नाशीक :- महारार्ष्ट तेली महासभेचे कार्याध्यक्ष श्री. गजुनाना शेलार हे नाशीक मनपात प्रचंड मतांनी विजयी झाले. मोदींची बेगडी लाट निर्माण करून सर्वत्र भाजपा वातावरण तयार असताना ही नाना नाशीकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विजयी झाले. मा. छगन भुजबळ यांच्या राजकीय वाटचालीतले शिवसेने पासुनचे शिलेदार नाशीक शहरात शिवसेना उभे करणारे. भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपली करताच त्यांच्यासाठी जिवाचे रान करणारे. एकमेव नाना होते. परंतू मध्यतंरी पुला खालुन आनेक पुर येऊन गेले. या मध्ये ते काही सक्रीय राजकारणा पासून दूर ही होते. नाना भाजपा वाशी होणार किंवा अपक्ष लढणार ही हवा होती. परंतू त्यांच्या स्वभावा प्रमाणे त्यांनी सर्वाना धक्के देत राष्ट्रवादी ची उमेदवारी स्विकारली व मोदी लाटेत ही राष्ट्रवादी काँग्रेसची वेशीवर टांगलेली आबु वाचवली. श्री. गजुनाना शेलार यांचे अभिनंदन सर्वश्री चंद्रकांत व्हावळ, मोहन देशमाने, ज्ञानेश्वर दुर्गुडे, प्रकाश गिधे यांनी केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade