संत संताजी महाराज जन्म पुण्याजवळील मावळ तालुक्यातील चाकण येथे सन् 1545 झाला. एका वारकरी असलेल्या विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई यांना सन् 1545 मधे पुत्ररत्न झाले. विठोबा यांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता. संताजी 10 वर्षाचे झाले आणि वडील विठोबा यानि त्यांना तेलधंद्याचा परिचय करुण द्यायला सुरवात केलि. शिक्षण तसे फारस नव्हते लिहिता वाचता येईल व्यवसायतील हिशोब ठेवण एवढच होते. त्या वेळच्या रितिरीवाजाप्रमाने त्याचं लग्न वयाच्या १० व्या वर्षी यमुना बाईसोबत झाले. संताजीना कथा कीर्तनची खुप आवड होती. आणि अश्यात 12 वर्ष निघुन गेले. एके दिवशी तुकाराम महाराज्यांच्या कीर्तनचि बातमी गावात पोहचली. संताजी महाराज तुकाराम महाराज्यांच्या कीर्तनात खुप तल्लीन झाले. आणि त्यानी तुकाराम महाराज्यांचा बोट धरून सोबत चालण्याचा निर्णय घेतला मग तिथे संताजी महाराज्यानी तुकाराम महाराजाना वचन दिले की मी कधीच संसाराकड़ दुर्लक्ष करणार नाही पण मला तुमच्या छत्रछायेखाली घ्या. तुकाराम महाराज्यांच्या १४ टाळ कऱ्यांपैकी संताजी महाराज हे प्रमुख होते. नंतर तुकाराम महाराज्यांची अभंगवानी लिहून ठेवण्याच् ठरवले. ही दैनदनी प्रत्येक वेळेस चालू होती. आणि तुकाराम महाराज सदेह वकैुठांंस गेले. तुकाराम महाराज्यांच्या नंतर संताजी महाराज आपल्या पीढ़ीजात व्यवसायबरोबर तुकाराम महाराज्यांच्या अभंग ओव्या त्यानी जपुन ठेवल्या होत्या आणि ते त्याची पूजा अर्चा करू लागले. पुढे काही दिवसांनी संताजी महाराज्यांच्या पत्नी यमुना बाई बाळातपनासाठी माहेरी गेली होती. त्यांचे वडील आगोदरच स्वर्गवाशी झाले होते. आई मथुबाई वृद्धापकळात आपल्या माहेरी सुुंदूबरे येथे गेली होती. वाड़यात संताजी महाराज एकटेच होते चाकन च्या भुईकोट किल्ल्याला शाहिस्तखानाच्या फौजेनी वेढा दिला. त्यानी संताजी महाराज्यांच्या घरावर कब्ज़ा केला सोन नान सर्व लुटले तेव्हा महाराजानी त्यांच्या तावडीतून सुटुन स्वताच्या जीवाची पर्वा न करता आपल्या लिखित स्वरूपामधे गाथा अभंग सोबत घेऊन आपल्या मामा च्या गावी संदुंंबरे येथे आले. तिथे त्याना आपल्याला पुत्र रत्न झाल्याची बातमी कळाली काही दिवसांनी त्यांच्या आईचे पण आजारपनामुळे निधन झाले. अश्या परिस्थित महाराज खचुन न जाता. तुकाराम महाराज्यांच्या विचारांची परंपरा चालू ठेवली आणि कीर्तन करू लागले आणि तुकाराम महाराज्यांच्या अभंग ओव्या न चे प्रचारण करू लागले. आणि आपले काम निस्वार्थी पणे चालू ठेवले आणि वयाच्या 70 व्या वर्षी आजारपनामुळे त्यांचे निधन आपल्या मामाच्या गावी सुदुंबरे येथे झाले. जनसागर लोटला. सगळयानी मूठमाती देऊन पण महाराज्यांच्या चेहरा झाकला जात नव्हता. कारण तुकाराम महाराजानी मुठमाती दिल्यावर वैकुंठ वासी प्रस्थान करणार असे वचन तुकाराम महाराजानी दिले होते. आणि चमत्कार झाला स्वयं तुकाराम महाराज तिथे प्रकट झाले आणि त्यानी संताजी महाराजाना मुठ माती दिली आणि त्यांचा चेहरा झाकला आणि त्याच ठिकाणी सदुंबरे येथे त्यांचे समाधी मंदिर आहे.