठेवावे. साधारणता आठ दिवसा नंतर हे पिठ आनरसे बनवण्यास योग्य होते.
अनासे करण्या अगोदर हे पिठ पुन्हा मळुन घ्यावे व त्यांचे छोट छोटे गोळे करावे. प्लॉस्टिक पेपवर खसखस घेऊन त्यावर त्या थापाव्यात हे अनारसे मंद आचेवर तळावे.